' “तुला इंजिनिअरिंग पास होऊ देणार नाही” : तापसी पन्नूची कारकीर्द अगदीच रंगीबेरंगी आहे! – InMarathi

“तुला इंजिनिअरिंग पास होऊ देणार नाही” : तापसी पन्नूची कारकीर्द अगदीच रंगीबेरंगी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

बॉलिवूड मध्ये नाव कमावलेल्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये कशा आल्या? तर बऱ्याचशा अभिनेत्री “अप्रतिम सौंदर्य” आणि “नृत्य कलेचे कसब” ह्या दोन गोष्टींमुळे व त्यांनी त्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे आल्या असे म्हणावे लागेल.

जुन्या चित्रपटातल्या अभिनेत्रींना फक्त सौंदर्यावर चित्रपटात काम मिळायचे. कारण त्यावेळी चित्रपटात काम करणं हे चांगलं समजलं जात नव्हतं. त्यामुळे अभिनेत्री व्हायला कुणी तयार होत नसत.

त्यानंतर अनेक सुंदर सुंदर अभिनेत्री लागोपाठ चित्रपटात झळकायला लागल्या. सुंदरता, नृत्य याशिवाय त्यांच्यात असलेले अभिनय नैपुण्य हेही त्यांच्या प्रसिद्धीचे कारण ठरायला लागले.

काही अभिनेत्री मिळेल ते काम करायच्या, पण काही भूमिका पारखून कामे करत.

आजही चांगल्या नायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. काही फक्त कला सादर करणाऱ्याच चित्रपटात काम करतात. तर काही बहारदार नृत्य सादर करण्यासाठी त्या त्या भूमिका करतात.

अनेक अभिनेत्री अशा आहेत की त्या अतिशय रूपवान नाहीत पण जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्या आज ह्या क्षेत्रात प्रसिद्ध झाल्या.

अशीच एक अभिनेत्री जिने स्वप्नात सुद्धा स्वतः कोणत्या चित्रपटात काम करून प्रसिद्ध होईन अशी इच्छा प्रकट केली नव्हती.

२०१५ साली आलेला एक हिंदी चित्रपट त्याचं नाव होतं “बेबी”.

ह्या चित्रपटाचा नायक होता ‘अक्षय कुमार’ आणि ह्याच चित्रपटात अवघ्या अर्ध्या तासाचा रोल ह्या अभिनेत्रीने केला होता. पण अक्षय कुमारपेक्षा जास्त लोकांची वाहवा मिळवली होती.

ती अभिनेत्री होती तापसी पन्नू.

tapasi-baby-inmarathi

 

कोणालाही हे नाव माहिती नव्हतं पण पहिल्याच चित्रपटात हिने आपलं नाव मोठं केलं एका छोट्या रोल मधून.

त्यानंतर आलेल्या आणि चिरस्मरणात राहील अशा “पिंक”.

ह्या चित्रपटात “अमिताभ बच्चन” ह्यांच्याबरोबर तिने उत्कृष्ट भूमिका केली आणि लोकांची आवडती नायिका झाली.

त्यानंतर तिचे “गाजी अटॅक” आणि “नाम शबाना” हे दोन चित्रपट लागोपाठ येऊन धडकले आणि ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झाली.

२०१० साली तापसीने आपल्या सिने करिअरला सुरुवात केली.

आधी तिला तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये कामे मिळाली. दिल्लीमध्ये मोठ्या झालेल्या ह्या अभिनेत्रीला तेलगू आणि तामिळ भाषांचा गंध सुद्धा नव्हता.

पण तिच्या अभिनयाने तिला तिकडे प्रसिद्धी मिळाली आणि तेलगू, तामिळ चित्रपटासाठी तिला मागणी आली.

पण हे चित्रपट केल्यावर डबिंगला तिला फार त्रास व्हायचा कारण भाषा अवगत नव्हती. साउथचा सुपर स्टार धनुष बरोबर तिने एक चित्रपट केला त्याचं नाव “आदुकलम”. ह्या चित्रपटाला ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

पण तापसीला ह्यातला एकही पुरस्कार मिळाला नाही. २०११ हे वर्ष तापसीला फारच चांगले गेले.

तिचे एकामागून एक असे ७ चित्रपट रिलीज झाले. अशा ह्या अभनेत्रीची ह्या क्षेत्रात येण्यापूर्वीची कहाणी फारच गमतीदार आहे.

दिल्लीतल्या एका पंजाबी घरात जन्मलेली तापसी कधी चित्रपटात काम करेल असे कधीही तिला वाटलं नव्हतं.

 

tapsi-punjabi-inmarathi
timesofindia.com

ती इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून मॉडेलिंग करायला तयार झाली आणि तिला अनेक कामे मिळाली.

रीलायन्स ट्रेन्डस, डाबर, कोका कोला, पँटलून, स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक, वर्धमान, एअरटेल, टाटा डोकोमो अशा अनेक कंपन्यांच्या जाहिरातीत ती झळकली.

त्यामुळेच तिला साऊथ च्या चित्रपटांसाठी मागणी आली. पण त्यावेळी तिचं शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं. म्हणून तिच्या वडिलांनी ह्या साऊथच्या चित्रपटात काम करण्यासाठी तिला परवानगी दिली नाही. पण दिल्लीतच राहून तिचे मॉडेलिंगचे काम चालू होते.

तापसी शालेय शिक्षण घेत असतानाही ९०% पेक्षा कमी गुण कधीही पाहिले नाहीत. त्यामुळे ती इंजिनिअरिंगकडे वळली.

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात तिला मॉडेलिंगच्या जास्त ऑफर्स येत होत्या त्यामुळे तिचे प्रोफेसर नाराज होते.

त्यांनी तर तिला धमकीच दिली की

“तू लास्ट सेमिस्टर कशी पास होते ते आम्ही बघतोच!”

तापसी जरा घाबरलीच. पण नंतर तिने तिच्या अनेक मैत्रिणींना एकत्र आणून एक मोठा प्रोजेक्ट बनवायचं ठरवलं त्या सगळ्यांनी मिळून Font Swap नावाचे एक iPhone Application तयार केले. त्या त्यांच्या प्रोजेक्टला दुसरा क्रमांक मिळाला आणि प्रोफेसर ने दिलेली धमकी हवेत विरून गेली.

दरम्यानच्या काळात तेलगू, तामिळ निर्मात्यांचे फोनवर फोन तापसीला येत होते. इकडे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यामुळे तापसीने साऊथच्या फिल्म करायला होकार दिला आणि बऱ्याच फिल्ममध्ये तिला काम मिळाले.

 

tapsi-pannu-inmarathi

 

साउथच्या लोकांबद्दल तापसीला विचारले असताना ती म्हणाली ते लोक फार चांगले आहेत. मला अतिशय रिस्पेक्ट देतात. मी कामाच्यावेळी व्हॅनिटीमधून सेटवर जाताना सगळे बाजूला होऊन जाण्यासाठी रास्ता मोकळा करतात.

मी सेटवर जोपर्यंत उभी असते तोपर्यंत तेही सगळे उभेच असतात. इतका रिस्पेक्ट ते लोक मला देतात.

फक्त मला डबिंग करताना भाषेच्या अडचणीमुळे वेळ लागतो. एकदा तर एका चित्रपटाच्या काही सीन्सच्या डबिंगसाठी मला आठ दिवस लागले.

अशी ही तापसी पंजाबमधून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आवडती नायिका म्हणून प्रसिद्ध झाली. ती आता अनेक हिंदी चित्रपटातही झळकते आहे. सलमानच्या जुडवाच्या रीमेक मध्ये वरूण धवन बरोबर चमकली आहे.

“नाम शबाना” ह्या चित्रपटाची ‘शबाना खान’ ही मुख्य नायिका म्हणून तापसीने तिचे अभिनय कौशल्य लोकांना दाखवलेच आहे. अशी ही स्वतःच्या कलागुणांनी चमकणारी अभिनेत्री निश्चितच पडद्यावर पाहायला सगळ्यांनाच आवडत असेल.

हो की नाही?

Tapsee pannu hot inmarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?