' भारतातलं एक खेडेगाव, इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे? – InMarathi

भारतातलं एक खेडेगाव, इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“इस्रायल” एक छोटासा पण अतिशय प्रगत देश म्हणून ओळखला जातो. हा देश ‘शेती’ आणि ‘संरक्षण’ ह्या दोन्ही महत्वाच्या घटकांमध्ये स्वयंपूर्ण आहे.

कमी पाणी आणि मर्यादित जमीन ह्यावर समृद्ध शेती कशी करायची हे आज सगळ्या जगाने इस्त्रायलकडून शिकायला हरकत नाही, कारण इस्रायलने अखंड मेहनतीच्या जोरावर अतिशय जलदगतीने ही प्रगती साधली आहे.

 

israel-inmarathi

 

यापूर्वी इस्रायलच्या अस्तित्वाबद्दल तेथील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागला आणि अनेक वर्षे शत्रू बरोबर लढावे लागले आणि त्यातूनच त्यांनी आधुनिक शस्त्रास्त्रे स्वतः निर्माण करून स्वसंरक्षणात देशाला स्वयंपूर्ण करून घेतले.

सध्या भारत आणि इस्रायल संबंध अतिशय चांगले आहेत. दोन्ही देशात अनेक आर्थिक व्यवहार होत आहेत. आधुनिक शेतीचे प्रशिक्षण आपले ही लोक इस्रायलकडून घेत आहेत.

 

netanyahu-modi InMarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – युद्धासाठी शत्रुदेशाचे ढग चोरून नेले: हास्यास्पद आरोप की तांत्रिक झेप?

आणखी एक चांगला व्यवहार आपल्या ‘केरळ’ राज्यातल्या ‘कन्नूर’ ह्या छोट्याश्या खेडेगावातून अनेक वर्षांपासून होत आहे आणि तो म्हणजे, संपूर्ण इस्रायल देशातल्या पोलिसांचा गणवेश ह्या कन्नूर मधल्या औद्योगिक पार्क मधून शिवून दिले जातात ही एक, दोन्ही देशातले औद्योगिक संबंध दृढ करणारीच बाब म्हणावी लागेल.

केरळातल्या कन्नूरमधील औद्योगिक पार्कमध्ये “मरियन अपॅरल्स” या कपडे शिवून देणाऱ्या कारखान्याला “इस्रायल”कडून त्यांच्या देशातल्या पोलिसांचे गणवेश शिवून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहे.

इस्रायलच्या पोलीसांचा फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट असा युनिफॉर्म आहे. वर्षाला एक लाख युनिफॉर्म्स शिवून देण्याचे हे कंत्राट आहे. गेले तीन वर्षांपासून हे काम चालू आहे.

थोडूपूजा इथे स्थायिक असलेल्या थॉमस ओलिक्कल नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा हा कारखाना आहे.

 

israel-police-uniform-inmarahi

 

पूर्वी ह्या व्यक्तीचे शालेय गणवेश तयार करून विकण्याचे काम होते, हळू हळू ते वाढून कंपनीच्या कामगारांचे गणवेश, सरकारी कर्मचाऱ्यांचे गणवेश, असे अनेक प्रकारचे गणवेश तयार करून देण्याचे मोठे काम सुरू झाले.

त्यानंतर कुवेतच्या अग्निशमन विभाग, आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचेही काम मिळाले.

हे गणवेश शिलाई आणि विक्रीचे मरियम अपरल्सचे काम २००६ मध्ये सुरू झाले. २००८ मध्ये हा उद्योग कन्नूर येथे शिफ्ट झाला.

कन्नूर ला लोकांना रोजगार मिळावा ह्या हेतूने हा उद्योग तिथल्या औद्योगिक वसाहतीत नेण्यात आला.

कन्नूर हा मागास भाग होता . विड्या तयार करणे हा तिथला मुख्य व्यवसाय होता. पण ह्या उद्योगामुळे अनेक लोकांना तिथे काम मिळाले. आज या कामात सुमारे ९०० कामगार कपडे शिलाई, आणि त्याला आवश्यक इतर कामे करत आहेत .

गेल्या काही वर्षांपासून “मरियम अपॅरल्स” मध्ये इस्रायलच्या पोलिसांची ये – जा वाढली आहे. कारण इस्रायलचे वर्षाला एक लाख पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश इथून शिवून दिले जातात.

 

police-israel-inmarathi

 

या गणवेशांसाठी लागणारे कापड अमेरिकेतून मागवले जाते. आणि त्याचे ठरलेल्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या मापाप्रमाणे गणवेश शिवले जातात.

हे इस्रायल पोलिसांचे अधिकारी त्या शिवल्या जाणाऱ्या अनेक युनिफॉर्म्सच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची शिलाई दर्जेदार होण्यासाठी मधून मधून सतत कारखान्याला भेट देण्यासाठी येत असतात.

कामातला काटेकोरपणा हा दरवेळी पहिला जातो. याशिवाय शर्टवर लावला जाणारा बॅज हा एम्ब्रॉयडरी करून दिला जातो त्याचीही काटेकोर पाहणी केली जाते.

आणि मरियम अपॅरल्स सुद्धा हे काम अतिशय काळजीपूर्वक करते असे कारखान्याचे अकौंटस आणि ऍडमिन मॅनेजर असलेले सिजिन कुमार सांगतात.

यापूर्वी शर्टस आणि पॅन्टस् दोन्ही शिवून देण्याचे कंत्राट मरियम अपरल्सकडे होते पण एक चिनी कंपनीने ते बळकावले, आता पुन्हा आम्ही ते परत मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण गेली तीन वर्षे आम्ही अतिशय चांगली सेवा दिली आहे. त्यामुळे ते आम्हाला परत मिळेल असे ते मॅनेजर विश्वासाने सांगतात.

 

israel-police-inmarathi

 

इस्रायल हा भारताचा मित्र देश असल्यामुळे पुढेही अशी कामे आपल्या देशातील संस्थांना मिळत राहतील आणि आपणही त्यांना काही कामे दिलेली आहेत. अशीच औद्योगिक देवाण घेवाण ही सतत वाढत जाईल अशी आशा व्यक्त करणे गैर होणार नाही.

कपडे शिवून देणे हे काम पूर्वी देशांतर्गत होत असे. कुशलता आणि उत्तम दर्जाचे काम, हे यशाचे रहस्य आहे. हे अशा आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रातल्या प्रगतीने सिद्ध होते आहे.

त्यासाठी अशी प्रगती प्रत्येकाला करणे शक्य होऊ लागले आहे, ह्याने , आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, विकास साधला जाईल हे निश्चित.

 

Israel Police Inmarathi

 

नुसता विकासच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंध सुधारायला मदत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – ‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?