' भारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

भारतीय रेल्वेच्या RORO सेवेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही एखादी भलीमोठी ट्रेन तर पाहिलीच असेल ज्यावर रांगेत ट्रक उभे असतात. इतकी भली मोठी आणि वेगळ्या प्रकारची ट्रेन पाहून मनात कुतुहूल जागं होणं साहजिकच आहे. हे एवढे ट्रक जातात कुठे? आले कुठून? रस्ता असताना ट्रेनवरून यांना कुठे घेऊन जाण्यात येत आहे?

असे एक ना अनेक प्रश्न मन अगदी अस्वस्थ करून सोडतात. अजूनही तुम्ही या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहात तर तुमची ही प्रतीक्षा आज इथे संपली असे म्हणण्यास हरकत नाही.

 

indian-railway-roro-service-marathipizza01

स्रोत

फारच कमी जणांना भारतीय रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या RORO सेवेबद्दल माहिती असेल. या सेवेला  Roll On Roll Off service असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेतर्फे ही सेवा कोकण रेल्वेवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोकणातून दक्षिणेकडे जायचे असल्यास किंवा दक्षिणेतून कोकणात यायचे झाल्यास आपल्याला जवळच्या एकाच मार्गाचा वापर करावा लागतो, तो मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग होय. परंतु हा महामार्ग देशातील काही कठीण आणि खडतर महामार्गांपैकी एक समजला जातो.

याचे पहिले कारण म्हणजे या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे आणि दुसरे कारण म्हणजे हा महामार्ग कोकणातील घाटरस्त्यांमधून काढण्यात आला आहे. त्यामुळे अवजड ट्रक घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना या मार्गावर ट्रक चालवण्यात बरीच अडचण येते.

विशेषत: पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे असते.

या अश्या ट्रक चालकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने २६ जानेवारी १९९९ रोजी RORO सेवेला सुरुवात केली. या सेवेंतर्गत भलेमोठे अवजड ट्रक ट्रेनवर चढवून त्यांना कोकण रेल्वेच्या मार्गाने दक्षिणेत आणले जाते किंवा दक्षिणेतून कोकण रेल्वेच्या मार्गाने कोकणाच्या पलीकडे पोचवले जाते.

 

indian-railway-roro-service-marathipizza02

स्रोत

कोकण रेल्वेवर सध्या दोन RORO मार्ग आहेत

  • कोलाड ते वेरना- अंतर ४१७ किमी
  • कोलाड ते सुरथकाल- अंतर ७२१ किमी

कोलाड ते वेरना या मार्गावरून ट्रक वाहून नेण्यासाठी ट्रेनला १२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो, हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास २२ तास लागतात.

दुसरीकडे कोलाड ते सुरथकाल अंतर पार करण्यासाठी ट्रेनला २२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो आणि हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास ४० तास लागतात.

RORO सेवा ट्रक्सला कोलाड, वेरना आणि सुरथकाल या स्थानकांवर सोडते. तेथून पुढे हे ट्रक्स इच्छीत स्थळी आपला प्रवास पुन्हा रस्ते मार्गाने सुरु करतात.

 

indian-railway-roro-service-marathipizza03

स्रोत

महत्त्वाची गोष्ट म्हणजे RORO सेवा ही रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा बरीच स्वस्त पडते. तसेच प्रदुषण देखील होत नाही. या सेवेमुळे वर्षाला जवळपास ५० लाख लिटर डीजेलची बचत होते.

रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसतो. अपघातांचे प्रमाण घटते. तसेच ट्रक चालकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचवू शकतात.

RORO सेवेंतर्गत दिवसाला ३ ट्रेन चालवल्या जातात. प्रत्येक ट्रेनवर ५० ट्रक चढवले जातात. या सेवेमुळे भारतीय रेल्वेला वर्षभरात करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते.

 

indian-railway-roro-service-marathipizza04

 

भारतीय रेल्वेबद्दल आणखी एक आगळीवेगळी गोष्ट जाणून घेतल्यावर ज्ञानात अजून थोडी भर पडली की नाही!?

अजून ज्ञान हवे असेल तर हे देखिल वाचा:

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का बरं दिलेला असतो?

रेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकली जाते?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?