' पडद्यामागुन सत्तास्थानी मोठ्या उलथापालथी घडवून आणणारे “स्वामी” – InMarathi

पडद्यामागुन सत्तास्थानी मोठ्या उलथापालथी घडवून आणणारे “स्वामी”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ते कोण होते…? संत होते की पापी ? भविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ? असे अनेक प्रश्न चंद्रस्वामींकडे पाहताना आपल्याला पडतात.

२३ मे २०१७ रोजी मंगळवारी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये multiple organ failure मुळे मृत्यू झालेल्या ६९ वर्षीय चंद्रस्वामीचे जीवन आणि त्यांची कारकीर्द यात फरक करणारी रेषा खूप धूसर होती.

त्यांचे प्रशंसक त्यांना ज्ञानाची परिपूर्ण संस्थाच मानतात; पण त्यांच्या टीकाकारांनी त्यांना कायम अपरिपक्व आणि विद्रोही मध्यस्थ म्हणूनच पाहिले.

 

 

१९४८ मध्ये राजस्थानमध्ये जन्मलेले आणि नंतर कर्नाटकमध्ये स्थायिक झालेल्या सावकार कुटुंबातले, नऊ भावंडांपैकी चंद्रास्वामी हे पाचवे.

नीमीचंद जैन यांनी ज्योतिषी, मनकवडे, तांत्रिक, जगदचार्य चंद्रस्वामी यांच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांची ओळख म्हणजे मोठा लाल तिलक, पांढरा पोषाख, वाढलेली दाढी आणि भरपूरशा रुद्राक्ष माळा. ह्यायोगे त्यांना शक्तीक्षेत्रात प्रवेश करण्यास मदत झाली.

 

Chandraswami-inmarathi
darpanmagazine.com

 

चंद्रास्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (कैलाश नाथ अग्रवाल, मामाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) पंतप्रधानांच्या सिंहासनामागे राहून सर्व शक्तीने देशावर राज्य केले.

चंद्रास्वामींशी असलेल्या खास मैत्रीमुळे पी. व्ही. नरसिंहा रावआणि चंद्रशेखर यांनी त्यांना उच्च दर्जा आणि अनेक विशेष अधिकार देऊन ठेवले होते.

ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ब्रुनेईचे सुल्तान, अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, बहरीनचे शेख इसा बिन सलमान अल खलीफा पासून अगदी सौदीचे शस्त्र विक्रेता अदनान खोगोग्गी, टिनी रोवलँड, इराकी नेते सद्दाम हुसेन, हॅरोड्सचे अल-फायद बंधू आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ह्या सर्वांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता.

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला जयप्रकाश नारायण यांचा कार्यकाळ सुरु होत होता. तेव्हा त्यांनी होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि अनेक नेत्यांशी संपर्क करायला सुरुवात केली.

कालांतराने ते सतत चर्चा आणि विवादाचा विषय बनून राहिले. त्यांच्यावर ब्लॅकमेल, फसवणूक, विदेशी विनिमय नियामक कायद्याचे उल्लंघन आणि हत्येसह इतर अनेक आरोपांचा समावेश होता.

 

Political leader Rajiv Gandhi. Express archive photo
indianexpress.com

परिणामी, १९८० आणि १९९० च्या दशकात चंद्रास्वामी आणि विवाद म्हणजे अक्षरशः एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. काहींना ते पूजनीय होते तर काहिंसाठी निंदनीय.

 Chandraswami: The rise and fall of the ‘shaman-shyster’ ह्या पुस्तकात ही माहिती आहे.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येशी त्यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा आरोप होता.

त्यांनी खोगोग्गी आणि इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांशी असलेले संबंध वापरुन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) यांना पैसे दिल्याचे समोर आले होते. त्यासाठी मिलिंदचंद जैन आयोगाने ह्या कथित अध्यात्मिक गुरूची चौकशी केली.

सुदैवाने नरसिंहराव ह्यांच्या आग्रहाने स्थापन झालेल्या पॅनल कडून १९९८ मध्ये अहवाल आला. या अहवालात एक संपूर्ण खंडच चंद्रास्वामी यांच्या कारवायांवर होता.

 

Chandraswami-inmarathi01
mathrubhumi.com

 

या अहवालानंतर चंद्रास्वामी यांची चौकशी सुरू झाली. त्यांना परदेशात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती, परंतु २००९ मध्ये ही बंदी उठविण्यात आली.

आयकर अधिकार्यांनी चंद्रास्वामींच्या आश्रमाची झडती घेतली आणि अधिकाऱ्यांना तिथे खोगोग्गी यांना देण्यासाठी लिहून ठेवलेल्या ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा चेक सापडला.

१९९६ मध्ये राव सरकारच्याच काळात चंद्रास्वामींना लंडन येथील लोणच्याचे व्यापारी लखुभाई पाठक यांची १००००० डॉलरची फसवणुक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जून २०११ मध्ये सुप्रीम कोर्टाने चंद्रास्वामींवर अनेकदा परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्याबद्दल त्यांना ९ कोटींचा दंड ठोठावण्यात आला.

चंद्रास्वामींनी त्यांचे संबंध कसे स्थापित केले, त्यांचा विस्तार कसा केला आणि ते संबंध कसे वापरले याबद्दल अनेक कथा आहेत. याशिवाय बऱ्याच राजकीय आणि इतर नेत्यांनी त्यांचे काम काढून घेण्यासाठी चांद्रस्वामींचा उपयोग करून घेतला.

 

Chandraswami-inmarathi02
indianexpress.com

 

जसे, सेंट किट्स प्रकरणात व्ही. पी. सिंग ह्यांना अडकवण्यासाठी त्यांना मदत मागण्यात आली होती.

माजी नेते आणि मंत्री श्री के. नटवर सिंह ह्यांच्या ‘वॉकींग विथ लायन्स – टेल्स फ्रॉम ए डिप्लोमॅटिक पास्ट’ या पुस्तकात चंद्रस्वामी शिफारशींसह सशस्त्र कसे आले, ह्याचा लेखाजोखा वाचायला मिळतो.

१९७५ मध्ये चंद्रास्वामी त्यांच्याकडे थॅचरसोबत भेटीची मागणी करण्यासाठी लंडनमध्ये आले होते.

त्यांनी तिला दैवी पोशाख दिला, ती भविष्यात पंतप्रधान म्हणून नियुक्त होणार अशी भविष्यवाणी केली आणि तिने आयुष्यभरासाठी एक विश्वासू शिष्य आणि मैत्रीण म्हणून आपले कर्तव्य निभावले. त्यांनी तिला प्रभावित केले – आपले संभाव्य मित्र आणि क्लायंट म्हणून.

असे म्हटले जाते की, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला हैदराबाद येथे यज्ञ करत असताना चंद्रास्वामी राव यांना भेटले होते. १९९१-९६ पासून कॉंग्रेस पक्षाचे नेते राव भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा पासून त्यांची मैत्री आणखीन घट्ट झाली.

 

Chandraswami-inmarathi03
sheminjoy.wordpress.com

 

या काळात चंद्रास्वामींनी दक्षिण दिल्लीतील कुतुब संस्था क्षेत्रामध्ये एक विशाल आश्रम – विश्व धारायतन संस्था उभारली पुढे ते सत्तेच्या साधकांचे केंद्र बनले. खरं म्हणजे इंदिराजींच्याच काळात चंद्रास्वामी यांना जमीन देण्यात आली होती.

असेही आढळून आले आहे की, राव यांच्या कार्यकाळात त्यांनी अयोध्येच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या आर्थिक संकटांना मदत करण्यासाठी ब्रुनेईच्या मदतीची मागणी केली.

आणखीन एक गाजलेले प्रकरण म्हणजे “गणपती दूध पितो”… तेव्हा त्यांचा असा दावा होता की, त्याने तसे करण्यासाठी स्वतः देवाने सांगितले होते.

१९९६ मध्ये चंद्रास्वामी यांच्या विरुद्ध आरोप आणि चौकशीची मालिका सुरू झाली आणि राजकीय दृष्ट्या त्यांच्या भाग्याला उतरती कळा लागली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ते बरेचदा चुकीच्या कारणासाठी हेडलाइनमध्ये सापडले.

चंद्रास्वामीचं संपूर्ण आयुष्यच विवाद आणि रहस्यांनी भरलेलं होतं…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?