' ९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा 'विजय दिवस'

९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१६ डिसेंबर हा दिवस भारतात ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे, की हा दिवस का साजरा केला जातो? त्या मागची शौर्यगाथा काय? हे बऱ्याच जणांना माहीत नाही.

आपल्याला ठाऊक असतो, तो भारताने पाकिस्तानवर युद्धात मिळवला विजय.. पण त्यापलीकडे जाऊन या युद्धाविषयी आणि भारतीय सैन्याच्या अफाट शौर्याविषयी जाणून घेऊयात.

या युद्धाचं मूळ कारण होतं, ते म्हणजे पूर्व पाकिस्तान, म्हणजेच बांगलादेश ला हवं असलेलं स्वातंत्र्य! अर्थात, ११ भारतीय हवाई दलांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळेच भारत विरुद्ध पाकिस्तान असं स्वरूप या युद्धाला आलं.

या हवाई हल्ल्यात आग्रा सुद्धा लक्ष्य करण्यात आलं. खरं तर आग्रा सीमेपासून ४८० किमी अंतरावर आहे.

या हल्ल्यानंतर, त्याच संध्याकाळी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्धाची घोषणा केली. पाकिस्तान ने केलेला हा हल्ला, म्हणजे त्यांनी केलेली युद्धाची सुरुवात आहे, असं त्यांनी जनतेशी साधलेल्या त्यांच्या रेडिओवरील संवादात म्हटलं होतं.

 

indira gandhi inmarathi
thoughtco.com

 

पाकिस्तानी सेनेचे जनरल ए.के. नियाजी सैन्याच्या प्रचंड तुकडीसह चालून आले आणि १९७१ च्या भीषण युद्धाला सुरुवात झाली. युद्ध सुरु झाल्यानंतर ११ दिवसांनी १६ डिसेंबर हा दिवस उगवलाचं तो मुळात विजयाचा शंखनाद करत !

या युद्धात भारताची सरशी झाली आणि भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर अक्षरश: गुडघे टेकले. या युद्धात बांगलादेशी सैन्याने देखील मोलाची साथ दिली.

पाकिस्तानच्या अधिपत्यातून मुक्त होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीचा अखेर गोड शेवट झाला आणि त्यांना स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त झाला.

1971-war-vijay-day-marathipizza01

स्रोत

पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर पाकिस्तान ने एकत्र हल्ला चढवला होता. मात्र या हल्ल्या ला प्रत्युत्तर देण्या साठी भारताची सेना सज्ज होती. पाकिस्तानी सैन्याने मुख्यत्वे करून पश्चिम सीमेवर हल्ला घडवला होता.

आर्मी आणि नेव्ही या दोन्हीच्या साहाय्याने ते युद्धात सहभागी झाले. मात्र पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय वीरांनी, थेट पाकिस्ताना चा भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तब्बल १५०१० किमी क्षेत्रफळाचा पाकिस्तानी भूभाग भारतीय सैन्याच्या अखत्यारीत आला होता.

जवळपास १२ दिवसांच्या युद्धानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशातील ढाका येथे ९६००० पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्यासमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारताचे ३९०० वीर धारातीर्थी पडले, तर ९८५१ वीर जखमी देखील झाले.

१६ डिसेंबर या दिवशी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास, अधिकृत पणे शरणागती पत्करल्याचे पाकिस्तान ने मान्य केलं. पूर्व पाकिस्तानचे जनरल नियाजीं यांनी ढाका (सध्याच्या बांगलादेश राष्ट्राची अधिकृत राजधानी आणि महत्त्वाचे शहर) येथे, भारतीय लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत शरणागतीचा करारावर स्वाक्षरी केली.

बांगलादेश राष्ट्र स्वतंत्र झाले. भारतीय सैन्याने युद्ध जिंकलं. 

पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करताना, अनेक भारतीय सैनिकांनी त्यांच्या अफाट शौर्याचा नमुना पेश केला. त्यांचे शौर्य नक्कीच गौरवास पात्र ठरते.

 

1971-war-vijay-day-marathipizza

स्रोत

देशाच्या रक्षणार्थ या सर्व वीरांनी दाखवलेल्या शौर्याची आठवण म्हणून १६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’

 • December 5, 2017 at 10:07 pm
  Permalink

  सर ,
  आपण वर लिहिले आहे की “जनरल नियाझी 96000 च्या सैन्यासह चालुन आला होता” हे विधान थोड़े चुकीचे आहे.
  जनरल नियाझी हा तत्कालीन पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) येथे लष्कर प्रमुख होता व ते सैन्य (96000)पश्चिम पाकिस्तानचा तत्कालीन जनरल टिक्काखान याने बांगलादेशात नरसंहार व ढाक्का शहर आपल्या भारतीय सैन्यापासून वाचवण्यासाठी तैनात केले होते .
  मी आपले प्रत्येक लेख वाचतो , फार अप्रतिम असतात . परंतु मला या लेखात थोड़ी चूक आढळल्याने ती तुमच्या निदर्शनास आणून दिली .
  काही चूकले असल्यास क्षमस्व
  सलाम त्या आपल्या भारतीय वीरांना
  जय हिन्द जय महाराष्ट्र

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?