' राफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते – InMarathi

राफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशात सध्या ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून सत्ताधारी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं, याआधी मोदी सरकार विरुद्ध बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केलेली होती .

काँग्रेस पक्षाच्या मते सत्ताधारी भाजप सरकारने राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा केलेला असून अंबानींच्या रिलायन्स कंपनीला फायदा पोहोचून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत असा आरोप याआधी करण्यात आला होता.

आता या वादाला एक नवे वळण मिळाले आहे, काँग्रेस पक्ष आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी सरकारने कोणत्याही टेंडरविनाच ही विमाने खरेदी केली आहेत. नक्की काय आहे भानगड चला तर मग जाणून घेऊयात…

 

 

सप्टेंबर २०१६ मध्ये सत्ताधारी भाजप सरकारने फ्रांस सरकार सोबत करार करून ३६ राफेल विमानांची खरेदी ५८००० कोटी (७.८ बिलियन युरो) रुपयांमध्ये केली, मुळात हा करार जरी २०१६ साली झाला असला तरी राफेल विमानांची निवड मात्र तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळातच झालेली होती.

 

rafale-deal-inmarathi
dnaindia.com

 

राफेल विमानांचा हा करार ‘Medium Multi-Role Combat Aircraft’ या कार्यक्रमाचा हिस्सा आहे. संरक्षण मंत्रालय आणि इंडियन एयर फोर्सच्या द्वारे सद्यस्थितीत भारतीय वायुदलाकडे असलेल्या सुखोई लढाऊ विमान आणि हलक्या लढाऊ विमानांच्या मधली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.

२०११ साली अमेरिकेच्या बोइंग एफ/ए१८ई/एफ सुपर होरनेट, फ्रांस चे दसॉल्ट राफेल, ब्रिटनचे युरोफायटर, अमेरिकेचा लॉकहिड मार्टिन एफ १६ फाल्कन, रशियाचे मिखायोन मिग-३५ आणि स्वीडनच्या सब जैस ३९ ग्रीपेन इत्यादी विमानांमध्ये या कार्यक्रमाच्या दृष्टीने स्पर्धा होती.

एप्रिल २०११ मध्ये भारतीय वायुदलाने विविध तांत्रिक बाबी लक्षात घेऊन ब्रिटनच्या युरोफायटर टायकून आणि फ्रांसच्या दसॉल्ट राफेल या दोन विमानांची निवड केली.

३१ जानेवारी २०१२ रोजी फ्रांसच्या दसॉल्ट राफेलने ब्रिटनच्या युरोफायटर टायकूनला मात देत ही स्पर्धा जिंकली.

तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा करार होऊ न शकल्याने २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आधीच्या करारात काही महत्वपूर्ण बदल करत सप्टेंबर २०१६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

manmohan--singh-marathipizza07
media2.intoday.in

 

भारतीय वायुदलाने इतर अनेक लढाऊ विमानांमधून ‘राफेल’चीच निवड का केली असावी? राफेलचे वैशिष्ट्य काय? त्याची निर्मिती कोण करते, त्यांचा इतिहास काय, भारतीय वायूदल आणि आपल्या शेजारी शत्रू राष्ट्रांवर त्याचा काय परिणाम होईल इत्यादी विषयांबद्दल आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारावर थोडक्यात माहिती घेऊया.

जगातल्या सर्वोत्तम पाच लढाऊ विमानांमध्ये दसॉल्टच्या राफेल विमानांचा चौथा क्रमांक लागतो.

फ्रांसच्या ‘दसॉल्ट एव्हीएशन’ या कंपनी कडून १९८६ पासून या विमानाच्या निर्मितीस सुरवात झाली.

१९७० ला युरोपातल्या ४ देशांनी मिळून ‘युरोफायटर टायकून’ या विमानावर सोबत मिळून काम करण्याचे ठरवले मात्र फ्रांसला युरोफायटर पेक्षा वजनाने कमी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज तसेच अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले विमान तयार करायचे होते.

युरोफायटरचे वजन आणि इतर तांत्रिक बाबींवरून फ्रांस वर इतर राष्ट्रांमध्ये मतभेद झाल्याने फ्रांसने दसॉल्ट च्या माध्यमातून राफेल विमानांच्या निर्मितीस सुरवात केली.

‘राफेल’च्या तांत्रिक बाबींचा विचार करायचा झाल्यास दोन इंजिन असलेल्या राफेलचा कमाल वेग २१३० किमी/तास इतका आहे, विमानाचे वजन १०१९६ किलो इतके असून इंधन क्षमता ४७०० किलो एवढी आहे.

 

rafale-deal-inmarathi01
theprint.in

 

तसेच राफेल विमानांची मारक क्षमता ३७०० किलोमीटर एवढी असून जवळपास २४००० किलो वजनाचा दारुगोळा आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची राफेलची क्षमता आहे.

शत्रू राष्ट्राच्या रडारला चुकवून त्यांचा शोध घेण्यात राफेल सक्षम आहे, तसेच स्वतःकडे येणाऱ्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्याची राफेलची क्षमता त्याच्यासाठी प्लस पॉइंट आहे.

राफेलच्या मारक क्षमतेचा विचार विचार करावयाचा झाल्यास राफेल मध्ये १.३० MM च्या गोळ्या झाडणारी बंदूक लागलेली असते जी एका वेळेस १२५ राउंड इतक्या गोळ्या सहज झाडू शकते.

या शिवाय राफेलमध्ये हवेतून हवेत मारा करणारे MBDA’s ‘METEOR’ आणि ‘MICA’ हे क्षेपणास्त्र तर हवेतून जमिनीवर मारा करणारे MBDA’s ‘APACHE’ आणि ‘STORM SHADOW’ तसेच ‘SCALP-EG’ इत्यादी क्षेपणास्त्रांचा समावेश असतो. राफेलच्या सामर्थ्यात आणखी भर घालते ती राफेलची रडार सिस्टीम.

राफेल मध्ये लागलेली RBE-2 रडार सिस्टीम पूर्णतः स्वयंचलित असून दूरवरच्या शत्रूच्या ठिकाणांचा शोध घेण्यास सक्षम असते, त्याच प्रमाणे राफेलची ‘Infrared Search And Track System’ राफेलला शत्रू विरुद्ध अत्याधिक मजबुती प्राप्त करून देते.

 

rafale-deal-inmarathi02
bbc.com

 

राफेलचा भारताच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास इतर हवाई तळांच्या सोबतच राफेल लेह आणि लडाख सारख्या उंचावर स्थित असलेल्या प्रदेशांमधून देखील उड्डाण करण्यास सक्षम आहे.

युद्ध काळात चीन आणि पाकिस्तान विरुद्ध या प्रदेशाचे सर्वात जास्त महत्व असल्या कारणाने राफेल भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

पाकिस्तानकडे सद्यस्थितीत असलेल्या F-१६ Falcon आणि JF-१७ Thunder सारख्या विमानांना मजबूत टक्कर देण्यासाठी राफेल सर्वोत्तम ठरतो.

तसेच राफेलच्या मारक पल्ल्याचा विचार करता चीनची बहुतांश महत्वाची शहर राफेलच्या रेंजमध्ये येत असल्याने राफेल चीन विरुद्ध देखील महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.

करारानुसार २०२१ पर्यंत भारताला सर्व राफेल विमान प्राप्त होणार होते, सध्या एकूण २६ राफेल विमाने आहेत. सध्या देशात जे काही राजकारण चाललंय त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास राफेल विमानांच्या भारतीय वायुसेनेतल्या प्रवेशाने वायुसेनेला शत्रू राष्ट्रांविरुद्ध प्रचंड मोठे बळ प्राप्त होणार एवढे मात्र निश्चित आहे.

काँग्रेसने केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर म्हणून भाजप प्रवक्ते संबित पात्र यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते पुढे म्हणाले की फ्रेंच मीडियाच्या रिपोर्टनुसार  हे संपूर्ण प्रकरण २००७- १२ मध्ये घडलेले आहे, राफेल खरेदीत लाचखोरी करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. सुषेण गुप्ता नामक व्यक्तीने यात मध्यस्थी केली आहे. तसेच ही व्यक्ती ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात देखील  सामील होती.

अश्या परिस्थितीत भारतीय संरक्षण सिद्धतेत महत्वाचा टप्पा ठरू शकेल अश्या राफेल विमान खरेदीचं सध्या होत असलेलं राजकारण कोणत्याही सुबुद्ध नागरिकास व्यथित करून जाईल.

एकीकडे विरोधकांकडून बेछूट आरोप होताहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून सर्व आरोप फेटाळत आहेत. या प्रकरणातील काही दिवसांनी नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.

किमान “देशाची सुरक्षा” हा विषय तरी राजकारणापासून दूर ठेवावा ही अपेक्षा सुद्धा वर्तमान राजकारणी पूर्ण करू शकत नाहीत ही खेदाची बाब आहे. मनात चीड निर्माण करणारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?