जगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बलात्कारासारखा गंभीर गुन्हा या जगात नाही. बलात्काराची कीड ही संपूर्ण जगभरातील देशांना लागली आहे आणि ही कीड ठेचून टाकण्यासाठी प्रत्येक देशाने कडक कायद्यांची तरतूद केली आहे. आरोपीला कठोरातील कठोर शासन व्हावे हीच या कायद्यांमागची सरकारी भावना असते. चला तर जाणून घेऊया जगभरातील विविध देशांनी बलात्कारी नराधमांना त्यांच्या कृत्याची फळे भोगण्यास पाठवण्यासाठी कोणते नियमांचे शस्त्र निर्माण केले आहे.

rape-law-marathipizza

स्रोत

स्वीडन

या देशात बळजबरीने जरी एखाद्या व्यक्तीने कोणाचे कपडे उतरवले तरी त्या व्यक्तीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. झोपते किंवा गुंगीत असताना जरी एखाद्या व्यक्तीने कोणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरी तो बलात्कार मानला जातो.

 

अमेरिका

अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे बलात्कारविषयक गुन्ह्याचे कायदे वेगळे आहेत. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार आरोपीला १० वर्षे ते आजीवन तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेमध्ये आपल्या जोडीदारासोबत संबंध राखण्यापूर्वी जोडीदाराची संमती घेण्याचा सल्ला दिला जातो.

 

इटली

बलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांकडे लक्ष देता इटली सरकारने १९९६ नंतर बलात्कारविषयक कायदे अधिकच कडक केले. आपल्या पत्नीसोबत एखाद्या व्यक्तीने जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरी त्या पत्नीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवता येतो. यासाठी किमान १० वर्षांची शिक्षा फर्मावण्यात येते.

rape-law-marathipizza01स्रोत

सौदी अरेबिया

हा देश येथील विविध शिक्षांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथे बलात्काराची एकच शिक्षा आहे ती म्हणजे मृत्युदंड ! परंतु आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध करणे हे या देशाच्या कायद्यानुसार अतिशय जटील काम आहे. जर आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला नाही तर ज्या महिलेने बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे तिला देखील शिक्षा देण्याची तरतूद आहे.

 

जर्मनी

हा देश बलात्कारविषयक कायद्यांच्या संदर्भात अधिकच गंभीर आहे. जर्मनीमध्ये व्यक्तीच्या सहमतीशिवाय तिला स्पर्श करणे, तिच्या अंगाशी छेडछाड करणे या कृती सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीमध्ये मोडल्या जातात.

 

स्वित्झर्लंड

हा देश देखील बलात्कारविषयक कायद्यांच्या संदर्भात अतिशय जागरूक आहे. लैंगिक अत्याचारांसाठी या देशामध्ये जवळपास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

rape-law-marahipizza02

स्रोत

फ्रान्स

फ्रान्समध्ये तर एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे देखील लैंगिक अत्याचार मनाला जातो आणि त्यासाठी आरोपीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. बलात्कारी आरोपीला जवळपास २० वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

 

भारत

भारतामध्ये बलात्काराच्या गुन्ह्याखाली आरोपीला किमान ७ वर्षांचा तुरुंगवास ते आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. विशेष प्रकरणांमध्ये ७ वर्षांचा तुरुंगवास ते आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीवर मनुष्यवधाचा खटला चालवून त्यास मृत्यदंडाची शिक्षा देखील दिली जाऊ शकते.

rape-law-marahipizza03

असे कडक कायदे असूनही बलात्काराची समस्या आजही तितकीच गंभीर आहे, हि सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?