' जगप्रसिद्ध ‘नायगारा धबधबा’ सजणार “तिरंग्याच्या रंगांनी”! कारण खूपच सुरेख आहे! – InMarathi

जगप्रसिद्ध ‘नायगारा धबधबा’ सजणार “तिरंग्याच्या रंगांनी”! कारण खूपच सुरेख आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

नायगारा धबधबा हे नाव खूपच प्रसिद्ध नाव, म्हणजे जगामध्ये नायगारा धबधबा माहिती नाही असा माणूस सापडणे कठीण, त्याचं कारण जगातला सर्वात मोठा धबधबा म्हणून ह्याचा दबदबा आहे.

अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांच्या सीमेवर हा धबधबा दोन्ही राष्ट्रांना जोडतो. ह्याच्या पडणाऱ्या पाण्यावर दोन्ही देशांना जोडणारा मोठा पूल उभारला आहे.

जगातले सुंदर पर्यटन स्थळ म्हणून हे जगप्रसिद्ध आहे. हा खरा नायगारा नदीतल्या एकाच प्रचंड आकाराच्या तलावातून निर्माण झालेला धबधबा आहे पण त्याच्या मध्यावर असलेल्या गोट ह्या छोट्या बेटामुळे त्याचे दोन भाग झाले आहेत. एक कोसळतो कॅनडाच्या सीमेवरून आणि दुसरा कोसळतो अमेरिकेच्या सीमेवरून त्यामुळे त्या दोन्ही कोसळणाऱ्या स्रोतांना वेगवेगळी नवे दिली गेली आहेत.

कॅनडातून जो स्रोत वाहतो त्याला हॉर्स शू फॉल असे नाव आहे आणि अमेरिकेतून कोसळतो त्या स्रोताला अमेरिकन फॉल आशा नावांनी संबोधले जाते.

 

naygara-fall-inmarathi
youtube.com

डोळ्याचे पारणे फेडणारा हा नयनरम्य धबधबा पाहायला सतत तिथे अनेक देशांतून पर्यटक येत असतात. आणि दोन्ही देशातून सतत कोसळणाऱ्या ह्या धबधब्याचा नयनरम्य खेळ आपल्या डोळ्यात साठवून, कॅमेऱ्यात साठवून खरंच डोळ्याचं पारणं फेडतात.

ह्या दोन्ही देशांचे हितसंबंध ह्या धबधब्यामुळे खूप दृढ झालेले आहेत. ह्याशिवाय बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे हे संबंध आणखी दृढ होत आहेत.

पूर्वी एकाच पासपोर्ट वर दोन्ही देशात जाऊन ह्या नायगारा धबधब्याचा हा नयनरम्य नाच पाहता यायचा, पण नंतर भारतात झालेल्या अतिरेकी हल्ल्या नंतर काही बंधने घातली गेली आणि दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या परवानगीने हे पर्यटन करावे लागते.

आज अनेक भारतीय लोक अमेरिकेत आणि कॅनडामध्ये स्थायिक झाले आहेत, नोकरी आणि व्यवसायामुळेही हे संबंध दृढ झाले आहेत.

अनेक भारतीय विद्यार्थी सुद्धा कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी सतत जातात, तिथल्या युनिव्हर्सिटी तून उच्च शिक्षित होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावताहेत.कॅनडा मध्ये भारतीय उच्च शिक्षित तरुणांना खूप वाव आहे त्यामुळे भारतीय नागरिक हे तिथले महत्वाचे घटक झाले आहेत.

अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी हे संबंध अधिक वाढण्यासाठी दोन्ही देशांना अनेकवेळा भेटी दिल्या आहेत.

 

modi-harper-inmarathi
indianexpress.com

कॅनडा मधल्या “इंडो-कॅनेडियन आर्टस् कौन्सिल”(I C A C) ने ह्या संबंधावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी एक चांगली कल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे नायगारा पार्क कमिशन च्या सहकार्याने एका “सुंदर कार्यक्रमाचे आयोजन ”

कसला कार्यक्रम असणार आहे हा? हा आपल्या भारतामध्ये दरवर्षी “दिवाळी” हा सण अतिशय उत्साहाने साजरा होतो. सगळीकडे असंख्य दिव्यांची सजावट होते.रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी आसमंत उजळून निघतो, नक्षीदार पणत्यांनी भूमी तेजोमय होते, आणि विविधरंगी रांगोळ्या ह्या उत्साहात रंग भारतात.

फटाक्यांची आतषबाजी ही दिवाळीची खरी धूम असते. घरातले लहान- मोठे, अबाल-वृद्ध ह्या दिवाळीचा आनंद घेतात आणि दरवर्षी आपल्या जीवनात नवीन उत्साह, नवा जोम, नवा आनंद निर्माण होतो.

अशीच ही दिवाळी सगळ्या कॅनडातल्या लोकांना अनुभवायला मिळावी म्हणून नायगारा धबधबा भारतीय तिरंग्याच्या तीन रंगांच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकायचा आहे आणि भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करायची आहे.

आणि दीपावली सारख्याच दिव्यांच्या झगमगाटात दोन्ही देशांच्या लोकांच्या सहभागातून ही दिवाळीच साजरी करायची आहे.

म्हणजे भारतीय दिवाळी कॅनडात साजरी होणार…… त्यासाठी भारत आणि कॅनडा ह्या दोन्ही देशांच्या सरकारने ह्या सुंदर कल्पनेला साकार करण्यासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. त्यामुळे हा तर दुग्धशर्करा योग्य म्हणावा लागेल.

 

naygara-inmarathi
asiantribune.com

भारतामध्ये ही आपली दिवाळी कॅलेंडर प्रमाणे ५ ते ९ नोव्हेंबर ह्या तारखांना साजरी होणार आहे. परंतू कॅनडामध्ये ह्या तारखांना तशी दिवाळी साजरी करता येणे महा कठीण होणार आहे.

कारण त्या तारखांना नायगारा धबधबा हा प्रचंड थंडीत गोठून जाण्याचे दिवस असतात त्यामुळे ह्या आनंद सोहळ्याला पर्यटक आणि दोन्ही देशांचे नागरिक हजर राहू शकणार नाहीत हा अडसर येणार.

म्हणून कॅनडात ही इंडो-कॅनडा दिवाळी थोडी आधी म्हणजे आत्ताच ह्या येणाऱ्या १४ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

मग ह्या अभूतपूर्व आनंदाच्या , रंगांची उधळण करणाऱ्या, दीपोत्सवाचे साक्षीदार म्हणून आपल्याला नायगारा धबधब्याचे ते भारतीय तिरंगी रूप पाहायला जाता येणे सहज शक्य आहे. मग लागाच तयारीला.

आपला सण, आपला तिरंगा, आपला थाट दुसऱ्या देशात जाऊन पाहायला आपण किती भाग्यवान आहोत ह्याची कल्पनाच किती सुखद वाटते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?