' काय आहे बियर आणि स्त्रियांचं आगळं-वेगळं ऐतिहासिक “नातं”? – InMarathi

काय आहे बियर आणि स्त्रियांचं आगळं-वेगळं ऐतिहासिक “नातं”?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“बियर दारू नसते” हे शब्द सतत कानावर पडतात. कारण बियर हे अत्यंत हलके फुलके मद्य मानले जाते.

बरेच मद्यप्रेमी तर बियर मध्ये अल्कोहोल कमी असल्याने बियर पितच नाही. बियर पिऊन काहीच वाटत नाही असे त्यांचे म्हणणे असते. अनेक जण दारू प्यावी की पिऊ नये यातील मधला मार्ग म्हणून बियर पितात.

 

beer inmarathi

 

याच्या अगदीच उलट बियरप्रेमी असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बियर चाखायला आवडतात. त्यांचे सुख दु:ख त्यांना प्रत्येक वेळी बियर सोबतच साजरे करायचे असते.

अगदी चहा जसा रोज हवा असतो तशीच बियरची सवय असणाऱ्या लोकांचीही कमी नाही.

 

beer for car-inmarathi

 

आता या लोकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण किती हा मात्र प्रश्नच आहे. पाश्चिमात्य देशांत सर्रास सगळेच मद्य घेतात. त्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही. पण भारतासारख्या देशात मात्र हा प्रश्न पडतोच.

आपल्याकडे मद्य पिणे वाईट सवयी किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडते. अगदी लहानपणापासून मद्यपान किती वाईट आहे हे शिकवले जाते.

त्यातच मुलांची आणि मुलींची कामे, राहणीमान व एकंदर जगण्याची पद्धतीही लहानपणापासूनच बिंबवली जाते. त्यात सगळ्यात महत्वाचे  ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये यांचा समावेश असतो.

 

beer 2 inmarathi

 

कुणी या चौकटीबाहेर गेले तर ते समाज साहज सहजी मान्य करत. मग त्या ‘कर’ किंवा ‘नको करू’ला काही वास्तविक आधार व पुरावा नसेल तरी चालते.

असेच काहीसे मद्यपान करण्याबद्दलही आहे. एकतर ते करूच नये असा आग्रह असतो. त्यातल्या त्यात मुलांनी केले तर एकवेळ ठीक आहे पण मुलीच्या जातीने असे करूच नये अशी धारणा आहे.

या गोष्टी किंवा ही व्यसनं मुलींसाठी नाहीतच अशी आपल्या समाजाची ठाम समजूत आहे. अर्थात हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असला तरीही..

पण जर बियरचा शोध महिलांनी लावलाय आणि एकेकाळी मद्य तयार करण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच होता असे तुम्हाला कुणी सांगितले तर? विश्वास बसणार नाही ना?

परंतु खास बियरचा अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासकाने यावर विश्वास ठेवायला भाग पाडलेत.

“जेन पेटोन” असे या अभ्यासकाचे नाव आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सर्वप्रथम बियर तयार केली, ती विकली व प्यायली ती मेसोपोटेमिअन स्त्रियांनीच. नक्की कोणत्या व्यक्तीने बिअरचा शोध लावला हे अज्ञात आहे. परंतु स्त्रियांनीच हा शोध लावला यावर मात्र ते ठाम आहेत.

 

ninkasi-proof1-inmarathi

 

एवढेच नाही तर, बियर तयार करण्याचा वा दारूभट्टी चालवण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच होता. तेही ७००० वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमिया आणि सुमेरिया मध्ये.

सुमेरिया इथे सापडलेले पुरावे बियरच्या अस्तित्त्वाबद्दलचे सर्वात जुने पुरावे मानले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे तिथे त्यावेळच्या बियर बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती मिळाली आहे.

३९०० वर्षे जुनी एक सुमेरिअन कविता सापडली आहे ज्यात निन्कासी या देवतेची स्तुती केलेली आहे. ही सुमेरिअन देवी बियरची देवता मानली जाते. या कवितेमध्ये त्यावेळच्या बियरच्या निर्मितीबद्दल सांगितलेले आहे. ही बियर बार्लीपासून बनवली जात.

ही कविता म्हणजे बियरची सर्वात जुनी बियर बनवण्याची कृती समजली जाते.

सुमेरिअन इतिहासात कुलाबा नावाच्या एका स्त्रीचा उल्लेख आहे. ही स्त्री पूर्वापार चालत आलेल्या राजांच्या यादीतील एकमेव स्त्री आहे.

 

beer reciepe inmarathi

 

विशेष म्हणजे तिचे हे राजपद तिच्या जन्मावरून तिला मिळालेले नव्हते. तर ती सुरुवातीला बियरची निर्मिती करत असत. या व्यवसायातूनच प्रगती करत नंतर तिने राजपद मिळवले. तिचेही सुमेरीयात पूजन केले जाते.

याशिवाय इतरही अनेक पुरावे सापडले आहेत ज्यावरून मद्य बनवणे हे स्त्रियांचेच काम होते असा निष्कर्ष काढता येतो.

 

sumerian-beer1-inmarathi

 

इजिप्तमध्ये सुद्धा अशीच बियरची देवता आहे. ही देवी ‘रा’ या सूर्यदेवाची मुलगी आहे असा समज असून ती ‘सेखमेत’ या नावाने प्रचलित आहे. या देवीचा कोप होऊ नये म्हणून तिला बियरने खुश केले जाते. असे केल्याने ही शांत होते असे मानतात.

हे ही वाचा – बियर ही नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते?

पॅटी हॅमरीक नावाच्या एका लेखिकेने पुरातन मानववंशशास्त्र हा विषय अभ्यासला आहे. त्या पुरातन बियर हा विषय शिकवतात. मेसोपोटेमिया मधील ‘कोड ऑफ हमुराबी’ हा मानवी नागरीकरणातील लिखित नियम असणाऱ्या सर्वात जुन्या पुराव्यांपैकी एक आहे.

पॅटी हॅमरीक यालाच पुरातन काळात मद्यनिर्मितीत स्त्रियांचे वर्चस्व असल्याचा पुरावा मानतात.

त्या म्हणतात हे नियम बेबिलोनिअन भाषेत लिहिलेले आहेत. या नियमांत बियर संदर्भात सुद्धा अनेक नियम आहेत.

 

sumerian beer inmarathi

 

उदाहरणार्थ एका ठिकाणी बियरवर अतिरिक्त कर आकारू नये असे सांगण्यात आले आहे. तर त्या प्रत्येक नियमांत ‘ती’ असा स्त्रियांसाठीचा उल्लेख आहे. यावरून या व्यवसायात फक्त स्त्रिया होत्या हे स्पष्ट होते.

इंग्लंडमध्ये सुद्धा महिला बियर बनवत असल्याचे पुरावे सापडतात. तिथे फार पूर्वी महिला आपल्या कुटुंबासाठी बियर बनवत. कालांतराने त्या उरलेली बियर विकू लागल्या.

हळूहळू त्यात बदल होत त्या अधिकची बियर निर्मिती करू लागल्या. ही बियर विकून अनेक स्त्रिया कुटुंब चालवत.

टोरोंटो युनिव्हर्सिटीमधील फूड स्टडीजचे प्रोफेसर जेफरी पिल्चर यांचे असे म्हणणे आहे की बियरमध्ये वापरण्याच्या वस्तूंबद्दल सर्वात आधी एका महिलेनेच लिहून ठेवले आहे.

बेनेडीक्तमधील आयुर्वेदाचार्य आणि संत हिल्डगार्ड ऑफ बिन्जेन यांनी सर्वात आधी बियरमधील पदार्थ व त्यांच्या आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक गुणधर्म याबद्दल लिहून ठेवलेले आहे.

बियरची निर्मिती आणि विक्री महिलाच करत होत्या याचे असेच अनेक पुरावे संशोधकांनी शोधून काढले आहेत.बियरचा शोध महिलांनीच लावला यावर जवळपास सर्वांचे एकमतही झालेले आहे.

 

beer-statue1-inmarathi

 

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मग आता महिलांचे वर्चस्व संपुष्टात कसे आले?

तर अभ्यासकांच्या मते जवळपास अठराव्या शतकाच्या शेवटी हे वर्चस्व संपू लागले. जसजसे बियरचे उत्पादन व मागणी वाढू लागली तसा हा व्यवसाय वाढू लागला. मग तो घरांपुरता मर्यादित न राहता मोठ्या स्वरुपात सुरु झाला.

शिवाय सरकारला विक्रीचे अधिकार स्वतःकडे घ्यायचे असल्याने बियरच्या निर्मिती व विक्रीवर अनेक निर्बंध लादण्यात आले.

औद्योगिकीकरणामुळे बियरच्या व्यवसायालाही चालना मिळाली. या सर्व प्रक्रियेत स्त्रियांचे वर्चस्व संपून हा व्यवसाय पूर्णतः पुरुषांची मक्तेदारी झाला.

हल्ली हळूहळू स्त्रिया या क्षेत्रात पुन्हा येत आहेत. मद्यनिर्मितीत आणि विक्रीत महिलांची संख्या वाढतेय. आणि उरला प्रश्न बियर पिण्याचा. तर ती मुभा सर्वांना आहेच की.

हे ही वाचा – बियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?