' हे ब्रॅण्ड्स तुम्हाला "भारतीय वाटतात - पण अजिबातच भारतीय नाहीत!

हे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘स्वदेशी’ चा वापर आपल्याला हल्ली खूपच सुखावह वाटतोय.

फॉरेनच्या ब्रँडेड वस्तू वापरण्याचा शौक असणारे सुद्धा चांगल्या कंपनीच्या भारतीय ब्रँडच्या वस्तू आनंदाने वापरू लागले आहेत.

भारतातील वयस्क माणसे अगदी चोखंदळ पणे शोधून शोधून भारतीय किंवा ‘मेड इन इंडिया’ टॅग च्या वस्तू खरेदी करतात.

भारतीय बनावटीच्या वस्तू आता आंतरराष्ट्रीय बाजारात देखील उपलब्ध आहेत.

कित्येक वेळा आपण खरेदी करायला गेलो की, वाटू वरचा टॅग किंवा कंपनीचे नाव वाचून ठरवतो ती घ्यायची की नाही ते. परदेशी ब्रँड तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतात. त्याच्या व्यतिरिक्त असणारे म्हणजे भारतीय असे समजून आपण ते विकतही घेतो.

पण कधी कधी आपली फसवणूक होते.

अस्सल देशी वाटणारे कित्येक ब्रँड चक्क भारतीय नसून बाहेरील देशातील आहेत.

विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. खालील काही ब्रॅण्डस हे नावाने वाटले तरी भारतीय अजिबातच नाहीत. ही फसवी नावे आणि त्यांची माहिती वाचून तर पाहा.

१. इंडियन मोटरसायकल

‘इंडियन म्हणजे भारताचे’ पण ह्या मोटरसायकल खरेचं भारताच्या आहेत का?

खरं तर ही अमेरिकेची कंपनी आहे. हिचं आधीचं नाव हिंडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे होते, पण १९२८ साली त्यांनी नाव बदलून इंडियन मोटरसायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे नामकरण केले.

 

INDIAN MOTORCYCLE-inmarathi
moorespeedracing.co.uk

 

गमतीची बाब अशी की त्यांचे भारतातील पहिले शोरूम मात्र त्यांनी २०१४ मध्ये उघडले.

२. हिंदुस्थान युनिलीवर लिमिटेड

भारताचे इतिहासापासून कायम वापरण्यात आलेले नाव म्हणजे ‘हिंदुस्तान’. पण नावात हिंदुस्तान असले तरी ही कंपनी हिंदुस्थानी नाही.

 

hindustan unilever limited-inmarathi
hul.co.in

 

ही कंपनी एका युनिलीवर नावाच्या अँग्लो-डच कंपनिच्या मालकीची आहे. मार्च २०१५ पासून ६७% शेअर्स ह्याच कंपनीच्या नावे आहेत.

३. बाटा शूज:

ह्या नावाने तर नक्कीच धक्का बसेल. लहान पणापासून शाळा सुरू होताना शाळेच्या बूट आणि सॉक्सची खरेदी बाटा मधूनच ठरलेली असायची.

मजबूत बनावटीची पादत्राणे कायमच भारतीयांच्या पसंतीस उतरली आहेत. आता इतर फॉरेन ब्रॅण्डसच्या स्पर्धेत टिकून राहायला बाटा ने नवीन फॅन्सी शूजचे पण कलेक्शन आणले आहे.

 

bata-inmarathi
medium.com

 

कित्येक वर्षे आपण बाटा ही भारतीय कंपनी मानत आलो आहोत. आणि म्हणून बिनदिक्कतपणे तिथून खरेदी करत आलो आहोत.

‘द बाटा शु कंपनी’ १८९४ मध्ये झलीन, मोराविया इथे उभारण्यात आली.

कॉब्लर म्हणजे कर्माने चांभार असलेले टॉमस बाटा, त्यांचा भाऊ अंटॉनिन आणि बहीण ऍना ह्यांनी मिळून ही कंपनी थाटली.

आता जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड भारतातही आपलासा वाटतो. ह्याचे हेड क्वार्टर लोसॅन, स्वित्झर्लंड इथे आहे.

४. कोलगेट

वर्षानुवर्षे भारतीयांची सकाळ ज्या पेस्टने सुरू होते ती म्हणजे कोलगेट.

ही पेस्ट इतक्या वर्षांपासून भारतात वापरली जाते की, ही भारतीय नसून बाहेरील देशातून आलेली आहे ह्याचा विसर सगळ्यांना पडलेला आहे. इतका की ‘पेस्ट’ हा शब्द कोलगेट म्हणूनच वापरला जातो..

 

colagate-inmarathi
marketing91.com

 

अमेरिकेच्या कोलगेट पामोलिव्ह ह्या कंपनीचे कोलगेट हे प्रॉडक्ट आहे. जगभरात साबण, डिटर्जंट, मुखशुद्धीची प्रसाधने कोलगेट तर्फे बनवून विकली जातात.

५. टट्रा ट्रक्स

भारतीय लष्करात जे ट्रक वापरले जातात त्यांची जडणघडण अगदी भारतीय वाटते. त्यांची बनावट भारतीय रस्त्यांवर उपयोगाला येईल अशीच आहे. पण हे ट्रक भारतीय नाहीत.

 

tatra-inmarathi
myntransportblog.com

 

टट्रा ही झेक रिपब्लिक ह्या देशातील आहे. १८५० साली ही बनवण्यात आली.

टट्रा पर्वत रांगांवरून हे नाव कंपनीला देण्यात आले आहे. भारत अर्थ मूव्हर्स ह्या कंपनी सोबत भारतीय पद्धतीचे ट्रक ही ‘टट्रा कंपनी’ बनवते.

६. स्टार टीव्ही:

केबल टीव्ही आल्यापासून प्रसिद्ध सिरीयल पाहणे सुरू झाले ते स्टार टीव्ही वर.

स्टार नेटवर्क हे भारतातील जवळपास सगळ्या भाषेत उपलब्ध आहे. स्टेट लेवल वरच्या सीरिअल, बातम्या आणि मनोरंजनाचे कार्यक्रम स्टार चॅनेल वरून घराघरात पोहोचले आहेत.

 

star tv-inmarathi
de.wikipedia.org

 

भारतातील प्रत्येक टीव्ही वर दिसणारे हे स्टार नेटवर्क २१st सेंच्युरी फॉक्स ह्या अमेरिकन मल्टिनॅशनल मास मीडिया कंपनीचा भाग आहे आणि स्टार इंडियन हे युनिट भारतात प्रक्षेपण करते.

७. नेस्ले

रोजच्या खाण्यात असलेले मॅगी नूडल्स आणि किटकॅट सारख्या चॉकलेट्स ची जननी नेस्ले कंपनी आहे. पण ही भारतीय नसून स्वित्झर्लंड ची कंपनी आहे.

 

nestle-inmarathi
republica.com

 

स्वित्झर्लंड मध्ये वेवे येथे त्यांचे हेड क्वार्टर आहे. जगभरात प्रसिद्ध असलेली ही फूड आणि बेव्हरेज कंपनी भारतातही आहे.

८. बोस स्पीकर्स

बोस हे बंगाली आडनाव आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बोस स्पीकर्स भारतीयच असले पाहिजेत असा आपला गोड गैरसमज होऊ शकतो.

 

bose-inmarathi
pinterest.com

 

गम्मत अशी की हे खरेच बंगाली आडनाव आहे आणि अमर बोस ह्या माणसाने हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. मग तरीही हे भारतीय कसे नाही बुवा?

कारण जरी अमर बोस ने हे बनवलेले असले तरी ही कंपनी अमेरिकन आहे आणि ही व्यक्ती सुद्धा NRI आहे.

१९६४ साली फार्मिंगहॅम मसच्युसेटस येथे स्थापण्यात आली आणि ऑडिओ रेंज चे सगळे इक्विपमेंट्स ही कंपनी बनवते.

९. गुंडांग गरम सिगारेट्स

नावात भारतीय भाषेतील शब्द असले तरी हा सिगरेट चा ब्रँड भारतीय नाही.

 

Gudang Garam Cigarettes-inmarathi
localpress.co.in

 

१९५८ साली इंडोनेशिया मध्ये जोआ इंग हवी नामक माणसाने ही मसाला सिगरेट बनवली आणि अंतर राष्ट्रीय बाजारात आणली.

गुंडांग गरम ह्याचा इंडोनेशियन भाषेतील अर्थ म्हणजे ‘मिठाचे आगार’…

१०. वेदांता रेसोर्सेस 

वेद पुराणे हे भारतीय संस्कृतीशी निगडित शब्द आहेत.

भारतात वेद, वेदांत अशी लहान बाळांची नावे ठेवण्यात येतात. एखाद्या उद्योगाला देखील आशा प्रकारची नावे दिलेली आपण पाहतो.

 

vedanta resources-inmarathi
edantaresourcesplc.com

 

ओडिशा मध्ये खाण कामासाठी भली मोठी जमीन नावावर असलेली ही वेदांता रेसोर्सेस कंपनी भारतीय मात्र नाही.

हिचे हेडक्वार्टर लंडन येथे आहे आणि ह्या कंपनीतील शेअर्स बऱ्याच ब्रिटिश लोकांकडे आहेत.

११. टाईड डिटरजेंट 

सगळ्यात जास्ती सफेदी मिळवून देण्याचा दावा करणारी, पांढरे शुभ्र कपडे पाहून ‘चकित झालात’ अशी जाहिरात दाखवणारे टाईड डिटर्जंट आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे.

 

tide-inmarathi
thestar.com.my

 

घरोघरी वापरले जाणारे हे प्रॉडक्ट भारतीय बनावटीचे नसून प्रॉक्टर अँड गँबल ह्या अमेरिकन कंपनीत बनवले जाते.

१९४६ साली अमेरिकेत स्थापलेली ही कंपनी इतके वर्ष जगभरात आपली उत्पादने विकत आहेत.

हे सगळे वाचून आपल्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटला असेल.

त्यामुळे जर आपण भारतीय वस्तू निग्रहाने वापरात असाल तर ह्यांचा ब्रँड तपासून बघून मगच वस्तू खरेदी करा.

बाकी ज्यांना वस्तूच्या ‘मेक’शी काहीही घेणे देणे नाही त्यांना ह्या वस्तू खरेदी करण्यास काहीच अडचण नसावी..!!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?