'हिटलरने दिलेलं एक मस्त गिफ्ट : संपूर्ण जगाला या "सुंदरी"ची भुरळ पडली

हिटलरने दिलेलं एक मस्त गिफ्ट : संपूर्ण जगाला या “सुंदरी”ची भुरळ पडली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिटलर हा संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा खलनायक, पण ह्या हिटलरने संपूर्ण जगाला एक अतिशय दिलखेचक गिफ्ट दिली ती इतकी “सुंदर ” की सर्वांना तिची भुरळ पडली…

खूप कमी लोकांना हे ठाऊक आहे की बीटलची मुळची संकल्पना ही हिटलरची होती.

१९३४ साली हिटलरने फर्डिनांड पोर्श (Ferdinand Porsch) ह्या डिझाईनरला पाच जण मावतील अशी एक फॅमिली कार बनवायला सांगितली, ती १०० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल अशीही योजना करायला सांगितली.

“Autobahn” ह्या जर्मनीतल्या हायवेवर ही कार वाऱ्याच्या वेगाने धावली पाहिजे अशी त्याची इच्छा होती! जर्मन लोकांना सेविंग्स प्लॅनमध्ये ही कार विकत घेता येऊ शकत होती, पण त्याआधीच वर्ल्ड वॉर सुरु झालं!

 

hitler-beetle1-inmarathi

 

एका उद्योगी ब्रिटिश ऑफिसरला फोक्सवॅगनची सैनिकी गाडी खूप आवडली.

फोक्सवॅगनच्या नवीन गाडीचं manufacturing हे ब्रिटनमध्ये व्हावं अशी त्याची इच्छा होती. त्यासंबंधी एक मोठा गमतीशीर किस्सा आहे –

१९४५ साली फोक्सवॅगनची फॅक्टरी बॉम्बवर्षावामुळे नेस्तनाबूत झाली होती. पण तिथल्या एका कारला ब्रिटनला नेण्यात आलं.

ब्रिटनमधल्या आघाडीवर असलेल्या मोटार बनवणाऱ्या मोठ्या उद्योगपतींना बोलावून एक कमिशन बसवण्यात आलं. ह्या कमिशनचे प्रमुख होते सर विल्यम रूट्स. त्यांनी ह्या कारचं परीक्षण केलं आणि म्हणाले –

“ही एका सामान्य माणसासाठी अत्यंत अनाकर्षक कार ठरेल” आपल्याला विश्वास बसणार नाही पण ह्या कमिशनने त्या कारला “बेढब” “गोंगाट करणारी” ठरवले आणि “अशी कार बाजारात आणणे हे आर्थिकदृष्ट्या घातक ठरेल” असा शेरा मारला.

असं एकेकाळी घडलेलं असताना फोक्सवॅगनची बीटल ही जगातली सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली!

 

oldbeetle1-inmarathi

 

बीटलची खासियत म्हणजे फक्त तिची विक्री नव्हे तर जगातल्या कुठल्याही देशातल्या समाजातील कोणत्याही स्तरामध्ये तिची असलेली लोकप्रियता होय.

१९४५ ते २००३ पर्यंत तिच्या आकारात बरेच बदल झाले पण तिची लोकप्रियता कमी झाली नाही, ही “नाझी” गाडी भलतीच फेमस झाली. बीटलचं पहिलं आणि शेवटचं डिजाईन खूपच साधर्म्य असलेलं आहे.

The Love Bug (१९६८) ह्यात दाखवण्यात आलेली “Herbie” म्हणजेच ती कार जिच्यासाठी जर्मन लोकांनी पैसे वाचवून ठेवले होते आणि तेवढ्यात हिटलरने पोलंडमधल्या जर्मन नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पोलंडवर हल्ला केला आणि Herbie विकत घेण्याचं जर्मन लोकांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.

जर्मन कुटुंबाने एका सुबक मोटारीने मस्त एन्जॉय करत प्रवास करावा अशी हिटलरची मनिषा होती.

तिची किंमत ९९० reich marks (जर्मनीतील त्यावेळचे चलन) एवढी असणार होती. एका सामान्य जर्मन कामगाराला त्याच्या ३१ आठवड्याच्या पगारावर ती विकत घेता येऊ शकत होती. त्यासाठी सेविंग्स स्कीम देखील आखण्यात आली होती.

 

beetle-manufacturing1-inmarathi

 

स्वस्त, user friendly, आणि सहज maintain होणाऱ्या बीटल कारने ब्राझील, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये देखील उत्पादन करण्याचा परवाना मिळवला.

 

beetle-veriety1-inmarathi

 

पण फोक्सवॅगनच्या पोर्शने एका Czech कंपनीच्या ऑस्ट्रियन इंजिनिअरचे डिजाईन चोरले असा आरोप करण्यात आला. हा ऑस्ट्रियन इंजिनिअर म्हणजे Hans Ledwinka.

हा हिटलरचा आवडता इंजिनिअर! पुढे हिटलरने ऑस्ट्रियावर हल्ला केला तिथल्या सर्व कारखान्यांवर कब्जा केला आणि Ledwinka च्या सर्व designs वर बंदी घातली. फोक्सवॅगनने १९६१ साली त्या कंपनीला कोर्टाच्या बाहेर पैसे देऊन हे प्रकरण मिटवले.

साठच्या दशकात “Think Small” असं एक campaignच फोक्सवॅगनसाठी करण्यात आलं. आणि बीटल ही अमेरिकेतली सर्वात जास्त विकली जाणारी विदेशी कार ठरली!

बीटलला अमेरिकन लोक स्पोर्ट्स कार म्हणून सुद्धा विकत घेऊ लागले.

१९७२ साली बीटल कार मेक्सिकोच्या रस्त्यांवर हिरव्या आणि पांढऱ्या रंगात टॅक्सी म्हणून धावू लागली. २०१२ साली तिने प्रवाशांच्या सेवेतून निवृत्ती घेतली.

 

beetle-taxi1-inmarathi

 

आता जगभर आर्थिक सुबत्ता आलीये. लोक आता फोक्सवॅगन ऐवजी बेंटले सारख्या गाड्यांना प्राधान्य देतात. पण विरोधाभास असा आहे की आता फोक्सवॅगनने बेंटलेची मालकी घेतलीये! पण बेंटलेसारखी elite कार घेणं हे बऱ्याच लोकांना रुचत नाही.

त्यामुळे बेंटले ही “People’s Car” होऊ शकत नाही. नावाप्रमाणेच फोक्सवॅगन ही कंपनी “लोकांची कार” ठरली.

२०१९ साली बीटलचं production बंद होणार अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झालीये.

 

beetle-new1-inmarathi

 

खूप कमी कार आहेत ज्या बीटल इतक्या फेमस झाल्या. एका बोहेमिअन इंजिनिअरची हुशारी आणि एका (तथाकथित!) क्रूरकर्म्याच्या डोक्यातली संकल्पना….

मोठं अजब रसायन ठरलं फोक्सवॅगनची “बीटल” म्हणजे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?