' बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास

बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : तन्मय केळकर 

===

(या लेखातील बराच मजकूर अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण व त्याला कारणीभूत ठरलेल्या काही घटनांचा प्रत्यक्ष भाग असलेले एक राष्ट्रीय नेते मोहम्मद आरिफ खान यांच्या विविध भाषणांवर व मुलाखतींवर तसेच इतर माहितीपट, तत्कालीन बातम्या इत्यादी वर आधारित आहे.)

स्वातंत्र्योत्तर भारतातील मुस्लिमांबद्दल मुस्लिमेतरांमध्ये बऱ्यापैकी तिरस्कार व संशयाची भावना पिढीभर होती.

याला पार्श्वभूमी होती अर्थातच फाळणी व त्यावेळच्या हिंसाचाराची. मुस्लिमांची जवळपास तीन दशकं संशयाच्या नजरा झेलत तणावग्रस्त भीतीमध्ये गेली.

त्यानंतर आणीबाणी पर्वात बऱ्यापैकी सर्वच भारतीयांनी (हिंदू, मुस्लिम व इतर सर्वच) बेछूट सरकारी बडग्याचा मार खाल्ला.

त्यानंतर निवडणूक, इंदिरा पडणे, जनता पक्षाचं कडबोळं सरकार येणे व तेही कोसळणे असा नागमोडी प्रवास झाल्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने इंदिरा सरकार येऊन त्याच्या नेतृत्वाखाली परत गाडी प्रगतीच्या मार्गावर वेग पकडणे ही प्रक्रिया सुरू होत होती.

आणि एवढ्यात या प्रगतीला ब्रेक लावणारं, पुन्हा एकदा सांप्रदायिक तेढ निर्माण करणारं एक प्रकरण न्यायालयासमोर आलं ज्याची चांगली आणि वाईट फळं आपण सर्व आजही भोगत आहोत. ते प्रकरण म्हणजेच शाह बानो खटला.

 

shahbano-inmarathi
hindi.news18.com

 

शाह बानो नामक एका मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने तोंडी तलाक देऊन घराबाहेर काढले. तिने याविरुद्ध कोर्टात दाद मागितली असता न्यायालयाने निकाल दिला की नुसता तोंडी तलाक देऊन घराबाहेर काढणं कायदेबाह्य आहे. शाह बानोला दरमहा रू. ५०० पोटगी मिळण्याचा हक्क आहे (जो इतर कोणत्याही घटस्फोटित मुस्लिमेतर भारतीय महिलेला असतो).

यावर All India Muslim Personal Law Board (AIMPLB) आणि भारतभरच्या मुल्ला लॉबीने रस्त्यावर उतरून नंगा नाच केला की न्यायालयाला इस्लामी शरिया कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

तोंडी तलाकला इस्लामी शरिया कायदा परवानगी देतो. आम्ही मुस्लिम म्हणून शरियाला बांधील आहोत, संविधानाला नाही.

विवाह/ घटस्फोट कसे करावे याचे कायदे हे शरियामध्ये ठरवलेले आहे आणि आम्हीही तेच पाळू. न्यायालय किंवा संसदेला यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही.

त्यामुळे राजीव सरकारने या उलेमाशाहीसमोर नांगी टाकत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा कायदा बहुमताच्या जोरावर पारित केला.

धर्मांध मुस्लिमांची अशा प्रकारे बाजू घेतल्याबद्दल साहजिकच राजीव गांधी सरकार व काँग्रेस पक्षाची प्रतिमा मतांसाठी कोणत्याही थराला जाऊन कट्टर मुस्लिमांचं व मौलानांचं “तुष्टीकरण” करणारे अशी बनत होती.

 

babri-masjid-demolition-marathipizza
youtube,com

 

त्यामुळेच मुस्लिमांखेरीज इतर धर्मातील धर्मांधांना अशाच प्रकारे सहयोग केल्याखेरीज काँग्रेस पक्षाची सर्वधर्मसमभाव (की सर्व-दंभ-सम-वाव) पाळणारे ही प्रतिमा टिकणार नव्हती.

म्हणून राजीवला असं एखादं प्रकरण हवंच होतं ज्यात त्याला हिंदूंची आक्रमक धार्मिक मागणी मान्य करून आपली हिंदूंच्या मनातील तथाकथित प्रतिमा सुधारता येईल. आणि त्याच्या मदतीला आला राममंदिर खटला.

उत्तर प्रदेश नामक प्रांतातील कोणत्या तरी फैजाबाद जिल्ह्यातील जिल्हा/सत्र न्यायालयात कोणत्या तरी अयोध्या नावाच्या गावातील एका देवळाबद्दल मालकी हक्कावरून वाद सुरू होता.

बाबरी मशीद (?) नावाच्या वास्तूवर हिंदू रामजन्मभूमी म्हणून आपला हक्क सांगत होते. सुन्नी वक्फ बोर्ड व AIMPLB हे दावेदार होते.

तेव्हा राजीवने AIMPLB सोबत अशी “मांडवली” केली की आम्ही तुमच्या शाह बानो खटल्याचा निकाल निष्प्रभ करणारं विधेयक संसदेत पारित करतो. पण तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नात हिंदूंचा दावा मान्य करा. AIMPLB ने हे मान्य केलं.

१९८६ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालात विवादित वास्तूत पूजा करण्याचा हिंदूंचा हक्क मान्य करत वास्तूला लावलेलं कुलूप उघडण्याची परवानगी दिली.

 

ram-mandir-inmarathi
aajtak.intoday.in

 

निकाल आल्या आल्या तातडीने २ तासांत जिल्हा प्रशासनाने वास्तूचं कुलूप उघडलं व त्यानंतर आत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करत पूजा अर्चा सुरू करण्यात आली. सर्वांना वाटलं की प्रकरण मिटलं.

पण तेव्हा हे कुणाच्याही लक्षात आलं नाही की धार्मिक आक्रमकता हा असा राक्षस आहे जो एकदा दिव्यातून बाहेर निघाला की परत आत टाकता येत नाही. आणि त्याला सतत काही ना काही देत नाही राहिलं तर ज्याने दिव्यातून बाहेर काढलं त्याच्याच जीवावर उठतो. काँग्रेसचंही तेच झालं.

याच रामजन्मभूमी वादात तेल ओतत लालकृष्ण अडवाणी यांनी उत्तर प्रदेश मध्ये हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला.

नुसत्या पूजा करण्याच्या हक्कावर शांत न राहता संबंधित वास्तूच्या जागी मंदिर झाले पाहिजे ही मागणी हळूहळू वाढवत नेली. मंडल आयोग लागू झाल्यानंतर भाजपला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या प्रकरणाची गरजच होती.

मग रथयात्रा आयोजित करणे, गावोगावी आक्रमक हिंदुत्ववादी रॅली काढणे इत्यादी प्रकारांनी हिंदूंच्या मतांना एकत्रित करत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न झाला. AIMPLB नेही राजीवच्या हत्येनंतर राजीव व काँग्रेसला १९८६ मध्ये दिलेलं वचन मोडत बाबरी मशिदीच्या (?) वास्तूवर exclusive हक्क सांगायला सुरुवात केली.

याचीच परिणती झाली ती आंदोलनकर्त्यांचा जत्था मशीदीच्या दिशेने जाऊन मशिदीचा ढाचा पाडण्यामध्ये. (हा घटनाक्रम बऱ्यापैकी जगजाहीर आहे. त्यामुळे अधिक विस्ताराने सांगत नाही.)

 

babri-inmarathi
harmukhnews.com

 

थोडक्यात, आज आपल्या आठवणीतून पुसट झालेल्या या मुद्द्यांची आठवण करून देण्याची गरज आहे –

१. या पूर्ण एपिसोडची सुरुवात राजीव गांधी सरकारने मुस्लिम धर्मांधांच्या घटनाविरोधी मागण्या मान्य केल्यामुळे झाली आहे. (अन्यथा हिंदूही फारसे आक्रमक झाले नसते. आणि शेफारलेल्या आक्रमक हिंदूंना सर्वसामान्य हिंदूंचा इतका व्यापक प्रतिसादही मिळाला नसता.)

२. AIMPLB ने राजीवच्या मृत्यूनंतर राजीवला दिलेलं वचन मोडत बाबरी मशिदीच्या वास्तूवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली.

३. वरील २ तथ्ये आपल्यापासून जाणून बुजून लपवली गेली. २००२ च्या दंगलीबाबत गोध्राची जाळलेली ट्रेन या विषयाबाबत सक्तीचं मौन पाळले जाते किंवा काश्मीर प्रश्नाबाबत काश्मिरी हिंदूंचं काश्मिरी धर्मांध मुस्लिमांनी केलेले Genocide याबद्दल कानठळ्या बसवणारे मौन पाळले जाते. त्याच पद्धतीने बाबरी प्रकरणाची खरी पार्श्वभूमी खोटारड्या प्रसारमाध्यमांकडून लपवली जाते.

या प्रकरणात पूर्णतः हिंदूंनाच दोषी ठरवणे व हिंदूंमधील विवेकी भाबड्या नागरिकांच्या मनात अपराधी भावना निर्माण करून त्यांना बॅकफूटवर ठेवणे असे बदनियत इरादे याबद्दल वक्तव्ये करणाऱ्या अनेकांच्या मनात आहेत.

या गोबेल्स प्रचाराला बळी पडू नये यासाठी हे सर्व लिहिणं गरजेचं वाटलं. बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल लागण्याच्या पार्श्वभूमीवर आपलं या विषयीचं मत ठरवण्यापूर्वी या लेखातील मुद्द्यांवर विचार केला जावा हा प्रामाणिक हेतू….

प्रतिवाद करणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच!

पुढील भाग : अयोध्येतील “त्या” धर्मस्थळाला ‘मशीद’ म्हणणं हा मुळात इस्लामचा अपमान…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास

 • October 25, 2018 at 7:27 pm
  Permalink

  चांगली माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद तुमच

  Reply
 • May 16, 2019 at 9:07 pm
  Permalink

  माहिती दिली त्याबद्दल, धन्यवाद.

  Reply
 • October 18, 2019 at 7:53 pm
  Permalink

  Khup khup abhari aha ya mahitisathi

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?