' जेव्हा ABP माझाचे प्रसन्ना जोशी आपल्या आडनावाचं भांडवल करतात – InMarathi

जेव्हा ABP माझाचे प्रसन्ना जोशी आपल्या आडनावाचं भांडवल करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या काही काळात प्रसारमाध्यमांच्या चर्चासत्रांमधून ‘मीडिया ट्रायल’ नावाचा एक प्रकार डोकं वर काढतो आहे. म्हणजे कुठलेही ठोस तथ्य किंवा पुरावे नसतांना एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पत्रकाररुपी न्यायाधीशाने दोषी किंवा निर्दोष घोषित करण्याचा तो एकंदर प्रकार असतो.

महत्वाची बाब म्हणजे ह्या ‘मीडिया ट्रायल्स’ करण्यात ‘आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास वगैरे आहे’ या सारखी वक्तव्य वारंवार ठोकणाऱ्या तथाकथित पुरोगामी पत्रकारांचाच सहभाग जास्त असतो.

मध्यंतरी नक्षलवाद्यांचे शहरी समर्थक म्हणून काही विचारवंत व समाजसेवकांना (?) अटक करण्यात आलेली होती. या मंडळींवर सुरक्षेसंबंधी अनेक गंभीर आरोप लावून पोलिसांनी त्यांना अटक केलेली.

याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ए.बी.पी. माझाच्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात अँकर प्रसन्न जोशी यांनी पूर्व न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, शहरी नक्षलवादाच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड, तिस्ता सेटलवाड इत्यादी मंडळींना बोलावले होते.

 

debate-inmarathi
abpmaza.abplive.com

 

चर्चेदरम्यान कोळसे पाटीलांनी पुण्याचे माजी जॉईंट कमिशनर रवींद्र कदम यांच्या एका पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे वक्तव्य केले.

मुळात रवींद्र कदमांनी असे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचे कॅप्टन स्मिता गायकवाडांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत केला मात्र अँकर प्रसन्न जोशींनी त्यांना थांबवत रवींद्र कदमांनी खरोखर असे वक्तव्य केले असल्याचे सांगितले.

कॅप्टन स्मितांनी रवींद्र कदमांच्या त्या तथाकथित वक्तव्याचे पुरावे मागितले असता, प्रसन्न जोशींनी डिबेट झाल्यावर आपण तो व्हिडीओ कॅप्टन स्मिता गायकवाडांना फेसबुकला टॅग करू असे आश्वासन दिले होते.

त्या चर्चेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा प्रसन्न जोशींनी कॅप्टन स्मिता गायकवाडांना रवींद्र कदमांच्या त्या वक्तव्याचा कुठलाही व्हिडीओ टॅग केला नसल्याने कॅप्टन स्मितांनी प्रसन्न जोशींकडे त्या व्हिडीओ संबंधीची विचारणा करण्यासाठी फेसबुकला एक पोस्ट केली.

न्युज डिबेट मध्ये प्रसन्न जोशींनी जे आश्वासन दिलेले ते अद्यापही पूर्ण केले नसल्याने जोशींना त्यांच्या त्या वक्तव्याची आठवण करून देण्याचा त्या फेसबुक पोस्टचा एकंदरीत आशय होता.

 

post-inmarathi
facebook.com

 

त्या पोस्ट वर बऱ्यापैकी ट्रोल झाल्यानंतर प्रसन्न जोशींनी एक कंमेन्ट करत कॅप्टन स्मिता गायकवाडांवर त्या प्रसन्न जोशींना त्यांच्या ‘जोशी’ या आडनावावरून टार्गेट करत असल्याचा बिनबुडाचा आरोप केला.

प्रसन्न जोशी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी कॅप्टन स्मिता गायकवाड ह्या लष्करातून परतल्यावर एखाद्या ब्रिगेडच्या कॅप्टन झाल्या असाव्या हे सुद्धा ठोकून दिले.

 

comment-inmarathi
facebook.com

 

मुळात प्रसन्न जोशींसारख्या एका वरिष्ठ पुरोगामी (?) पत्रकाराने एका लष्करातल्या माजी अधिकाऱ्यावर स्वतःचा खोटारडेपणा लपवण्यासाठी अशी टीका करणे नक्कीच शोभणीय नाही.

प्रसन्न जोशींनी कॅप्टन स्मिता गायकवाडांवर ‘ब्रिगेडच्या कॅप्टन’ किंवा ‘जातीयवादी’ हे शिक्के मारण्याच्या आधी त्यांच्या सैन्यातील कामाचा आणि निवृत्ती पश्चात देशातल्या सर्वात कठीण अश्या नक्षलवादी मुद्द्यावरील कामाचा अभ्यास करणे अपेक्षित होते.

स्मिता गायकवाड ह्या लष्कराच्या निवृत्त कॅप्टन आहेत, मात्र लष्कराच्या निवृत्त अधिकारी एवढीच कॅप्टन स्मितांची ओळख नाही.

गेल्या पाच दशकांपासून ‘नक्षलवाद’ ही भारतीय संघराज्याला भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या आहे.

कॅप्टन स्मितांनी निवृत्ती नंतर याच महाकठीण अशा समस्येविरुद्ध काम करण्यास सुरुवात केलेली आहे. सद्यस्थितीत कॅप्टन स्मिता ह्या ‘Forum For Integrated National Security’ या संस्थेसाठी काम करत आहेत, तसेच नक्षलवादाविरुद्ध त्या वेळोवेळी लिखाण करत आलेल्या आहेत.

 

smita-gaikwad-inmarathi
Hitavada.com

 

FINS च्या संकेतस्थळावर ‘Left Wing Extremism – Intellectual’s Deception’, ‘Defeating Red (Maoist) Terror Will Require An All Round Strategy, ‘माओवादावर व्यापक रणनीती हवी’ आणि Left Wing Extremism (Naxalism) and Urban Youth – Why Educational Institutes Are Emerging Battlefields? हे माओवादी विचारधारेविरुद्धचे त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत.

कॅप्टन स्मिता गायकवाड ह्या केवळ Google चा आधार घेणाऱ्या नक्षलवादाच्या अभ्यासिका नसून बस्तर, गडचिरोली, कोरेगाव अशा सर्व ठिकाणी जावून प्रत्यक्ष माओवादाचे आणि दंगलीचे बळी ठरलेले गावकरी, शरण आलेले नक्षलवादी, पोलिस आणि सीआरपीएफ अधिकारी ह्यांच्या मुलाखती घेवून जमिनीवर राहून अभ्यास करणाऱ्या अभ्यासिका आहेत.

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ‘शहरी नक्षलवाद’ ह्या विषयावर त्यांची तीसपेक्षा अधिक व्याख्याने झाली आहेत.

विविध मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये पण ह्या विषयावर त्या लिखाण करत असतात. टाईम्स ऑफ इंडियाने त्याची मुलाखत संपादकीय पानावर छापली होती.

तसेच कॅप्टन स्मिता वेळोवेळी विविध मंचावरून माओवादाविरुद्ध भूमिका मांडत असतात.

अश्यात प्रसन्न जोशींसारख्या पत्रकाराने स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी कॅप्टन स्मितांवर ‘जातीयवादी’ असल्याचा आरोप करणे कितपत योग्य आहे?

मुळात ती पोस्ट फक्त प्रसन्न जोशींना त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी होती. प्रसन्न जोशींकडे तो व्हिडीओ नसेलही, होऊ शकते.

कोळसे पाटलांना वाचवण्यासाठी किंवा वेळ मारून नेण्यासाठी प्रसन्न जोशींनी त्या व्हिडीओची थाप मारली असावी हे समजून घेण्यासारखे आहे.

 

prasanna-joshi-inmarathi
abpmaza.com

 

मात्र एवढे होऊनही जोशींनी स्वतःची चूक मान्य करण्याचे अथवा माफी मागण्याचे सौजन्य दाखवू नये! वरून आपला खोटारडेपणा उघडा पडू नये म्हणून स्वतःच्या आडनावाचा सहारा घेऊन पुढच्या व्यक्तीला जातीवादी ठरवणे समजण्या पलीकडचे आहे.

समाजात घटणाऱ्या विविध घटनांचे अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष विश्लेषण करणे प्रसार माध्यमांचे कार्य असते.

किंबहुना ती त्यांची जबाबदारी असते. पण हल्ली ‘मीडिया ट्रायल्स’च्या माध्यमातून पत्रकारांनी न्यायाधीश होण्याचे प्रमाण फार वाढलेले आहे.

आम्ही ठरवू तोच न्याय, तेच सत्य या अविर्भावात पत्रकार सध्या वावरताहेत, प्रसन्न जोशी त्याचेच एक ज्वलंत उदहारण आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?