' वाचून नवल वाटेल, विमानातून ‘या’ गोष्टी ढापणा-या महाभागांचा अजब कारभार! – InMarathi

वाचून नवल वाटेल, विमानातून ‘या’ गोष्टी ढापणा-या महाभागांचा अजब कारभार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठलीही गोष्ट फुकट मिळत असेल तर ती ढापण्याची सवय अनेक लोकांना असते. असे लोक हॉटेलमधील नॅपकिन्स, टॉयलेटरीजच्या किट्स, कॉफी मग्स, रेस्टॉरंटमधील कटलरी, रेल्वेमधील नॅपकिन्स, ब्लँकेट्स इतकेच काय तर विमानातील सीटच्या खाली असलेले लाईफ जॅकेट्स सुद्धा ढापण्यास कमी करत नाहीत.

लोक असे का करत असावेत? विमानाने प्रवास करणारी माणसे काही चोरी करावी इतक्या गरीब परिस्थितीत नक्कीच नसतात. मग ही चोरीची वृत्ती कुठून येते? क्लेप्टोमेनियाक लोक सोडले तर सुशिक्षित व सधन लोक असे का वागत असावेत?

 

airport1-inmarathi

 

विमानातील लाईफ जॅकेट घरी नेऊन त्याचा लोक काय उपयोग करणार, तरीही ते चोरणारी माणसे अस्तित्वात आहेत. ही वृत्ती भारतात किंवा इतर गरीब देशांतच नाही तर जगात सगळीकडे आढळते.

जॉईस किरबे ही स्त्री एक फ्लाईट अटेन्डन्ट म्हणून काम करत असे. त्यांच्या मते अनेक लोक फ्लाईटमधून उतरताना स्वत:बरोबर सीटखाली असलेले इमर्जन्सी फ्लोटेशन डिव्हाईस घरी घेऊन जातात. फ्लाईट अटेन्डन्टसना प्रत्येक फ्लाईटनंतर विमानातील प्रत्येक सीटखाली ते लाईफ जॅकेट आहे की नाही हे चेक करावे लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लोक चोरी करतात हे तर सर्वांना माहित आहे पण ते असे का करतात हे जाणून घेणे इंटरेस्टिंग आहे.

 

airplan life jacket InMarathi

हे ही वाचा – प्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

हॉटेल्समधून नियमितपणे गोष्टी गहाळ होतात. लोकांना कदाचित असे वाटते की हॉटेल्स आपल्याकडून राहण्याचे जे पैसे घेतात त्या चार्जेसमध्ये ग्राहकांना वापरायला देण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमत सुद्धा समाविष्ट असते.

म्हणूनच कदाचित हॉटेलमधून चेक आउट करताना लोक आपल्याबरोबर वस्तू घेऊन जातात. बहुतेक एयरलाईन्सविषयी सुद्धा लोकांचा हाच दृष्टिकोन असावा. ग्राहकांना सगळ्या ठिकाणी भरपूर चार्जेस भरावे लागतात आणि ते चार्जेस भरायचे की नाही हा पर्याय ग्राहकांकडे नसतो.

कदाचित सर्व गोष्टींसाठी एयरलाईन्स भरपूर पैसे घेत असल्याने लोक चिडून विमानातील वस्तू (अगदी लाईफ जॅकेट) सुद्धा आपल्याबरोबर नेत असावेत. नाहीतर कुठलाही शहाणा माणूस लाईफ जॅकेट घरी नेऊन काय करेल?

लोक विमानातून काय व किती वस्तू चोरून नेतात हे मात्र कोणालाही सांगता येणार नाही. कारण विमानात होणाऱ्या चोऱ्या ह्यावर गेल्या अनेक दिवसांत सर्व्हे झालेला नाही त्यामुळे ह्याची निश्चित आकडेवारी सांगता येणार नाही.

तसेच एयरलाईन्स ह्या चोऱ्यांविषयी जाहीरपणे तक्रार सुद्धा नोंदवत नाहीत. पण प्रवास करणारे लोक तसेच एयरलाईन्समध्ये नोकरी करणारे लोक नेहमीच पुराव्यानिशी सांगतात की विमानात नियमितपणे चोऱ्या होतात. लोक नेहमीच विमानातील वस्तू आपल्याबरोबर घेऊन जातात.

अगदी फर्स्ट क्लासने प्रवास करणारे प्रवासी सुद्धा विमानातील उश्या व ब्लँकेट्स आपल्याबरोबर घेऊन जातात.

 

flight-blanket-inmarathi

 

गेल्या वर्षी युनायटेड एयरलाईन्सने फ्लाईट अटेंडंट्सना एक मेमो पाठवला होता. त्या मेमोमध्ये असे लिहिले होते की ,

“फ्लाईट पूर्ण झाल्यानंतर कुठल्या वस्तू आपल्याबरोबर न्यायच्या ह्याबाबतीत कदाचित प्रवाश्यांमध्ये कन्फ्युजन आहे. विमानात फर्स्ट क्लासमध्ये दिल्या जाणाऱ्या उश्या व ब्लँकेट्स ह्या घरी नेण्यासाठी नाहीत.

त्यांची किंमत तिकिटात घेतली जात नाही. ह्या गोष्टींची चोरी जरी थोड्याच प्रमाणात होत असली तरीही थोडे थोडे करता एयरलाईन्सला ह्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते.”

विमानातून सामान्यपणे गहाळ होणाऱ्या वस्तू म्हणजे एयरसिकनेस बॅग्स, टेबल सेटिंग्स (कटलरी), उश्या व ब्लँकेट्स ह्या आहेत. अनेक लोक विमानातील एयरसिकनेस बॅग्स बरोबर घेऊन येतात. विमानात प्रवास केल्याची आठवण म्हणून ते असे करतात असे एका व्यक्तीचे म्हणणे आहे.

एका व्यक्तीने तर अश्या २५० बॅग्स स्वतःकडे जमा केल्या आहेत. ती व्यक्ती ५० देश फिरली आहे आणि अनेक विविध प्रकारच्या एयरलाईनने प्रवास केला आहे. प्रत्येक विमानातील एक आठवण म्हणून ही व्यक्ती त्या विमानातील एयरसिकनेस बॅग बरोबर घेऊन येते.

 

airline-sick-bags-inmarathi

 

अनेक लोकांना ह्या बॅग्स बरोबर घेऊन येण्यात काही चुकीचे वाटत नाही उलट निरुपद्रवी गोष्ट वाटते. एयरसिकनेस बॅग्सप्रमाणेच अनेक लोक विमानातील टेबल सेटिंग्स म्हणजेच कटलरी उचलून घेऊन येतात. विमानात दिले जाणारे काटे, चमचे, सुरी, काचेच्या वस्तू तसेच मीठ व पेपर शेकर्स सुद्धा लोक घेऊन येतात.

प्लॅस्टिकचे काटे चमचे नेण्यात काही गैर नाही पण स्टील किंवा चांदीची कटलरी (जी महाग असते) ती बरोबर घेऊन येणे योग्य नाही. तुम्हाला जर एखादी वस्तू आवडली असेल तर ती विकत घेण्याविषयी फ्लाईट अटेन्डन्टकडे चौकशी करा.

व्हॅलेरीयो वियोलो हे कोपनहेगनमध्ये काम करणारे एक सिव्हिल इंजिनियर आहेत. ते एकदा लुफ्तान्सा फ्लाईटने प्रवास करत असताना त्यांना तेथील कॉफी मग फार आवडले. त्यांनी ते मग विकत घेण्याविषयी फ्लाईट अटेण्डन्टकडे चौकशी केली. तर त्या फ्लाईट अटेन्डन्टने त्यांना एकाऐवजी दोन कॉफी मग गिफ्ट म्हणून दिले. चोरणे केव्हाही वाईटच!

हे ही वाचा – डेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर

अनेक लोकांना ट्रेनमधील, विमानातील उश्या, पांघरुणे घरी घेऊन जाण्याची सवय असते. एक अशी व्यक्ती आहे जी विमानातील उश्या, पांघरुणे बरोबर घेऊन येते आणि ते गरीब लोकांना दान म्हणून देऊन टाकते. ती व्यक्ती ह्या प्रकाराला “गुड थिविंग” असे म्हणते. पण हा प्रकार म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असे झाले.

ह्यावर उपाय म्हणून जेटब्ल्यू सारख्या एयरलाईन्स प्रवाश्यांना फुकटात ब्लँकेट्स वापरायला न देता त्यांना ते विकतात. ह्यात एक नियम असाही आहे की जर “हे ब्लँकेट्स घरी नेण्यासाठी नाहीत किंवा हे ब्लँकेट्स फ्लाईट अटेन्डन्टकडे पार्ट करावे” अशी लिखित सूचना नसेल तर तुम्ही ते ब्लॅंकेट खरंच स्वतःकडे ठेवून घेऊ शकता.

लोक फक्त ह्याच वस्तू उचलून नेतात असे नाही. तर विमानात असणारे सूचना पत्रक सुद्धा बरोबर घेऊन जाणारे लोक आहेत. आता त्या विमानातील सूचनापत्रकाचा लोकांना काय उपयोग असणार आहे?

तरीही अनेक लोक ही वॉर्निंग प्लेकार्ड्स सुद्धा चोरतात. तसेच ट्रे टेबल्स घेऊन जातात. फ्लाईट अटेंडंटच्या गणवेशावरील विंग्स सुद्धा चोरल्या गेले आहेत. युनिफॉर्मवरील विंग्स चोरणे मात्र अतिरेक आहे.

 

uniform-wings1-inmarathi

 

ह्यामागचे कारण असे आहे की एयरलाईन्स व ग्राहक ह्यांच्यातील नाते सलोख्याचे नाही. एयरलाईन्स प्रवाशांची लूट करतात हाच बहुतांश ग्राहकांचा ग्रह असतो. पूर्वी विमानाची तिकिटे महाग असली तरी काही सुविधा मोफत दिल्या जात असत.

आता मात्र स्पेशल सीट हवी असेल तर त्यासाठी जास्त चार्जेस, जेवणाचे एक्स्ट्रा पैसे घेतले जातात. त्यामुळे लोक विमानातील लाईफ जॅकेट किंवा कप सारख्या अनावश्यक वस्तू चोरून एयरलाईन्सवर असलेला रोष व्यक्त करतात.

कधी कधी वाटते की लोकांचा हा रोष सुद्धा योग्यच आहे. विमानातील बेचव जेवणाचे भरमसाठ पैसे घेतले जातात. मग लोकांनी विमानाच्या गॅलीमधून खाऊचे पाकीट चोरणे आपण फार चुकीचे म्हणू शकत नाही.

तसेच प्रीमियम सीटसाठी एअरलाईन्स भरमसाठ पैसे आकारत असतील तर तिकिटात उशी व ब्लॅंकेटचा चार्ज समाविष्ट आहे हे एखाद्याला वाटू शकतेच.

जोवर भरमसाठ पैसे आकारून सुद्धा एयरलाईन्स किंवा हॉटेल्स चांगली सेवा पुरवत नाहीत तोवर तेथील अनावश्यक वस्तू घरी आणून लोक त्यांच्यावरील राग व्यक्त करत राहतीलच!

हे ही वाचा – युद्धाची अशीही पद्धत? शत्रुदेशाचे ढग चोरून नेले! : हास्यास्पद आरोप की तांत्रिक झेप?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?