' हे १० पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरास अपाय होऊ शकतो! – InMarathi

हे १० पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरास अपाय होऊ शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

पोट रिकामे असताना काही पदार्थ खाणे किंवा काही पेय पिणे हे शरीराला हानिकारक ठरू शकतात.

अगदी सकाळी सकाळी आपले पोट रिकामे असते. रात्री झोपण्यापूर्वी केलेले जेवण पूर्ण पचून गेलेले असते. त्यामुळे काही पदार्थ आपण पोट रिकामे असताना खाल्ले तर त्यांचा आपल्या शरीराला फायदा न होता तोटाच होतो आणि आपण आजारी पडतो.

आपण आजारी पडण्याची मुख्य कारणे आपण जे काही खातो अथवा पितो ह्यावर अवलंबून असतात. सगळे पदार्थ खाल्ले जातात ते शरीराचे पोषण होण्यासाठी. पण प्रत्येक पदार्थ वेग वेगळ्या गुण धर्माचा असतो.

पदार्थात असलेले घटक आपल्या शरीरावर परिणाम करतात. चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. त्यामुळेच कोणत्या वेळी कोणते पदार्थ आपल्या शरीरावर चांगले अथवा वाईट परिणाम करतात हे जाणून घेणे जरुरीचे असते.

 

hungry girls inmarathi

 

आपल्या शरीरातले ऍसिडचे प्रमाण वाढले की अनेक समस्या उद्भवतात. म्हणजे पोटात जळजळ, छातीत दुखणे, उलटी होणे वगैरे त्रास होऊ लागतात. कफ वाढला तर खोकला, डोकेदुखी, श्वसन क्रियेत अडथळा आणि जर शरीरातले वायूचे प्रमाण वाढले तर गॅसेस, पोटदुखी, जुलाब, उलट्या डोके दुःखी असे त्रास होतात.

आपली चयापचय क्रिया बिघडते आणि हे त्रास सुरू होतात. ही चयापचय क्रिया बिघडण्याची कारणे म्हणजे आपण खाल्लेले अन्न पदार्थ किंवा प्यायलेले द्रव पदार्थ ह्यामुळे मुख्य बिघाड होतो. आपण कोणत्याही वेळेला काहीही खातो अथवा पितो त्यामुळेसुद्धा असा बिघाड उत्पन्न होऊ शकतो.

मग बघा कोणते पदार्थ आपण रिकाम्या पोटी खाणे/पिणे टाळायला हवेत.

हे ही वाचा –

===

 

१. कॉफी/चहा

सध्याची सगळ्यांची जीवनशैली धावपळीची झाली आहे त्यामुळे खाणे पिणे ह्यावर नीट लक्ष दिले जात नाही. कधी कधी कामाच्या धावपळीत जेवण सुद्धा केले जात नाही. बराचवेळ पोट रिकामे राहते. त्यावर आपण जर कॉफी किंवा चहा प्यायलो तर त्याचा शरीरावर उलटाच परिणाम होतो.

 

tea-coffee1-inmarathi

 

रिकाम्या पोटात कॉफी किंवा चहामुळे असिडचे प्रमाण वाढते. असे जर अनेकवेळा झाले तर असिडीटीचा त्रास सुरू होतो, डोकेदुखी, छातीत जळजळ, मळमळ ह्यामुळे उलटी होणे आशा समस्या उद्भवतात.

२. लिंबू, संत्री अशी फळे

सकाळी आंबट रस किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यास अगर प्यायल्यास शरीरातले आम्ल वाढून हळूहळू पचन क्रिया बिघडते. पचन चांगले होत नाही आणि पचनाचे त्रास सुरू होतात. म्हणून लिंबूपाणी, संत्र्याचा अगर मोसंब्याचा रस रिकामे पोट असताना घेणे टाळावे.

 

citrus-fruits1-inmarathi

३. दही

रिकामे पोट असताना दही खाणे सुद्धा अपायकारक ठरते. कारण पोट रिकामे असताना दह्याचे सेवन केल्यास प्रचंड ऍसिडिटी होते. म्हणून पोट रिकामे असताना दही खाणे टाळलेच पाहिजे.

 

curd1-inmarathi

 

४. कार्बोनेटेड थंड पेये

कार्बोनेटेड थंड पेये पिणे शरीराला घातक ठरते. कारण अशा पेयांचे सेवन केले तर पोटातील सूक्ष्म रक्तवाहिन्या पोटातील सगळ्या भागाला रक्तपुरवठा करू शकत नाहीत, रक्तपुरवठा कमी झाला तर पचनशक्ती मंदावते. आणि अन्नपदार्थ पोटात तसेच कुजण्यास सुरुवात होते. अपचन होते.

 

alia bhatt drinks coke inmarathu

 

५. पेअर फळ

आपण अनेक फळे खातो. पण जर पोट रिकामे असेल आणि ‘पेअर’ फळ आपण खाल्ले तर त्याचा परिणाम आतड्यावर होतो. आतड्याच्या आतून पेशींवर आघात होऊन पेशी निकामी होतात. म्हणून पेअर हे फळ रिकाम्या पोटी न खाणे चांगले.

 

pears1-inmarathi

हे ही वाचा –

===

 

६. टोमॅटो

टोमॅटो मध्ये टॅनिन ऍसिड असते. पोटात काहीही नसताना जर आपण टोमॅटोचे सेवन केले तर पोटात गॅस्ट्रिक अल्सर होण्याची दाट शक्यता असते.

 

cancer-tomatoes-inmarathi

 

काही लोक सकाळी सकाळी सॅलड म्हणून टोमॅटो खातात त्यांनी ते टाळणे योग्य होईल.

 

७. मसालेदार आणि तळलेले पदार्थ

मसालेदार पदार्थ नेहमी खाणं हेही अपाय करतं. सतत तिखट चमचमीत पदार्थ, तळलेले पदार्थ हे शरीरातील ऍसिडिटी वाढवतात. त्यामुळे अल्सर, मूळव्याधी सारख्या आजारांना आमंत्रणच मिळते.

आता असे पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती लगेच बंद होत नाही पण हळू हळू कमी करून अशा आजारांना लांब ठेवता येणे शक्य होते.

 

oily-food1-inmarathi

 

८. कच्च्या भाज्या/सॅलड

पोट रिकामे असेल त्यावेळी कच्या भाज्या, सॅलड खाऊ नये, आधी काहीतरी न्याहारी करून नंतर खाल्ल्यास योग्य परिणाम मिळतो, नाहीतर पोटदुखी किंवा हृदय रोग हे डोके वर काढू शकतात.

 

salad-inmarathi

 

९. केळी 

केळी सुद्धा रिकाम्या पोटी खाणे अहितकारक आहे. बरेच लोक उपवास करतात आणि उपवासाला चालते म्हणून रिकाम्या पोटी केळी खातात.

रिकाम्या पोटी खाल्लेली केळी  आपल्याच शरीरातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमचा समतोल बिघडवतात आणि उपाय म्हणून खाल्लेली केळी अपाय करते.त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी लक्षातच ठेवा की रिकाम्या पोटी नुसती केळी खायची नाहीत.

 

banana inmarathi

 

१०. गोड पदार्थ

अतिशय महत्वाचे म्हणजे उपाशी पोटी, रिकाम्या पोटी, सकाळी सकाळी पोटात काहीही नसताना कोणतेही साखरेचे पदार्थ खाणे आपल्या शरीराला अतिशय अपायकारक, हानिकारक, ठरतात.

बंगाली मिठाई, साखरेच्या पाकात असणारे पदार्थ, पेस्ट्री, चॉकलेट, जेली, साखर लावलेले पदार्थ बर्फी, असे पदार्थ रिकाम्या पोटी खाणे टाळावे हेच चांगले. नाहीतर रिकाम्या पोटी “साखरेचे खाणार त्याला डायबेटीस होणार”.

 

sweets-marathpizza02

 

कारण रिकाम्या पोटी साखरेचे पदार्थ खाण्याने पोटात इन्शुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि डायबेटीस होतो.मग सगळीच खाण्यापिण्याची बंधने येतात.

म्हणून आता तरी आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलूया आणि चांगलं सुदृढ निरोगी राहूया.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?