' स्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल !

स्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या आधुनिक युगातील हॉटेल्स देखील तितकीचं आधुनिक ! त्यांचे आकार, स्वरूप, भव्यता-दिव्यता पाहून डोळे अगदी दिपून जातात. अश्या हॉटेल्समध्ये किमान एक दिवस व्यतीत करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात जागृत होतच असते. कारण ही हॉटेल्स असतातचं अशी की जिथे गेल्यावर आपल्याला स्वर्गात असल्याचा अनुभव येतो. असचं एक हॉटेल आहे इटलीमध्ये !

उत्तर इटलीमधील South Tyrol या प्रदेशात स्थित असलेलं ‘Alpin Panorama Hotel Hubertus’ हे हॉटेल तुम्हाला स्वर्गाची सफर घडवून आणल्याशिवाय राहत नाही. Dolomites  पर्वतरांगेचं येथून होणार दर्शन म्हणजे नेत्रसुखद अनुभव ठरतो.

alpin-panorama-hotel-hubertus-marathipizza01

स्रोत

पण या हॉटेलचं खास वैशिष्ट्य आहे येथील स्विमिंग पूल!  या स्विमिंग पूलमध्ये उतरल्यावर तुम्हाला असा भास होतो जणू की स्वर्ग तुमच्या पायाशी लोळण घेत आहे. इटलीच्या सुप्रसिद्ध NOA या आर्कीटेक्चर कंपनीने अतिशय सुंदररीत्या या स्विमिंग पूलची निर्मिती केली आहे.

२५ मीटर लांब या स्विमिंग पूलाचा १७ मीटर भाग हा हवेत असून केवळ झाडांच्या खोडांवर टिकून आहे. स्विमिंग पूलचा खालचा भाग पारदर्शी काचेचा आहे. ज्यामुळे तुम्हाला जणू तुम्ही हवेत अधांतरी उभे आहात असा सुखद अनुभव मिळतो. त्याच जोडीला समोर दिसणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य मन अगदी खुश करून टाकते.

alpin-panorama-hotel-hubertus-marathipizza02

स्रोत

समोर निसर्गाची सुंदर उधळण आणि ढगांच्या साथीने हवेत अधांतरी असणारे तुम्ही या क्षणाला स्वर्गानुभूती म्हणावे नाहीतर काय?

alpin-panorama-hotel-hubertus-marathipizza03

स्रोत

 

जगातील सर्वात सुंदर गोष्टीचा तुम्ही अनुभव घेत आहात अशी कल्पना मनात तरळल्याशिवाय राहत नाही.

alpin-panorama-hotel-hubertus-marathipizza04

स्रोत

इथून कधीच बाहेर पडायची इच्छा होणार नाही.

alpin-panorama-hotel-hubertus-marathipizza05

स्रोत

काय म्हणता मग? एकदा तरी भेट द्यायला हवीचं की नाही???

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?