' विसराळू असाल तर स्वतःला दोष देण्याऐवजी जाणून घ्या त्याचे हे ७ फायदे! – InMarathi

विसराळू असाल तर स्वतःला दोष देण्याऐवजी जाणून घ्या त्याचे हे ७ फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अशी काही माणसं असतात ज्यांना स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल अभिमान असतो. या स्मरणशक्तीचा वापर शालेय स्तरावर किंवा समाजातील एक घटक म्हणून वावरत असताना निश्चितच होत असतो.

पण खरंतर प्रत्येक घटनेतील अगदी छोट्यात छोटी बाब, शाळेत शिकलेली छोट्यात छोटी गोष्ट लक्षात ठेवणं हे अगदीच अशक्य असतं.

जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विसरता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागतो. वाणसामानाच्या दुकानात उभं राहून आपण नेमकं काय घ्यायला आलो होतो याबद्दल तुम्ही ब्लँक होऊन जाता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या स्मरणशक्तीवर शंका यायला लागते.

 

forgetting-inmarathi
eedle.com

कधीकधी आपण घरातल्या घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत एखादी वस्तू आणायला जातो. त्या दोन सेकंदात आपण नेमकं काय आणायला आलो आहोत याचा आपल्याला विसर पडतो आणि आपली प्रचंड चिडचिड होते.

इतक्या साध्या साध्या गोष्टी आपण कशा विसरतो याबद्दल आपल्याला कमीपणा वाटायला लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की असं का होतं. पण टेन्शन नॉट… पॉल फ्रॅन्कलँड आणि ब्लेक रिचर्ड या टोरोंटो युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी याबद्दल संशोधन केले आहे.

या संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की मेंदूतील जुन्या आठवणी शब्दशः पुसल्या जाऊन त्यांची जागा नवीन आठवणी घेत असतात. खरंतर जुन्या आठवणींचे ठसे आपल्या मनावर असतात. ते पूर्णतः पुसले जात नाहीत. पण ते प्रसंग संपूर्णपणे लक्षातही नसतात. ते धूसर होत जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एका संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती ही त्या व्यक्तीच्या उच्च बुद्धिमत्तेशी जोडली जाते हे गैर आहे. खरंतर हे याच्या विरुद्ध असते. सर्वसामान्यपणे चांगली स्मरणशक्ती = उच्च बुद्धिमत्ता हे समीकरण मानले जाते.

मात्र अधिक उपयुक्त आणि फायदेशीर असते ते एखाद्या मोठ्या घटनेचा गाभा आणि त्याला अनुसरून ढोबळमानाने तो प्रसंग लक्षात ठेवणे आणि त्यातील बारीकसारीक तपशील विसरून जाऊन मेंदूतील जागा इतर गोष्टींसाठी रिकामी ठेवणे.

 

memory-inmarathi
brainfacts.org

रिचर्ड हा संशोधक CNN वाहिनीवरील आपल्या मुलाखतीत म्हणतो, “मेंदू हा अनावश्यक तपशील विसरून जातो आणि तुम्हाला ज्या गोष्टी भविष्यात निर्णय घ्यायला उपयोगी पडतील अशा संदर्भांचे जतन करतो. हे मेंदूचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.

आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाची एक सूक्ष्म यंत्रणा असते आणि ती आपल्या मेंदूत आठवणींचे जतन करण्याचे कार्य करते. ही आठवणींचे जतन करण्याबरोबरच अनावश्यक असा आठवणींचा भाग पुसून टाकण्याचे सुद्धा काम करते जेणेकरून तुम्ही अधिक महत्त्वाच्या बाबींवर तुमचे लक्ष केंद्रित करू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक प्रभावीपणे योग्य तो निर्णय घेऊ शकता.

ही प्रक्रिया होत असताना नेमके काय होत असते? तुमचा मेंदू तुमच्या जुन्या अनावश्यक आठवणींची जागा ही नवीन आवश्यक अशा आठवणींनी व्यापून टाकत असतो. ज्या मेंदूमध्ये आठवणींची गर्दी असते तो मेंदू योग्य रीतीने प्रभावी निर्णय घेऊ शकत नाही.

म्हणजेच अनेक आठवणींचा गुंता असलेल्या मेंदूची निर्णयक्षमता कमी असते कारण तो खूप गोष्टी विचारात घेतो आणि स्वतःतच गोंधळ निर्माण करतो.

 

confusion-inmarathi
imlive.com

रिचर्ड सांगतात, “खेळामुळे हिप्पोकॅम्पस मधील न्यूरॉन्सची संख्या वाढते. तुमच्या आयुष्यातील बारीकसारीक अनावश्यक आठवणी तुम्हाला प्रभावी आणि योग्य निर्णय घेण्यापासून रोखतात.

जैविकदृष्ट्या म्हणायचे तर आदिम काळातील मानवाला जगण्यासाठी, आहे त्या परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी कित्येक बारीकसारीक तपशील लक्षात ठेवणे भाग होते.

त्यामुळे मेंदूला तसं बारीक लक्ष ठेवण्याची, एखाद्या गोष्टीचे सखोल निरीक्षण करण्याची सवय होती.

त्यामुळे तेव्हा मेंदूचा तसा विकास झाला. मात्र गेल्या काही वर्षांतील तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, माणसाला प्रत्येक गोष्टीचे बारीकसारीक तपशील लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही.

त्यापेक्षा आजच्या काळातील लोकांना गुगल कसे काम करते, त्याच्यावर गोष्टी कशा शोधायच्या हे माहीत असून पुरते. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट विसरलात तरी ती गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायचे काम आंतरजाल म्हणजेच इंटरनेट अगदी चोख करते. त्यावर तुम्ही एखादी गोष्ट सहजपणे शोधू शकता.

 

google-search-inmarathi
www.pcmag.com

त्यामुळे तुम्ही अगदी लक्षात रहायलाच हव्यात अशा गोष्टी जर विसरत असाल किंवा तुमच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या घटना जर तुम्हाला आठवत नसतील तरच ही गंभीर बाब आहे. नाहीतर एखाद्या घटनेचे तपशील कालांतराने विसरणं हे अगदीच सामान्य बाब आहे.

या छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याबद्दल तुम्ही स्वतःला कमी तर लेखू नकाच तर उलट शाबासकीच द्या की तुमचा मेंदू तुम्ही हवं त्या गोष्टी साठवण्यासाठी वापरत आहात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?