' खळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही

खळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आपण जाहिरातींशिवाय टीव्हीचा विचार करू शकतो? टीव्हीवर, थेटरमध्ये सिनेमा बघताना किंवा इतर कुठलाही कार्यक्रम बघताना कार्यक्रमाच्या वेळा पेक्षाही जास्त वेळ तर जाहिराती दिसतात.

काही जाहिराती तरी अशा असतात ज्या फार सुंदरपणे आपलं प्रॉडक्ट विकतात, काही कुठेतरी मनाला स्पर्श करतात तर काही जाहिराती खळखळून हसवतात.

इतक्या वर्षानंतर या जाहिराती आयुष्याचा एक भाग झाल्यात हे मात्र नक्की. आज याच निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा काही जाहिराती आपल्याला मनापासून हसवतात..

 

१. पीएनबी मेटलाइफ इन्शुरन्स

भारतात बोल चमुरे टाईप्स मधल्या जाहिराती बघण्याची सवय आहे पण या पारंपरिक पद्धतीचा मेटलाइफ ने जो काही वापर करून घेतला त्याला तोड नाही .एक असाच रस्त्यावर खेळ करणारा जादूगर जाहीर करतो की मी आता माणसाचं कबुतर आणि कबुतराचा माणूस करून दाखवतो बघा.

 

एका परिवार वाल्या माणसाला तो कबूतर करतोच पण तितक्यात फुग्याचा फुटण्याचा आवाज येतो आणि कबूतर उडून जातं.

इथे टॅगलाईन येते ANYTHING CAN HAPPEN IN LIFE, GET INSURED. इन्शुरन्स विकण्याची इतकी सुंदर जाहिरात तरी अजून पर्यंत आलेली नाही.

 

२. कॅम्लिन व्हाईट बोर्ड्स and मार्कर्स:

आपल्या स्टेशनरी प्रोडक्ट साठी प्रसिद्ध असलेले कॅम्लीन जाहिरातींमध्ये पण तितकीच विविधता ठेवते. कॅम्लिनचे मार्कर्स आणि बोर्ड च्या जाहिराती बघितल्या तर माणूस खूप खळखळून हसू शकतो.

 

हे ही वाचा – भलत्याच प्रॉडक्टची जाहिरात करण्याचा फंडा: या तंत्रामागील शास्त्र जाणून घ्या…

ऑफिस मिटिंग मधला बॉस ज्याला CHANGE हवाय आणि दुसरीकडे राजस्थानी बाईच्या कुंकू साठी परमनंट मार्करचा वापर करणारा राजस्थानी नवरा या सगळ्या रूपकांचा वापर कॅम्लिन नं सुंदर केलाय. या जाहिराती बघितल्या नसेल तर जरूर बघा.

 

३. OLX

“घर में कुछ एक्स्ट्रा सामान तो ओएलएक्स पे बेच दो” हे आता सगळ्यात जास्त कॉमन झालंय पण सुरुवातीच्या च्या काळात ओएलएक्स मार्केटिंग साठी ज्या जाहिरातींचा वापर केलाय ते अत्यंत युनिक होत आणि त्या जाहिरातींमध्ये घडणाऱ्या गमती आपल्याला हसवतात.

 

 

स्नेहा खानवलकरच्या ‘ओ वूमनिया’ चा वापर असेल किंवा मग मुलाच्या करामतीचा पाढा वाचणारे पालक आपल्याला क्षणभर आनंद देतात.

 

४. सुलेखा

सुलेखा हा ब्रँड जवळजवळ रोजच्या आयुष्यात हव्या लागणार्‍या सगळ्या सेवा पुरवणाऱ्या मधला मोठा ब्रान्ड म्हणून आज परिचित आहे पण त्या ब्रँडनेम साठी त्यांनी जाहिरातीचा केलेला वापर फार वेगळा आहे.

 

 

डोन्ट बी जुगाडू ही एक अशीच AD. निखिल रत्नपारखी ने साकारलेल्या जुगाडू ची बात काही औरच.

लग्न झालेल्या निखिलच्या घरात घडणारी घटना आणि त्यातून निर्माण होणारे विनोद आपल्याला मनसोक्त हसवतात. सुलेखा ने वापरलेली मार्केटिंग ची पद्धत जरा वेगळी होती. हे सगळं बघताना हसू मात्र येतं हे नक्की.

 

५. CRICBUZZ

भारतात क्रिकेट आवडत नाही असा प्राणी सापडण जरा दुर्मिळच आहे त्याच मुळे क्रिकबज सारख्या क्रिकेट ओरिएंटेड अपलिकेशन ला मार्केटिंगसाठी जे काही जे काही क्रिकेटला मध्यवर्ती ठेवून युनिक पणे करता आलं ते त्यांनी केले.

 

मग दुधाच्या पिशवीचा बाउन्सर असेल किंवा मग जाड बायकोची स्तुती करताना खाल्लेला वाइड बॉल. काही सेकंड्स च्या या क्रीक बझ च्या ADS चेहऱ्यावर मात्र निखळ हसू आणतात.

 

६. वोडाफोन झू झू

जाहिरातींची गोष्ट चालली आहे आणि आपण झू झू ना विसरू हे शक्य नाही. वोडाफोन ने आई पी एल च्या दरम्यान आपल्या मार्केटिंग साठी काढलेली ही झू झू ची कल्पना इतकी फेमस होईल असं त्यांना देखील वाटलं नसेल.

क्रिकेट असेल, राजकारण असेल, सिनेमा असेल अशा अनेक वेगवेगळ्या अंगांनी असा केलेला वापर वोडाफोन ला फायदेशीर ठरला. हि AD लहान मुलां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यात प्रचंड फेमस झाली.

 

७. sprite

हम लोग तो क्लीअर है बॉस.. स्प्राईट न पिता सुद्धा. ही जी काही ‘ सब क्लीअर है’ वाली टॅगलाईन शोधून काढली त्यांचा मात्र स्प्राईट च्या विक्रीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक पडला.

 

 

मग प्रेयसी सोबतची AD असो किंवा इतर अनेक, आपल्याला खळखळून हसवतात हे मात्र नक्की.

 

८. मेन्टोस

मेन्तोस ची सुरवातीची ad आठवते कुणाला? एक गाढव , त्याची नोकरी करणारा माणूस, मग माणूस सगळे सोडून जातो व तो मेंटॉस खातो मग कैसी दिमाग की बत्ती जली असं करून परत येतो आणि तो त्या वेळी हिट झालेला दाद्दू हा डायलॉग कोण विसरेल?

 

 

मेंटोसच्या आजच्या यशामध्ये या अशा जाहिरातींचा वाटा मोठा आहे.

 

९. क्लोरोमिंट

“भाई लोग हम क्लोरोमेंट क्यू खाते है?” हा प्रश्न भारतात जेवढा विचारला गेला असेल तितका कुठलाच प्रश्न विचारला गेलेला नाही.

 

 

ही युनिक जाहिरात ज्याने कोणी शोधून काढली त्याला एक अवार्ड द्यायला हरकत नाही. क्लोरोमिंत च्या प्रत्येक आड मुळे प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र मोठ्या प्रमाणात झालं यात शंका नाही.

 

१०. अन्कर टूथ पेस्ट

टूथ पेस्ट ची ad तर सगळेच लोक करतात पण अन्कर ने जे काही केलं त्याला तोड नाही.

 

 

बायकोने नवर्यासाठी प्रेमाने केलेला केक जी फरशीवर पडल्यावर फरशी सुद्धा तुटते तो केक नवरा सहज फस्त करतो कारण तो अन्कर टूथ पेस्ट वापरत असतो. जितकी विचित्र हि ad ऐकायला वाटते त्याही पेक्षा जास्त हि ad आपल्याला हसवते.

 

११. इम्पेरिअल ब्लू

‘मेन विल बी मेन’ च्या TAGLINE खाली इम्पेरियल बल्यू च्या जाहिरातीने एक वेगळाच स्टेटस तयार केला आहे. पुरुषांची मानसिकता आणि त्या भोवती असणार विश्व ह्यालाच मध्ये ठेवून ह्या जाहिराती बनवल्या गेल्या आहेत.

 

हे ही वाचा – ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

मग लिफ्ट मधला सिन असेल तर सुमित राघवनचा फेमस डार्लिंग वाला सीन. ad जरी ती छोटीशी, २० सेकंड ची असली तरी आपलं स्थान जाहिरातीच्या क्षेत्रात अबाधित ठेवलं आहे.

आम्ही दिलेल्या या जाहिराती पहिल्या नसतील तर जरूर बघा आणि आम्हाला कळवा. तुमच्या पाहण्यात काही अशा गमतीदार जाहिराती असतील तरी कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?