'तुरुंगाच्या कडेकोट सुरक्षेवर मात करणाऱ्या ५ जणांची पिक्चर सारखी स्टोरी जाणून घ्या

तुरुंगाच्या कडेकोट सुरक्षेवर मात करणाऱ्या ५ जणांची पिक्चर सारखी स्टोरी जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारतातले मोठे तुरुंग आणि त्यातली तुरुंग व्यवस्था, सुरक्षितता हा कायम चर्चेचा विषय असतो. वर्तमानपत्रात सकाळी सकाळी बातमी असते, अमुक अमुक तुरुंगातून अट्टल गुन्हेगार ‘अमुक’, ह्याचे तुरुंग अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पलायन..शोध मोहीम जारी…

ज्या गुन्हेगाराला इतके कष्ट घेऊन पोलीस यंत्रणेने शोधून काढले, त्याचे सगळे पुरावे गोळा करून कोर्टात सादर करून ते गुन्हे सिद्ध केले, तो गुन्हेगार स्वतःच्या क्लुप्त्या वापरून सहज सुटून पळून जातो.

 

tees-mar-khan-inmarathi

 

अशा कितीतरी हास्यास्पद गोष्टी घडतात, ह्या वाचताना त्या गुन्हेगाराचेच कौतुक करावेसे वाटते. आपल्या सरकारी यंत्रणेचे मात्र वाभाडे निघतात.

तरी सुद्धा परत परत असल्याच बातम्यांनी वर्तमानपत्रांचा खप वाढलेला दिसतो. ताजी बातमी म्हणून परत तशीच घटना घडते आणि परत ठळक अक्षरात छापली जाते.

आपल्या देशाच्या इतिहासात असे अनेक गुन्हेगार तुरुंगातून पळून गेले, काही तर परत कधीही पोलिसांच्या हाती लागलेच नाहीत. तर काही पोलिसांच्या हाती लागून तुरुंगवास भोगत असताना परत पळून जाण्यात यशस्वी ठरले. आता बोला….

असेच ५ अट्टल गुन्हेगार तुरुंगातून कसे कसे पळाले ह्याची मजेशीर माहिती वाचाच…

१. पहिला अट्टल गुन्हेगार होता ‘शेर सिंह राणा’

हा फारसा माहिती नसणारा एक गुन्हेगार होता. पण त्याने एक खून केला आणि तो लगेचच  प्रसिद्ध झाला.

२००१ साली त्याने प्रसिद्ध गुन्हेगार ‘ फुलन देवीचा’ खून केला आणि सरकार दरबारी अट्टल गुन्हेगार म्हणून नावारूपाला आला. हे घडलं असं की ह्या शेरसिंहला आपल्या विरुद्ध असणाऱ्या गुन्हेगारांना काहीतरी मोठा थरारक गुन्हा केल्याचं दाखवायचं होतं. म्हणून त्याने हा खून केला.

 

sher singh rana InMarathi

त्याचे विरोधक त्याला घाबरून दूर झाले, पण पोलीस त्याला शोधत आले आणि शेरसिंहला अटक केले. त्याला मोठ्या गुन्हेगाराच्या खुनामुळे मोठ्या तुरुंगात म्हणजे तिहार तुरुंगात ठवण्यात आले.

लगेचच त्याच्या डोक्यात तिहार तुरुंगातून पळून जाण्याचे विचार सुरू झाले. त्याचा भाऊ त्याला तुरुंगात भेटायला येत होता, त्या दोघांनी सुटकेचा प्लॅन तयार केला. रुरकी जवळ असलेल्या शेरसिंहच्या गावात एक शिकलेला संदीप ठाकूर नावाचा माणूस होता त्याने ह्या प्लॅन मध्ये शेरसिंहला मोठी मदत केली.

 

jail-plain InMarathi

शेरसिंहला भेटायला तो चारवेळा तिहार तुरुंगात आला. त्यातल्या तीनवेळा तो वकील म्हणून आला त्यावेळी त्याने नाव वेगळे सांगितले Advocate -Pradeep Thakur असे नाव सांगितले. आणि एकदा वेळ बदलून शेरसिंहचा मित्र म्हणून भेटून गेला.

नंतर तो पोलीस अधिकारी म्हणून तिहार तुरुंगात सगळे कागदपत्रे आणि एका पोलीस हवालदाराला बरोबर घेऊन आला. ते सगळे दाखवून त्याने तुरुंग अधिकाऱ्याकडून शेरसिंहचा ताबा घेतला आणि ते तिघे कोर्टात जाण्याच्या बहाण्याने तुरुंगातून बाहेर पडले ते परत कोणाला सापडलेच नाही.

Inmates at correctional service

नंतर त्या कागद पात्रांची शहानिशा झाली तेव्हा त्या तुरुंग अधिकाऱ्यांना कळले की त्याने दिलेले सगळे कागद पत्र खोटे होते. हुबेहूब कोर्टात हजर करण्याचे कागद तयार केले होते आणि ह्याची पूर्ण तयारी करूनच त्याने शेरसिंहची सुटका करून त्याला पळवून नेले.

२. दुसरा अट्टल गुन्हेगार होता पंजाबचा जगतारसिंह हवारा

खलिस्तान चळवळीतला महत्वाचा नेता. पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंह ह्यांच्या खुनाचा साथीदार म्हणून त्याला दोषी ठरवून चंदीगडच्या बुरेल तुरुंगात त्याची रवानगी झाली होती. ३१ ऑगस्ट १९९५ मध्ये बियांतसिंग ह्यांचा खून झाला होता.

 

अतिशय धूर्त आणि चळवळ्या असलेला हा माणूस तुरुंगात एक दिवस सुद्धा शांत बसला नाही. त्याने तुरुंगातून खोदकाम करून एक ३५ फूट लांबीचा भुयारी मार्ग स्वतःच्या हातांनी खणून तयार केला पण तो पुढे त्याला खणता आला नाही आणि त्याचे श्रम वाया गेले.

नंतर पुन्हा त्याने गुरुद्वारा बराकच्या खालून खणायला सुरुवात केली पण तिचाही त्याला उपयोग करायच्या आधीच त्याला दुसरीकडे हलवले गेले.

तिथेही त्याने त्याच्या तीन सहकारी गुन्हेगारांना हाताशी धरून त्या खोलीतून ८ फूट खोल आणि १०८ फूट लांब असा लांब भुयारी मार्ग तयार केला. हा मार्ग दोन सुरक्षा चौक्यांच्या पुढे आणि मुख्य शेवटच्या सुरक्षा भिंतीच्या बाहेर २० मीटर पुढे उघडला जाईल असा खोदला.

त्यातून बाहेर पडल्यावर वॉच टॉवर पासून १० मीटर लांब राहील असा मार्ग तयार केला आणि २१जानेवारी २००४ च्या भल्या पहाटे जगतारसिंह हवारा आणि त्याचे तीन साथीदार त्या तुरुंगातून ह्या भुयारी मार्गाने बाहेर पडले ते परत कोणालाही दिसले नाही.

 

jagatsingh-hawara-inmarathi

३. तिसरी घटना म्हणजे ८ गुन्हेगारांची बिहार मधली एक गँग तुरुंगातून पळून गेली.

ऑगस्ट २००२ सालची पश्चिम चंपारणच्या बेट्टीआह तुरुंगातली ही घटना. चोऱ्या, दरोडे, बलात्कार, मारपीट ह्या अनेक गुन्ह्यात सतत धुडगूस घालणारी ही ८ अट्टल गुन्हेगारांची गँग पकडली गेली आणि त्यांची चंपारणच्या बेट्टीआह तुरुंगात रवानगी झाली.

bihar-jail_InMarathi


तिथे तुरुंगात ह्या आठ जणांनी शक्ती आणि डोक्याचा वापर करून तुरुंगाच्या दरवाज्याच्या लोखंडी सळया हक्सो ब्लेडने कापून माणूस बाहेर पडेल एवढी जागा तयार केली. हे काम त्यांनी रात्री केले. कापताना आवाज होऊ नये म्हणून त्यांनी सळईला ग्रीस लावले.

एका रात्रीत तुरुंगाची भिंत दोरीच्या साहाय्याने चढून पलायन केले. त्यातला शेवटचा गडी पकडला गेला पण ७ जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

४. चौथे महाशय म्हणजे सगळ्यांना परिचित असलेलं नाव ‘चार्ल्स सोभराज’.

मूळ थायलंडचा रहिवासी. भारतात स्मगलिंग करण्यासाठी आला. पैशाची अफरातफर, स्मगलिंग, मर्डर, अशा अनेक गुन्ह्यात तो अट्टल गुन्हेगार म्हणून ओळखला गेला.

थायलंड आणि भारत ह्या दोन देशात त्याने एकूण १२ खून केले. त्यासाठी भारतीय पोलिसांनी त्याला शोधून काढले आणि न्याय व्यवस्थेने त्याला तुरुंगात डांबून १८ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

 

charles-sobhraj1-inmararhi
gqindia.com

तिकडे थायलंडच्या पोलिसांनासुद्धा तो हवा होता . पण भारतीय न्यायाप्रमाणे परदेशी गुन्हेगाराने प्रथम भारतात शिक्षा भोगायची असते. नंतर त्याला त्याच्या देशात न्याय व्यवस्थेच्या स्वाधीन केले जाते. म्हणजे १८ वर्षे भारतातच राहून त्याला शिक्षा भोगायची असे त्याला कळविण्यात आले.

थायलंडच्या न्याय व्यवस्थेचा वेगळाच नियम होता की जर गुन्हेगार पुढच्या २० वर्षात न्यायालयात हजर झाला नाही तर त्याच्यावरचे सगळे गुन्हे काढून टाकले जातात आणि तो सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे पुढील आयुष्य जगू शकतो.

ही गोष्ट चार्ल्स सोभराजला माहिती झाली. त्यामुळे त्याच्या सुपीक डोक्यात एक प्लॅन तयार झाला. त्याने त्याचा एक मित्र डेव्हिड हॉल ह्याला काही फळे आणि मिठाई गुंगीचे औषध घालून तुरुंगात पाठवायला सांगितली.

ही मिठाई चार्ल्स सोभराजने संपूर्ण तुरुंगातल्या शिपाई आणि अधिकाऱ्यांना वाटली. प्रेमाने वाटलेली ही मिठाई सगळ्या अधकार्यांनी आणि शिपायांनी खाल्ली आणि ते सगळे गुंगून झोपी गेले. हा हुशार चार्ल्स तुरुंगाच्या गेट नंबर ३ ने सहज बाहेर पडला, गायब झाला.

नंतर तुरुंगात मोठा हाहाक्कार झाला, वर्तमानपत्रात बातम्या आल्या चार्ल्स शोभराज तुरुंगातून पळाला.

हा चार्ल्स नुसता पळाला नाही तर एक आठवडा लपून बसला. एक आठवड्यानंतर गोव्याला गेला तिथल्या एका बारमध्ये जाऊन त्याने पोलिसांना सोभराज गोव्यात बारमध्ये आहे अशी खबर दिली.

चपळ पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केली. आणि न्यायालयात उभे केले. पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने त्याला आणखी दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा वाढवून दिली.

सोभराजला हेच पाहिजे होते. एकूण २० वर्षे तो भारतातच शिक्षा भोगणार होता. आणि २० वर्षानंतर तो त्याच्या देशात जाणार होता. तोपर्यंत त्याच्यावरचे गुन्हे काढून टाकले जाणार हे त्याला माहिती होते म्हणून त्याने हा सगळा प्लॅन करून पलायन करून परत अटक करवून घेतली.

 

charles-sobhraj2-inmararhi
indianexpress.com

५. नटवरलाल

हा पाचवा हुशार, केबाज, धूर्त, पण अट्टल गुन्हेगार. “मिथिलेशकुमार श्रीवास्तव” ऊर्फ “नटवरलाल”.  हा बिहार मधल्या सिवन जिल्ह्यातल्या बांगरा नावाच्या गावात जन्मला आणि शिकून सवरून वकील झाला.

व्यवसायाने वकील असलेला मिथिलेशकुमार, नाटवरलाल ‘पैशाने खूप श्रीमंत असलेल्या लोकांना हेरायचा’ आणि त्यांची फसवणूक करून पैसे लुबाडायचा. अशा अनेक लोकांना लुबाडल्यावर तो सराईत गुन्हेगारच झाला. स्वतःच्या नसलेल्या अनेक इस्टेटीचे त्याने मोठे मोठे सौदे केले आणि लोकांना हातोहात फसवलं.

त्याची फसवणुकीची मजल इथपर्यंत गेली की लाल किल्ला, ताजमहाल माझ्याच ताब्यात आहेत आणि ते विकण्याचे सौदे त्याने अनेकवेळा केले. पण पकडला गेला आणि न्यायालयाने त्याला “११३ वर्षांची कैद ” शिक्षा सुनावली.

ह्या ११३ वर्षांच्या कैदेत तो एकूण ९ वेळा तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. म्हणजे फसवणुकीचा बादशहा असाच ‘किताब त्याला देत येईल. बेमालूमपणे खोटे बोलून लोकांनाच काय तर पोलिसांना सुद्धा ह्याने अनेक वेळा फसवले.

 

fraud-natwarlal-inmarathi
indiatimes.com

तब्येत खराब झाल्याच्या बहाण्याने तुरुंगातून बाहेर पडल्यावर अनेकवेळा तो पळून गेला. अगदी त्याचा वयाच्या ८४ व्या वर्षी कानपुर तुरुंगातून त्याला दवाखान्यात तपासणीसाठी नेताना त्याने पळ काढला.

दिल्ली स्टेशनवर त्याच्याबरोबर असलेले दोन पोलीस एका झाडूवल्याकडे त्याला सोपवून पान खायला गेले. तेवढ्या वेळात ह्या नाटवरलालने त्या झाडूवल्याला चहा आणायला सांगितले. समोर असलेल्या चहाच्या स्टॉलकडे झाडूवाला वळला तेवढ्यात हा नाटवरलाल गर्दीचा फायदा घेऊन गर्दीत पसार झाला..वयाच्या ८४ व्या वर्षी….

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “तुरुंगाच्या कडेकोट सुरक्षेवर मात करणाऱ्या ५ जणांची पिक्चर सारखी स्टोरी जाणून घ्या

  • January 20, 2019 at 8:16 pm
    Permalink

    भन्नाट

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?