' अफगाणिस्तानचा 'तो' प्रस्ताव स्वीकारला असता तर भारताचं चित्र वेगळं असतं!

अफगाणिस्तानचा ‘तो’ प्रस्ताव स्वीकारला असता तर भारताचं चित्र वेगळं असतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन राष्ट्रांची मैत्री अत्यंत महत्वाची असते. इतर शत्रूंशी दोन हात करताना नेहमीच आपले मित्र राष्ट्र मदतीला धावून येत असते.

कोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध असणे महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे तिसरे राष्ट्र त्या दोन्हीपैकी एकावरही कारवाई करताना हजारदा विचार करते.

यामुळे होते असे की दोन्ही ही बाजूंनी जेव्हा दबाव येतो तेव्हा शत्रू राष्ट्राशी संबंध ठेवताना, विपरीत परिस्थितीत युद्धाची घोषणा करताना प्रेत्यक राष्ट्राला हा विचार करावा लागतो.

अफगाणिस्तान भारताच्या मित्र राष्ट्रांपैकी एक.

पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून चाबहर पोर्ट मार्गे भारताचा अफगाणिस्तान आणि इराणशी व्यापार सुरू आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि भारताचे सूर सगळ्याच पातळीवर जुळलेले आपल्याला दिसून येते.

 

india afghan inmarathhi

 

खरे तर १९ व्या शतकापासून अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध खूप सुधारले. १९७० च्या सुमारास भारत, अफगाणिस्तान आणि सोविए युनियन सारखा प्रचंड मोठा शेजारी हे सगळेच मित्र देश झाले.

ह्याच सुमारास काबुल आणि दिल्लीचे संबंध इतके घट्ट झाले की ह्यातील एका राजधानीतर्फे दुसऱ्या राजधानीला एक खास प्रस्ताव दिला. ‘दोन्ही देशांची आणि आता संपूर्ण जगाची डोके दुःखी बनलेल्या पाकिस्तानच्या विभाजनाचा प्रस्ताव..!’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कोणी आणि कोणापुढे हा प्रस्ताव मांडला असावा..? 

पाकिस्तान फाळणी पासून आजतागायत सगळ्यांचाच दुश्मन राहिलेला आहे.

मोठ्या दिमाखात नवीन देश बनवून त्यांनी जगावर कोणतीच छाप पाडली नाहीये. किंबहुना धर्माच्या नावावर आतंकवाद पोसणारा देश म्हणून जगाच्या रोषाला पात्र झाला आहे.

हा देश वेळीच नष्ट झाला असता तर जगाच्या डोकेदुखीचे मोठे कारण संपले असते. ह्याच देशाची विभागणी करून तो आपापसात वाटून घेतल्यास त्यांचा त्रास कमी होईल ह्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

 

pakistan inmarathi

 

१९७० साली अफगाणिस्तानचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होते हाफीझउल्लाह आमीन. त्यावेळीचे अफगाणिस्तान इस्लामिक राष्ट्र असून देखील आत्ताच्या तुलनेत बौद्धिक आणि वैचारिक दृष्ट्या प्रगत होते.

स्त्रिया पाश्चात्य कपडेही घालत आणि खूप पुढारलेली जीवनशैली जगत होत्या.

सोव्हिए युनियन सारख्या बलाढ्य देशाच्या मैत्रीमुळे तर भारत आणि अफगाणिस्तान दोन्ही देशांना मोठे पाठबळ मिळाले होते.

त्यावेळी भारतातील मोरारजी देसाईंच्या आधिपत्त्याखाली असलेल्या भारतीय केंद्र सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे external affairs मिनिस्टर म्हणून काम पहात होते.

 

 

१९७८ मध्ये सरकारी भेटीसाठी अफगाणिस्तानात गेले असता त्यांची भेट सगळ्या नेत्यांशी झाली. त्याचबरोबर अफगाणी राष्ट्राध्यक्ष हाफिझउल्लाह आमीनशी देखील अटलजींनी भेट झाली.

प्रथितयश पत्रकार कुलदीप नायर त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, ह्याच वेळी आमीन ह्यांनी अटलजींसमोर एक बुलंद प्रस्ताव ठेवला.

आमीन ह्यांनी अटलजींना, एकत्रपणे आणि दोन्ही बाजूने पाकिस्तान वर हल्ला करून, त्या देशाला नेस्तनाबूत करून अर्धा अर्धा वाटून घेण्याचा सल्ला दिला.

 

sananda-inmarathi

 

अशा काहीशा विचित्र आणि धीट प्रस्तावामुळे शांत व्यक्तिमत्वाच्या अटलजींना भारीच आश्चर्य वाटले. अर्थात अटलजी फक्त एका खासदारांच्या पदी होते.

भारतातील सत्ता त्यांच्या हाती नसल्याने ते ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला देखील मुखत्यार नव्हते. आणि असे घडले देखील नाही.

ह्याला कारण मोरारजी देसाई हे पाकिस्तान धार्जिणे होते. आपल्याच हेरखात्याने सुद्धा पाकिस्तानला कोणताही त्रास देणे त्यांना अमान्य होते.

पाकिस्तानचा मिलिटरी मुख्याधिकारी झिया उल हक हा देखील मोरराजींचा मित्र होता. त्यामुळे अफगाणिस्तान ला मदत करून, पाकिस्तान वर हल्ले करून त्या देशाला वाटून घेणे अशक्य होते.

 

zia-ul-haq inmarathi

तेव्हा अफगणिस्तान सुद्धा काहीही करू शकले नाही. कारण मित्रदेश असलेल्या सोव्हिए युनियन देशाने अचानक अफगाणिस्तानशी युद्ध पुकारले.

त्यात सोव्हिएच्या सैन्याने हाफिजउल्लाह आमीनना मारूनही टाकले. त्यामुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरलेच नाही.

 

hafizullah-amin-inmarathi

 

पाकिस्तानचे नशीब बलवत्तरच म्हणायचे. कारण जर त्या वेळी आमीनचा प्रस्ताव अटलजींमार्फत भारत सरकारने मान्य केला असता तर आज जगाच्या नकाशावर पाकिस्तान देश दिसलाच नसता.

आजमितीला पण हे होणे जवळजवळ अशक्य आहे कारण भारत जरी बलाढ्य सत्ता बनला असला तरी अफगाणिस्तान मात्र गलितगात्र झालेला आहे.

तालिबान आणि पाकिस्तान ह्या दोन शेजारी देशांमुळे जर्जर झालेला आहे. देशांतर्गत सुरक्षेची काळजी घेता घेता अफगाणिस्तानच्या सरकारच्या नाकी नऊ आले आहेत.

अशी संधी पुन्हा मिळायची शक्यता कमीच असली तरी असे भविष्यात कधी घडल्यास ‘ह्यूमन रेस’ साठी ही सोन्याची संधीच ठरेल..!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?