' मुलींनो, रोमँटिक नॉव्हेल्स वाचून त्याचं जगणं कठीण करण्याआधी हे "वास्तव" समजून घ्या!

मुलींनो, रोमँटिक नॉव्हेल्स वाचून त्याचं जगणं कठीण करण्याआधी हे “वास्तव” समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मिल्स अँड बून्स , प्राईड अँड प्रेज्युडीस , लव्ह स्टोरी, आउटलॅन्डर , द टाइम ट्रॅव्हलर्स वाइफ ह्या नॉव्हेल्स वाचल्या की न कळत्या वयात असताना प्रत्येकाच्याच मनात प्रेम आणि प्रियकर किंवा प्रेयसी ह्यांच्याविषयीचे कादंबरीत असते त्याप्रमाणे चित्र तयार होते.

राजबिंडा, देखणा, उंचपुरा भरदार शरीरयष्टीचा नायक, सर्वगुणसंपन्न सुंदर नायिका, त्यांची पहिली भेट, पहिल्या भेटीतच खल्लास झालेले काळीज!

छोट्या छोट्या गोष्टींतून फुलत जाणारे प्रेम, मध्येच येणाऱ्या अडचणी, त्यातून मार्ग काढणारा नायक, डॅम्सेल इन डिस्ट्रेसला मदत करून इम्प्रेस करणारा नायक, त्याचे मर्दानी प्रेम, नंतरचे हॅपिली एव्हर आफ्टर वगैरे वगैरे असे काहीसे चित्र ह्या रोमँटिक नॉव्हेल्स मध्ये रंगवलेले असते.

वाचणाऱ्याच्या मनात सुद्धा आयुष्यात असेच काही घडेल अशी अपेक्षा निर्माण होते. खास करून मुलींच्या मनात, कारण काही मुली सेन्सिटिव्ह असतात.

टिनेजर्स असतील तर त्या स्वप्नाळू असतात व आपल्याला सुद्धा गोष्टीतल्या नायिकेप्रमाणेच असा राजबिंडा, मर्दानी प्रेम करणारा प्रियकर भेटावा अशी त्यांची इच्छा असते.

 

love-inmarathi
lovethispic.com

परंतु मुलींनो, प्रत्यक्ष आयुष्य सुद्धा गोष्टीप्रमाणेच असेल, आपलीही लव्ह स्टोरी सुद्धा ह्या रोमँटिक नॉव्हेल्सप्रमाणेच घडेल अशी अपेक्षा ठेवून तुम्ही जर वावरत असाल, तर तुम्हाला आयुष्यात वास्तविकतेचे दर्शन घडल्यावर, खऱ्या आयुष्याचा प्रॅक्टिकल अनुभव आल्यावर तुमचा फार मोठा भ्रमनिरास होणार आहे.

अश्या मिस्टर परफेक्टच्या शोधात, कल्पनेच्या जगात वावरल्याने तुम्ही स्वतःला तर त्रास करून घेणार आहातच शिवाय मुलांचेही जगणे कठीण करणार आहात.

म्हणूनच प्रेमाची, लव्ह स्टोरीची काही फेयरीटेल सदृश कल्पना मनात रंगवण्याआधी हे वास्तव जाणून घ्या.

मिल्स अँड बुन्स सारख्या व्हिक्टोरियन काळातील ह्या नॉव्हेल्समध्ये पुरुष राजघराण्यातील असत, ते सर्वगुणसंपन्न असत परंतु स्त्रियांना ते तुच्छ किंवा कमी लेखात असत. ते अल्फा मेल टाईपचे डॉमिनेटिंग, लीडर टाईपचे नायक असत. ते एक्सपर्ट घोडेस्वार किंवा शिकारी असत व ते स्वतःला उत्तम प्रकारे कॅरी करत असत.

त्यांच्या आजूबाजूला अनेक मुली त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताना गोष्टीत दाखवले असे.

दुसऱ्या बाजूला आपल्या कथेतील नायिका ह्या हुशार, सुंदर, बुद्धीने वरचढ, सेन्सिटिव्ह व वाचनाची आवड असलेल्या दाखवलेल्या असत.

सुंदर ,हुशार व सेन्सिटिव्ह असूनदेखील त्या जगासमोर आपला अलिप्त स्वभाव दाखवत असत. मग कथा थोडी पुढे सरकली की आपले नायक नायिका काही कारणाने एकांतात भेटतात, त्यांच्यात थोडा वाद होतो, त्यानंतर नायक नायिकेला जबरदस्तीने आपल्या मिठीत वगैरे घेऊन तिला प्रेमाची कबुली वगैरे देत असे.

आणि नंतर आपली नायिका हा प्रसंग वारंवार मनातल्या मनात आठवून खुश होत असे, लाजत वगैरे असे.

 

fairytale-love-inmarathi
lovescene.com

आता जरा खऱ्या आयुष्याबद्दल बोलूया. मुलींनो, खऱ्या आयुष्यात तुमच्यावर प्रेम करणारा मुलगा किंवा तुम्ही ज्याला आवडत असाल तो मुलगा त्याच्या वागण्या बोलण्यातून, बॉडी लँग्वेजमधून, त्याच्या नजरेतून तुम्हाला सिग्नल्स नक्की देईल. त्याच्या एकूणच हावभावांतून तुम्हाला जाणवेल की समोरची व्यक्ती आपल्याकडे काहीतरी वेगळ्या दृष्टीने पाहतेय.

एखादा मुलगा जर तुम्हाला जबरदस्तीने मिठी वगैरे मारत असेल तर तुम्हाला ते खटकायला हवे कारण कुठल्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणे हे संपूर्णपणे चुकीचे आहे.

कथेत जरी ह्याला नायकाचा रांगडेपणा किंवा मर्दानी प्रेम वगैरे अश्या संज्ञा दिल्या असतील तरी प्रत्यक्षात मात्र असे घडणे चुकीचे आहे.

तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय स्पर्श करणारी व्यक्ती जेंटलमन असूच शकत नाही. अश्या व्यक्तीच्या सानिध्यात कोणीही नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही. प्रेमाच्या नावाखाली शारीरिक त्रास देणे, मानसिक छळ करणे हे कथेत कितीही रोमँटिक वाटत असले तरीही ते चुकीचे आहे.

तसेच कथेत नायक म्हणेल तेव्हा नायिका त्याला शारीरिक सुख देण्यास राजी होते. नायकाने जरा काही सिग्नल्स दिले की नायिका सहज स्वतःला त्याच्या स्वाधीन करते.

तुमच्या बाबतीत असे काही घडत असेल तर त्या गोष्टीला प्रेम समजून स्वतःला स्वाधीन करू नका. ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याचा आधी संपूर्ण विचार करा. तुम्ही जर मानसिकरित्या संपूर्णपणे तयार असाल, त्या व्यक्तीवर तुमचा खरंच विश्वास असेल आणि ती व्यक्ती खरंच तुमच्या विश्वासास पात्र असेल तरच ही पुढची मोठी स्टेप घ्या.

 

love-care-inmarathi
priyo.com

आणि तुम्ही जर खरंच तयार नसाल तर कुणी कितीही इमोशनली ब्लॅकमेल केले तरी कुणाच्याही इमोशनल अत्याचाराला बळी पडून स्वतःला चुकीच्या व्यक्तीच्या स्वाधीन करू नका.

आधी खात्री करून घ्या की समोरच्या व्यक्तीचे एकापेक्षा अधिक पार्टनर्स तर नाहीत ना, त्या व्यक्तीला कुठला लैंगिक आजार तर नाही ना, आणि जर असे असले तर अजिबात त्या व्यक्तीशी शारीरिक जवळीक साधू नका.

जवळजवळ प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये काही काळाने एखाद्या खलनायक किंवा खलनायिकेचा प्रवेश होतो. तो खलनायक किंवा ती खलनायिका नायकाला किंवा नायिकेला आपल्या जाळ्यात ओढून किंवा काहीतरी कट रचून दोन प्रेमी जीवांना लांब करण्याचा प्रयत्न करतात.

आपली नायिका सत्य शेवटी जिंकणारच हा विश्वास मनाशी बाळगून जड अंतःकरणाने नायकापासून लांब निघून जाते. आणि मग शेवटी नायक तिला शोधत येतो आणि तिची माफी मागून ते दोघे लग्न करून आयुष्यभर सुखात राहतात.

प्रत्यक्ष आयुष्यात संवाद साधल्याशिवाय सत्य समोर येत नाही. तसेच तुमच्यात जर सतत मतभेद होत असतील, भांडणे होत असतील तर तुम्ही एकमेकांना कॅम्पॅटिबल नाही हे समजून घ्या.

 

couple-fight_inmarathi
antekante.com

तुम्हाला जर कुणी सतत इमोशनली मॅनिप्युलेट करत असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आहे हे समजून जा.

चूक करायची, शारीरिक किंवा मानसिक त्रास द्यायचा आणि नंतर डोळ्यात पाणी आणून माफी मागायची, आणि नंतर पुन्हा तसेच वागायचे असे जर तुमच्या बरोबर तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी वागत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब झालेलेच चांगले.

कारण प्रेमात कुणीही आपल्या आवडत्या व्यक्तीला वारंवार दुखावत नाही.

गोष्टींमध्ये जे दाखवतात तो सगळं शब्दांचा व कल्पनेचा खेळ असतो. प्रत्यक्ष आयुष्यात कुणीही परफेक्ट नसते.

म्हणूनच मुलींनो, कल्पनेतल्या टॉल डार्क, हँडसम मुलापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यातील साध्या सरळ व प्रामाणिक मुलाबरोबरच तुम्ही तुमचे हॅपिली एव्हर आफ्टर आयुष्य जगू शकता. आणि हे आयुष्य सुद्धा रोमँटिक केक वॉक नसून अनेक खाचखळग्यांतून, स्ट्रगल मधून एकमेकांना साथ देत जगावे लागते तेव्हाच आयुष्य सुंदर होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मुलींनो, रोमँटिक नॉव्हेल्स वाचून त्याचं जगणं कठीण करण्याआधी हे “वास्तव” समजून घ्या!

  • October 9, 2018 at 6:42 pm
    Permalink

    lekha save vhayche update aana ki

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?