'९ डिसेंबरला नवीन Spider Man movie चा trailer release झालाय!!!!

९ डिसेंबरला नवीन Spider Man movie चा trailer release झालाय!!!!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

Marvel च्या Captain America : Civil War या movie द्वारे Spider Man ने marvel studios च्या सिनेमांमध्ये पदार्पण केले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये Disney, Sony आणि Marvel यांनी स्पायडर मॅनच्या सिनेमांचे हक्क share करणारी deal sign केली, ज्यामुळे ह्या पात्राने Marvel Cinematic Universe (MCU) मध्ये पदार्पण केलं. Tom Holland या २० वर्षीय कलाकाराने character ज्या पद्धतीने portray केलय ते comic books च्या hardcore fansना जाम आवडल होतं. याआधी Tobey Maguire, Andrew Garfield यांनी स्पायडर मॅन मोठया पडद्यावर साकारलाय. या दोघांपेक्षाही टॉम हॉलंड हा सरस वाटतो! Donald Glut यांनीही १९६९ साली मोठ्या पडद्यावर हे पात्र साकारलंहोत ज्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता!

spider-man-2017-movie-marathipizza01

Trailer मध्ये टॉम हॉलंडचा फॉर्म कायम दिसतोय. म्हणून तर ही आपल्या सारख्या स्पायडर मॅनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि दुधात साखर म्हणजे यात Robert Downey Jr. म्हणजे अर्थातच Iron Man सुद्धा आहे!!!!!!!! तो आपल्या तरुण पीटरचा (स्पायडर मॅन) Mentor म्हणून काम करणारे! हे आपल्याला Civil War मध्येही दिसल होतच म्हणा! Villain झालाय Batman, म्हणजे DC मधून बॅटमॅन Marvel मध्ये येणार नाहीये बरं का ! तर Michael Keaton या कलाकाराने Spider Man : Homecoming मधला villain साकारलाय.  हा तोच ज्याने १९८९ साली Batman मोठ्या पडद्यावर साकारला होता आणि प्रेक्षकांना वेड लावलं होतं!!!!!!! त्यानेच ह्या सिनेमात Vulture हा villain साकारलाय!

spider-man-2017-movie-marathipizza02

Trailer मध्ये काही scenes अक्षरशः श्वास रोखून धरायला लावणारे आहेत – एक म्हणजे स्पायडर मॅन जहाजाचे २ तुकडे होण्यापासून वाचवत असतो आणि दुसरा म्हणजे स्पायडर मॅन आणि आयर्न मॅन हे सोबत उडत जातात तेव्हा ….वाह! काय scene आहे तो!!!!!!!

spider-man-2017-movie-marathipizza03

मला सध्याच्या स्पायडर मॅनविषयी एक गोष्ट प्रामुख्याने आवडते – टॉम हॉलंड हा खरंच teenager वाटतो, आणि हीच पात्राची गरज आहे! Maguire हा थोडा थोडा वाटायचा आणि Garfield तर मुळीच किशोरवयीन मुलगा वाटत नव्हता. Garfield असलेल्या movies ला लोकांनी खूप शिव्या घातल्या होत्या आणि Sony Studiosलाह देखील. टॉम हॉलंडला पात्र उत्तम सापडल आहे. सिनेमाचं दिग्दर्शन उत्तम असेल अशी आशा करूया!

spider-man-2017-movie-marathipizza04

हा सिनेमा ७ जुलै २०१७ रोजी अमेरिकेत प्रदर्शित होतोय. तुमच्यातल्या फॅनला देखील कधी एकदाचा चित्रपट release होतोय असं झालंय ना!!??

कट्टर स्पायडरमॅन फॅन असाल तर हा ट्रेलर अजिबात चुकवू नका !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?