' तुमच्या नकळत, भारतात घडतीये एक सुप्त क्रांती : तिचे लाभ मिळवून घेणं अत्यंत आवश्यक आहे – InMarathi

तुमच्या नकळत, भारतात घडतीये एक सुप्त क्रांती : तिचे लाभ मिळवून घेणं अत्यंत आवश्यक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतात एक सायलेन्ट रिव्होल्यूशन, फार मोठी क्रांती घडू पहातीये. अशी रिव्होल्यूशन जी आपल्या डोळ्यांसमोर घडत असूनही आपण अनभिज्ञ आहोत! अशी क्रांती जी फार पूर्वीच घडून जायला हवी होती – जी घडली नसल्याची फार मोठी किंमत आज भारत चुकवत आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान आधारित इनोव्हेशन घडवून आणण्यासाठी – भावी पिढी तयार करण्याची क्रांती!

भारतात सुपर डुपर इफिशियंट आय टी कन्सल्टन्ट तयार होतात. मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुकमधे महत्वाच्या पदावर, जबाबदारीची कामं करणारे टेक्निशियन्स भारतातून निघू शकतात. पण मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक “जन्माला” घालू शकतील असे इनोव्हेटर्स आपल्याकडे घडत नाहीत.

 

mark_zuckerberg-marathipizza
theatlantic.com

त्यामागे असणाऱ्या कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे – आम्हाला इनोव्हेशन करण्याची प्रेरणा ज्या वयात मिळायला हवी, त्या वयात आम्ही काहीतरी भलतंच करत असतो.

शाळांमधून आम्हाला नव-निर्मितीचा ध्यास घेण्याचं शिक्षण, प्रशिक्षण मिळतच नाही. आणि त्यात शाळांचा तरी काय दोष? त्यांच्याकडे रिसोर्सेस तरी कुठे असतात?

ह्याच प्रॉब्लमवर सरकारने एक उत्कृष्ट उत्तर काढलं आहे – अटल टिंकरिंग लॅब्ज!

 

Atal Tinkering Lab banner inmarathi

 

साधारण संकल्पना अशी आहे –

शाळांनी सरकारकडे अर्ज करायचा. आणि आपल्याकडची जागा तेवढी उपलब्ध करून द्यायची. केंद्र सरकार शाळेला अनुदान देईल – अटल टिंकरिंग लॅब (ATL) उभी करण्यासाठी.

आणि ही “आणखी एक प्रयोगशाळा” नसेल. त्या लॅबची पूर्ण कल्पनाच इनोव्हेशनवर केंद्रित आहे.

ATL चं उद्दिष्टच to ‘Cultivate one Million children in India as Neoteric Innovators’ हे आहे. अत्याधुनिक इनोव्हेटर्स तयार करणे! त्याच उद्देशाने ह्या लॅब्ज उभ्या केल्या जातील. ह्या लॅब्जमध्ये मुलांमध्ये design mindset, computational thinking, adaptive learning, physical computing अश्या अंगांनी स्किल्स तयार होणं अपेक्षित असणार आहे.

 

Atal Tinkering Lab Applications inmarathi

 

समोर उभं राहून शिक्षक काहीतरी प्रात्यक्षिक करतील आणि विद्यार्थी ते बघून माना डोलावून घरी जातील अशी की संकल्पना नाही.

“Do it yourself” तत्वावर मुलांना science, electronics, robotics, open source micro-controller boards, sensors and 3D printers आणि computers – ह्या सगळ्यांचा स्वानुभव येण्यासाठी किट्स असणार आहेत. मुलांमध्ये हे गुण अधिकाधिक रुजावेत म्हणून विविध स्पर्धा, एक्सपर्ट लेक्चर्स, प्रदर्शनं, वर्कशॉप्स घेतले जातील.

सर्वात महत्वाचं म्हणजे हे फक्त “सूचना” देण्याच्या स्तरावर नाही. शाळेला ह्या सर्व सेट अपसाठी – १० लाख रुपये आणि ५ वर्षांचा ऑपरेशनल खर्च म्हणून आणखी १० लाख रुपये – असा निधी सरकार देतंय.

 

Atal Tinkering Lab Financial Support inmarathi

 

पहिल्याच वर्षी एक हजार शाळांना ATL साठी निवडलं गेलं. गेल्या वर्षी नीती आयोगाने दीड हजार शाळांचं टार्गेट ठेवलं होतं – जे साध्य सुद्धा केलं! मे २०१८ पर्यंत एकूण २००० शाळांमध्ये ATL सुरू झाल्या होत्या.

एक लक्षात घ्यायला हवं की इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन दोन्हीही गोष्टी मारूनमुटकून, “शिकवून” जमत नसतात. त्या माणसाच्या चौकस बुद्धी, चुणचुणीतपणा आणि मेहनतीचा परिपाक असतात. प्रश्न शोधण्याची नजर आणि उत्तर शोधण्याची चिकाटी लागते.

हे सगळं शाळेत शिकवता येत नाही. ते आपलं आपल्यालाच घडवावं लागतं. झाड आपोआप उगवत नाहीच. मशागत लागते. पाणी, खत लागतंच. पण आपण जमीन सुपीक करू शकतो. बिया पेरू शकतो. ATL हा त्या मशागत करण्याचा आणिआणि बी पेरण्याचा प्रयत्न आहे.

लहान मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे आणि त्यांना तांत्रिक कौशल्य निर्मितीस प्रोत्साहन देणे एवढाच हेतू आहे. पुढे मुलंच करतील काय करायचं ते…!

आणि मुलं ऑलरेडी करत आहेत…!

सरकारने energy, water resources, waste management, healthcare, smart mobility आणि agri-tech ह्या ६ कॅटेगरीजमध्ये इनोव्हेशन मॅरेथॉन घेतली होती. त्यांतून पुढे आलेल्या ३० इनोव्हेशन्स ना अटल इनोव्हेशन मिशन तर्फे इन्क्युबेशनसुद्धा मिळालं. (स्रोत : इकॉनॉमिक टाईम्सची ही बातमी वाचा.)

२०१९ पर्यंत हा ATL चा आकडा ५००० पर्यंत नेण्याचा मानस आहे सरकारचा. एकूण टार्गेट आहे – ३०,००० शाळा!!!

 

Atal Tinkering Lab Rajiv Kumar NITI Ayog inmarathi

अदरवाईज “विज्ञान विरोधी” सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या सरकारने असं काहीतरी सुरु केलं हे कौतुकास्पद आहे.

आणि, अदरवाईज विज्ञानाची फार फार काळजी असणाऱ्यांनी, इतरवेळी काढलेले मोर्चे वगैरे पहाता, ह्या इतक्या चांगल्या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केलेला दिसत नाही, हे नमूद करण्याजोगं आहे. खासकरून तेव्हा – जेव्हा ही योजना फक्त कागदापुरती नाही – तर चांगल्याप्रकारे कार्यान्वित होऊन शाळांपर्यंत पोहोचली सुद्धा आहे!

हा उपक्रम, आहेत ते हेतू खरंच साध्य करतोय ना, त्यातही “मोजक्याच लोकांचे हितसंबंध” जोपासले जाताहेत का हे प्रश्न महत्वाचे आहेतच. आणि त्यांची सकारात्मक उत्तरं मिळावीत, मिळत राहावीत ह्यासाठी आपल्या सर्वांची नजर ह्या उपक्रमावर असायलाच हवी.

पण आपल्याला हे उपक्रम माहिती झाले तर नजर ठेऊ ना! प्रस्थापित मीडियाने ह्या उपक्रमाची जुजबी दखल घेतली आहे. प्रस्थापित विचारवंतांनी तर साफ दुर्लक्षच केलं आहे!

मग आपल्या शाळांना हे कळणार कसं? शाळांना कळालं, पण त्यांनी चालढकल केली तर ATL सेट करण्यासाठी पालकांकडून शाळांवर दबाव निर्माण होऊ शकतो. पण त्यासाठी पालकांना देखील ही माहिती असायला हवी!

ती माहित होणार कशी?! आपल्याकडे नाही त्या, नको त्या माहितीचा महापूर आला आहे. पुढच्या पिढीच्या जडणघडणीत फार फार मोठा बदल घडवून आणू शकतील अश्या ह्या गोष्टींचा कुठेच पत्ता नाही.

आपणच ही माहिती सर्वत्र पसरवायला हवी! नाही का?

ATL बद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध आहे : नीती आयोग – अटल टिंकरिंग लॅब आणि अटल इनोव्हेशन मिशन – ATL

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?