'जमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करून 'त्या' अमेरिकन नागरिकाला धडा शिकणारी जमात!

जमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करून ‘त्या’ अमेरिकन नागरिकाला धडा शिकणारी जमात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

स्वतःला संपूर्ण जगापासून अलिप्त ठेवणारी सेंटीनिलीज नावाची जमात पुन्हा एकदा जगभर चर्चेचा विषय झालीये. त्याला कारणही तसेच आहे. अमेरिकन नागरिक असणाऱ्या जॉन चाऊ यांनी नुकतेच या जमातीतील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अशी घुसखोरी मान्य नसल्याने या आदिवासिंनी त्यांची हत्या केली.

या व्यक्तीने अशा भयानक ठिकाणी जायचे धाडसच का केले हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला होता.परंतु त्याचेही उत्तर समोर आलेय.

ही व्यक्ती ख्रिश्चन धर्मप्रसारक होती. मागच्या वर्षीही त्यांनी असाच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्यावर आदिवासिंनी बाणांचा वर्षाव केला. या हल्ल्यातून ते जीव वाचवून परत आले होते. परंतु यावेळी ते स्वतःची सुटका करून घेऊ शकले नाही.

त्यांच्या काही लिखाणातून असे समोर आलेय की त्यांना या लोकांमध्ये धर्मप्रसार करायचा होता. तिथे येशूचे राज्य असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी असेही लिहून ठेवलेय की तुम्हाला कदाचित मी वेडा वाटेनं. पण या लोकांना येशूची ओळख करून देणे, त्याच्याबद्दल माहिती देणे मी खूप महत्त्वाचे समजतो.

ही व्यक्ती नक्की कुठे गेली होती याचे कुतुहूल तुम्हाला नक्कीच वाटले असेल. त्याचबद्दल आम्ही या लेखात सांगणार आहोत.

कित्येक वर्षांपासून मनुष्यप्राणी टोळीटोळीने राहत होता. टोळीचा एक मुख्य सरदार असायचा. अख्खी टोळी म्हणजे एक कुटुंब असल्यासारखे ते राहायचे. प्रगत तंत्रज्ञान नसल्याने परंपारिक पद्धतीने उदरनिर्वाह चालायचा. म्हणजे नैसर्गिक साधनांवरच सगळे अवलंबून असायचे..

 

tribes-inmarathi
aawaznation.co

 

मशीन, तंत्रज्ञान अशा कोणत्याच गोष्टी तेव्हा निर्मित झाल्या नव्हत्या. आताच्या २१ व्या शतकात मात्र आपण फक्त नैसर्गिक साधनांवर अवलंबून नाही. तंत्रज्ञानाच्या या युगात सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत.

सोबतीला मशीन, रोबोट, कॉम्प्युटर असल्याने कष्टांशिवाय काही गोष्टी साध्य करता येतात. असे सगळे असताना काही माणसे अजूनही आदिमानवाप्रमाणे राहतात. हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण एक जमात अशी आहे जिने स्वतःला सगळ्यांपासून वेगळे ठेवले आहे.

स्वतःबद्दल कोणाला काहीही कळू नये ह्याची पूर्ण खबर ते घेतात आणि अजूनही आदिमानावाप्रमाणे जीवन जगतात.

कुठे असतील ही माणसे?

इंडोनेशियाच्या जवळ ५७२ छोट्या छोट्या बेटांचा प्रदेश आहे ज्याला आर्किपेलागो असे म्हणतात. ह्या बेटांवर वेगवेगळ्या जमातीचे आदिवासी राहतात. पण कित्येक बेटांवरील आदिवासींची संख्या कमी होत आहे.

कारण आहे पर्यटक. जे गेली कित्येक वर्षे स्वतः तिथे जाऊन निसर्गाची मजा लुटून सगळीकडे घाण पसरवून येतात. मग तिथे राहणाऱ्यांना रोगराईशी सामना करावा लागतो. आणि त्या जमाती आता extinction च्या मार्गावर आहेत. म्हणजेच पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचा फायदा झाला की ते जगापासून वेगळेच असते तर फायद्याचे ठरले असते हे कळणं अवघड झालंय..

तरीही ह्या बेटांवरील सेंटीनिलीज नावाची जमात मात्र व्यवस्थित टिकून आहे.

 

North-Sentinel-Island-Andamane-inmarathi
mybestplace.com

नॉर्थ सेंटिनल आयलंड वर त्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे जीवनमान अगदी पूर्वीच्याच आदिवासी लोकांसारखे आहे. लाकडाच्या होड्या करून अथांग समुद्रातून मासे पकडणे, जंगली श्वापदे मारून त्यांचे मास खाणे. शेती करून धनधान्य उगवणे. झावळ्या, मातीच्या घरात राहणे अशीच त्यांची जीवन पद्धती आहे.

बाकीच्या बेटांवरील आदिवासीची संख्या झपाट्याने कमी होत असताना हे सेंटीनेलिज कसे काय आपली संख्या राखून आहेत?

याचे कारण आहे की, ते कोणत्याच नवख्या माणसाला आपल्या टोळीच्या आजूबाजूलाही भटकू देत नाहीत. जवळपास ६० हजार वर्षांपासून त्यांच्या जीवनात कोणीही परके डोकावू शकले नाहीत. कोणी तसा प्रयत्न केलाच तर युद्ध करण्यासही ते मागे पुढे बघत नाहीत.

त्यांच्या आयलंड पासून जवळ असलेल्या अंदमान निकोबार वरील माणसे सेंटिनल आयलंड च्या जवळपासही भटकत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, तिकडे गेलो तर आपण मारले जाऊ शकतो. मुख्य म्हणजे सेंटिनीलिजची भाषा सुद्धा कोणाला माहीत नाही.

अंदमानातील काही जण असेही सांगतात की, सेंटिनल आयलंडच्या आसपास जाण्यास भारतीय सैनिकांना सुद्धा मनाई केली आहे. ह्या आयलंडपाशी खूप चांगले खेकडे मिळतात आणि त्याच्या हव्यासापोटी तिथे गेल्यास खेकडे मिळो ना मिळो पण जीव नक्कीच जातो.

असेच कोणी दोघे चुकून त्या क्षेत्रात गेले आणि आपला जीव गमावून बसले. त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन भारतीय सैनिकांकडून केले जात असता त्यांच्या हेलिकॉप्टर वर देखील सेंटिनीलिज लोकांनी बाणांचा वर्षाव केला होता..

 

North-Sentinel-Island-inmarathi
mybestplace

जणू काही निसर्गाला सुद्धा माहीत असावे की, ह्या सेंटिनीलिज ना एकटे राहण्यास आवडते. म्हणून त्यांच्या आयलंड ची भौगोलिक स्थिती पण अगदी मोक्याची बनलेली आहे. आजूबाजूला कोरल रीफ आहेत, नैसर्गिक समुद्रकिनारे आणि घनदाट जंगल.

शिवाय आर्किपेलागो पासून थोडा वेगळा झालेला असा हा सेंटिनल आयलंड. जिथे जाणे येणे हे स्थानिक लोकांना सोडून इतर कोणाला अशक्यच आहे.

अशा सगळ्या कारणांमुळे जगाला या लोकांबाबत, यांच्या राहाणीमानाबाबत जास्त काही कळलेले नाही. लांबून दिसलेल्या झोपड्या, हेलिकॉप्टर वर सोडलेले बाण बघून त्यांच्या बद्दल काही निष्कर्ष बांधले गेले.

त्यांच्याकडे स्वतःचे धातू प्रकार नाहीत. वाहून आलेली भांडी, किंवा धातूच्या गोष्टी वापरून ते हत्यारं बनवतात.

 

North-Sentinel-inmarathi
myvestplace.com

तसेच २००४ च्या त्सुनामीनंतर त्यांचे जीवन कसे टिकले किंवा किती बदलले हेही कळण्यास काही मदत होत नाही.

ह्या त्सुनामी नंतर खरे तर इंडोनेशिया आणि भारत आयलंडची नितांत हानी झाली होती. पण अशा नैसर्गिक आपत्तीतूनही हे कसे बचावले असतील ह्याची कल्पना कोणालाही नाही. ह्या आयलँडच्या माणसांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आत्ताची नाही. गेली कित्येक वर्षे बरेच देश ह्या प्रयत्नात आहेत.

१८८० मध्ये ब्रिटिश सरकारने २ वृद्ध आणि २ बालके पळवून आणली. जेणे करून त्यांच्या विषयी अभ्यास करता येईल. पण ते सगळे दुसऱ्या प्रदेशात गेल्याने आजारी पडून मरणासन्न झाले. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना पुन्हा त्यांच्या आयलंड वर सोडून दिले.

त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारत सरकारने पण खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या कडून सामोपचाराची काहीच चिन्ह दिसली नाहीत. ते एक तर लढायचे किंवा जंगलात पळून जायचे.

त्यामुळे भारताकडून पाठवलेली माणसे तिथेच समुद्रकिनाऱ्यावर भेटवस्तू सोडून जायचे. कित्येक वर्षे असेच चालले पण, २००६ मध्ये २ माणसांना आणण्यास गेलेल्या हेलिकॉप्टर वर जेव्हा बाणांचा मारा झाला तेव्हा पासून मात्र कोणीच तिकडे मैत्रीसाठी गेलेलं नाही.

लिगली नॉर्थ सेंटिनल आयलंड भारताचाच भाग आहे. पण तिथे भारतातील एकही मनुष्य जाऊ शकला नाही. सेंटिनीलि ट्राईब कायम एकटेपणाला पसंत करतो.तसेच कायम राहण्यात त्यांना धन्यता वाटते.

कधी भविष्यात त्यांच्याशी मैत्रीही होऊ शकते,परंतु यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. हे सर्व नजिकच्या भविष्यात घडून येईल अशी आशा बाळगुयात

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “जमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करून ‘त्या’ अमेरिकन नागरिकाला धडा शिकणारी जमात!

 • October 7, 2018 at 11:35 am
  Permalink

  लेख वाचून आश्चर्यचकीत झाले.good

  Reply
 • November 26, 2018 at 1:57 pm
  Permalink

  Tyanche je naisrgik jivan tyana jagu dyave….

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?