' जगात काहीच अशक्य नाही, हे पुतीन यांनी सिद्ध करुन दाखवलं! हे बघा..

जगात काहीच अशक्य नाही, हे पुतीन यांनी सिद्ध करुन दाखवलं! हे बघा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्याचे रशियाचे राष्ट्रपती असलेले व्लादिमिर पुतीन हे एकेकाळी केजीबी या रशियाच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी होते. ते सलग चौथ्यांदा रशियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आहेत. १९९९ पासून ते सतत हे पद भूषवत आहेत.

जगातील मोजक्याच महासत्तांच्या पंगतीत बसणाऱ्या रशियासारख्या राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या या नेत्याचा प्रवासही असाच नाट्यमय आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यांचा आतापर्यंतचा संपूर्ण कार्यकाल…

पुतीन याचं संपूर्ण नाव व्लादिमिर व्लादिमिरोवीच पुतीन असे आहे. त्यांचा जन्म पूर्वीचे लेनिनग्राड आणि आताचे सेंट पीटर्सबर्ग इथे ७ ऑक्टोबर १९५२ ला झाला. त्यांच्या आईचे नाव मारिया शेल्मोवा असे आहे तर वडिलांचे नाव व्लादिमिर स्पिरीडोनोवीच पुतीन असे आहे.

पुतीन यांनी १९८३ साली ल्युदमिला पुतीन यांच्या बरोबर लग्न केले असून त्यांना मारिया आणि येकतेरीना अशा दोन मुली आहेत.

मारिया शेल्मोवा या एक कारखाना कर्मचारी होत्या आणि वडील, व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतिन यांनी द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी सोव्हिएत नौसेनेत काम केले होते.

त्यानंतर १९५० च्या दशकाच्या दरम्यान ऑटोमोबाईल कारखान्यात फोरमॅन म्हणून देखील काम केले होते. अशा अतिशय मध्यमवर्गीय घरातून पुतीन यांचे बालपण गेले.

पुतीन हे ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. माध्यमिक विद्यालयात शिकत असताना त्यांनी ज्युडो शिकण्याच्या निर्णय घेतला. त्यामागच्या कारणाबाबत ते स्वत:च सांगतात की,

“मला चित्रपटातल्या रशियन सैनिकांप्रमाणे ज्युडो खेळून हात वर करत समोरच्याला पराभूत करायचे होते.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या सीने दृश्यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi01

 

१९७५ मध्ये, पुतिनने लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीकडून कायद्याची पदवी मिळवली. त्या काळात त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा जॉईन केला. मात्र काही काळानंतर त्यांनी त्या पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या मते साम्यवाद ही एक चुकलेली गल्ली इतकीच आहे.

सुरुवातीला कायद्यातील करिअर केल्यानंतर पुतीन यांची १९७५ मध्ये केजीबी (स्टेट सिक्युरिटी कमेटी)मध्ये भरती करण्यात आली.

तिथे त्यांनी १५ वर्षांसाठी ऑफिसर म्हणून काम केले. यातील शेवटची सहा वर्षे ड्रेस्डेन, पूर्व जर्मनीमध्ये खर्च केली. १९९१ मध्ये केजीबीला लेफ्टनंट कर्नल पदवी असताना सोडळे आणि त्यानंतर ते परत रशियाला परतले.

तिथे ते लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीच्या बाह्य अंतर्गत कामकाजाचे प्रभारी होते. इथेच पुतिन आपल्या माजी शिक्षक अनातोली सोबकॅकचे सल्लागार बनले होते, जे फक्त सेंट पीटर्सबर्गचे प्रथम स्वतंत्रपणे निवडून आले होते.

प्रभावी राजकारणी म्हणून प्रतिष्ठा मिळवताना पुतीन १९९४ साली सेंट पीटर्सबर्गच्या पहिल्या डिप्टी मेयर पदावर पोहचले.

१९९६ मध्ये मॉस्को येथे गेल्यानंतर पुतिन रशियाच्या पहिल्या अध्यक्ष बोरिस येल्त्सिनच्या प्रशासकीय कर्मचार्यांसह ताफ्यात सामील झाले.

पुतिनला एक वाढता तारा म्हणून ओळखून, येलसिन यांनी त्यांना फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) – प्रभावी सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्त केले.

९ ऑगस्ट १९९९ रोजी येलसिनने त्यांना कार्यकारी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. १६ ऑगस्ट रोजी रशियन फेडरेशनचे विधानमंडळ, राज्य ड्यूमा यांनी पुतिन यांची पंतप्रधान म्हणून नियुक्तीची पुष्टी केली.

विशेष बाब म्हणजे जेहा त्यांची नियुक्ती प्रभारी म्हणून झाली त्याच वेळी पुतिन यांनी राष्ट्रपती होण्याचा मनसुबा उघडपणे जाहीर केला होता.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi02

 

जेव्हा ३१ डिसेंबर १९९९ रोजी बोरिस येल्त्सिनने अनपेक्षितपणे राजीनामा दिला होता, तेव्हा रशियाच्या संविधानाने पुतीन यांना रशियन फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष केले होते.

त्याच दिवशी, त्यांनी येलत्सिन आणि त्याच्या नातेवाईकांना त्यांनी केलेल्या कोणत्याही गुन्ह्यांबद्दल संरक्षण देण्याचे राष्ट्रपती हुकूम जारी केले.

बोरिस यांच्यावर अपव्यवहार आणि पदाचा गैरवापर असा ठपका ठेवला गेला होता.

नियमित रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची जून २००० ची पूर्वनियोजित असताना, येलत्सिनच्या राजीनामामुळे २६ मार्च २००० रोजी तीन महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याची गरज पडली. त्यात एकूण मतांच्या ५३ % इतक घवघवीत यश मिळवत पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

राष्ट्रपती झाल्यानंतरही पुतीन यांना फारशी लोकप्रियता नव्हती. मात्र दुसऱ्या चाचेन लढाई नंतर जे रशिया लष्कर आणि चाचेन अल्गाववादी यांच्या झाली. त्यातल्या धाडसी लष्करी कारवाईच्या निर्णयामुळे ते प्रसिद्धी झोतात आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले.

ही चाचेनची लढाई ऑगस्ट १९९९ ते मे २००० या काळात झाली.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi03

 

१९९० च्या दशकाच्या सुरूवातीस सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर देशाच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या रशियाच्या व्यवसायिकांसह वाटाघाटी करून, पुतिन यांनी आपल्या पहिल्या टर्मच्या बहुतेक काळात, अयशस्वी रशियन अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले.

त्यावेळी वित्तीय निरीक्षकांच्या मते पुतीन यांनी क्रेमलिन नियमांद्वारे खेळल्यास व्यावसायिक अधिक समृद्ध होतील असे या बड्या व्यावसायिकांना स्पष्ट केले.

रेडिओ फ्री युरोपने २००५ मध्ये पुतीनच्या काळातील रशियन व्यवसाय टायकोन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली होती.

पुतिन यांच्या या “ग्रेट सौदा” करणाऱ्या व्यावसायिकांमुळे प्रत्यक्षात रशियन अर्थव्यवस्थेत सुधाराणा झाली आणि त्यातली अनिश्चित मोठ्या प्रमाणात कमी झाली.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi04

 

१४ मार्च २००४ रोजी, पुतीन यांना ७१ टक्के मतदानाद्वारे थेट कल मिळाल्यामुळे राष्ट्रपती पदासाठी पुन्हा निवडून आले.

अध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पुतिन यांनी सोव्हिएत युनियनच्या पतन काळात निर्माण झालेल्या रशियन लोकांच्या समस्या आणि त्यांचे झालेले आर्थिक नुकसानास भरून काढण्यास सुरुवात केली.

२००५ मध्ये तो रशियामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण आणि शेती सुधारण्यासाठी डिझाइन केलेले राष्ट्रीय प्राधान्य प्रकल्प सुरू केले.

डिसेंबर २००७ च्या निवडणुकीत यू.एस. मधल्या कॉंग्रेसच्या निवडणुकीच्या बरोबरीने, पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाने राज्य ड्यूमाचे नियंत्रण सहजपणे कायम ठेवले, जे रशियन लोकांनी त्यांच्या आणि त्याच्या धोरणांचे सतत समर्थन केलेल्याचे थेट द्योतक होते.

मात्र निवडणुकीच्या लोकशाही वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

 

Vladimir-Putin-russia-inmarathi05

 

मतदान केंद्रावर स्थापन केलेल्या सुमारे ४०० परदेशी निरीक्षकांद्वारे निवडणुकांवर नजर ठेवण्यात आली होती. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेला स्वत:ला धक्का बसला नाही. परिणामी या आरोपातून पुतीन सुटले.

४ मार्च २०१२ रोजी पुतीन यांनी ६४ टक्के मतदानासह तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाचा विजय मिळविला. या काळात त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले पण तरीही त्यांनी आपली विजयो घोडदौड कायम ठेवली.

त्यानंतरच्या कार्यकाळात त्यांना बऱ्याच कलुषित आणि आरोपी अशा घटनांमधून स्वत:ला सिद्ध करावे लागले.

मार्च २०१८ रोजी पुतिन यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा सहज निवडण्यात आले होते. त्यांना ७६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

त्यापैकी ६७ टक्के सर्व मतदारांनी मतपत्रिका सादर केली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या नेत्याने फक्त १३ टक्के मते मिळवली.

अधिकृतपणे ७ मे रोजी कार्यालय कामकाज हाती घेतल्यावर, काही काळानंतरच पुतिन यांनी घोषित केले की, रशियन संविधानाचे पालन करून २०२४ मध्ये तो पुन्हा निवडणूक घेणार नाही.

अशा पद्धतीची राजकीय कारकीर्द असणारे पुतिन हे भारताचे जवळचे मित्र समजले जातात. त्यांच्या पूर्वीपासून रशिया आणि भारताची असलेली मैत्री त्यांनी अधिक दृढ केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?