लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देत कणखर बाण्याने प्रत्येक गोष्टीला सामोरा जाणारा लोहपुरूष म्हणजे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ होय. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील जगाला त्यांची ओळख आहे.

३१ ऑक्टोंबर १८७५ रोजी जन्मलेल्या सरदार पटेलांनी जन्मभर भारतमातेच्या कल्याणासाठीच आयुष्य वेचत १५ डिसेंबर १९५० रोजी अखेरचा श्वास घेतला. हे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगीच म्हणावी लागेल.

 

sardar-patel-marathipizza01

स्रोत

अश्या या थोर पुरुषाबद्दल आज काही रंजक गोष्टी जाणून घेऊया:

१) पटेलांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी गुजरातमधील गोध्रा, बोरसाड आणि आनंद येथे कायद्याचा अभ्यास केला. बार परीक्षा पास झाल्यावर त्यांनी आपल्या वरिष्ठ वकिलांकडून पुस्तके उसनी घेतली होती.

२) वयाच्या ३६ व्या वर्षी सरदार पटेल यांनी इंग्लंड गाठले आणि बॅरिस्टरसाठी असणाऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यांनी ३६ महिन्यांचा अभ्यासक्रम ३० महिन्यांतच पूर्ण करून दाखवला

 

sardar-patel-marathipizza02

स्रोत

३) स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत जेव्हा सरदार पटेलांनी सहभाग घेतला, तेव्हा त्यांना ना राजकारणात रस होता, ना गांधीच्या विचारधारेत. परंतु गोध्रा येथे त्यांची आणि गांधीची भेट झाली तेव्हा ते प्रभावित झाले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सरदार पटेलांना गुजरात सभेचे सचिव पद देण्यात आले. इथूनच सरदार पटेल एक राजकारणी म्हणून घडत गेले.

४) गांधीच्या सांगण्यावरून पटेलांनी नोकरी सोडली आणि खेड्यामधील कर मुक्तीच्या आंदोलनात ते सक्रीयरीत्या सहभागी झाले.

 

sardar-patel-marathipizza03

स्रोत

५) गांधींच्या असहकार चळवळीच्या निमित्ताने सरदार पटेलांनी पश्चिम भारताचा दौरा केला आणि तब्बल ३००० सदस्यांना चळवळीत सहभागी करून घेतले. तसेच पक्षनिधीसाठी त्यांनी त्याकाळी जवळपास १५ लाखाचा निधी स्वत:हून गोळा केला.

६) गुजरात राज्यातील व्यसनाधीनता, अस्पृश्यता, जातीभेद आणि महिलांवरील अत्याचार या समस्यांविरुद्ध त्यांनी स्वत: पुढाकार घेत नेटाने लढा दिला.

 

sardar-patel-marathipizza04

स्रोत

७) जेव्हा महात्मा गांधींना अटक झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा फडकावण्यावर ब्रिटिशांनी घातलेल्या बंदीच्या कायद्याविरोधात १९२३ साली नागपूर मध्ये सुरु केलेली सत्याग्रह चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी सरदार पटेलांना देण्यात आली.

८) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी अतिशय मोलाचे योगदान देत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

 

sardar-patel-marathipizza05

स्रोत

सरदार पटेलांना टीम इनमराठीतर्फे भावपूर्ण नमन !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?