' WWE स्टार ख्रिस बेनवॉच्या गूढ मृत्यूमुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली : भाग ३

WWE स्टार ख्रिस बेनवॉच्या गूढ मृत्यूमुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली : भाग ३

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : स्वप्नील खेरडेकर

===

मागील दोन्ही भागात आपण ख्रिसचा प्रवास आणि त्याच्या भयावह मृत्यूविषयी जाणून घेतलं, या भागात आपण नंतर रेसलिंगच्या दुनियेत काय बदल झाले याबद्दल जाणून घेणार आहोत.  मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!

(दुसऱ्या भागाची लिंक: पत्नी आणि मुलाला संपवून स्वतः आत्महत्या करणारा WWE स्टार ख्रिस बेनवॉ: भाग २)

===

पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये बेनवॉच्या मेंदूवर बरेच आघात असल्याचं दिसून आलं. Sports Legacy Institute च्या डॉ ज्युलिअन बेल ह्यांनी केलेल्या चाचण्यांनुसार बेनवॉचा मेंदू हा अल्झायमर झालेल्या ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या मेंदूप्रमाणे वाटत होता.

तज्ज्ञांच्या मते रेसलिंग करत असताना बरेचदा डोक्यावर घेतलेल्या चेयरशॉट्स मुळे हे होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

WWE ने ह्यासाठी आपली सिस्टीम काही प्रमाणात कारणीभूत असल्याचं कधीही मानलं अथवा कबूल केलं नाही. मात्र, त्यांच्या पॉलीसीजमध्ये लक्षणीय बदल घडून आला.

 

chris-benoit-03-marathipizzaa

 

Concussions ला कारणीभूत होतील असे डोक्यावर मारले जाणारे चेयरशॉट्स पूर्णपणे बंद करण्यात आले. रक्त आणि इतर हिंसा असलेली दृश्ये (निदान काही वर्षांकरता) एडीट करण्यात येऊ लागली.

तसंच, WWE शोज हे TV-14 वरून TV-PG रेटिंग वर यायला लागले, म्हणजेच हिंसाचार आणि इतर भडक कंटेंट कमी होऊन लहान मुलांना जास्त सुट होईल असं कंटेंट WWE ने दाखवायला सुरवात केली.

ख्रिस बेनवॉचा उल्लेख WWE ची वेबसाईट आणि इतर ठिकाणांहून शक्य तितका वगळण्यात आला. Drug Testing आणखी कडक करण्यात आलं.

 

chris-benoit-01-marathipizzaa

 

मात्र काही प्रश्न हे अनुत्तरीतच राहिले.

२५ जून,२००७ च्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटाने ख्रिस बेनवॉचं इंग्लीश विकीपेडिया पेज एडीट करण्यात आलं आणि त्यात पत्नी नॅन्सीच्या मृत्यूमुळे बेनवॉ शोला येऊ न शकल्याचं आणि त्याच्याजागी जॉनी नायट्रो ह्याला घेण्यात आल्याचं लिहिलं गेलं.

मात्र, पोलिसांना तीनही मृतदेह हे सुमारे साडेचौदा तासांनंतर म्हणजे दुपारी २.३० च्या सुमारास सापडले. त्यापूर्वी कुणाच्याही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नव्हती. मग ह्यांचे मृतदेह सापडण्यापूर्वी किंवा कुणाच्याही मृत्यूची बातमी बाहेर येण्यापूर्वी हे पेज कसं काय एडीट करण्यात आलं?

एका वेबसाईटनुसार काही तासांत पेजवर वेगवेगळे एडीट करण्यात आले. ह्यातल्या एका एडिटरचा IP address हा Stamford, Connecticut येथे लोकेट झाला आणि त्याच शहरात WWE चं हेडक्वार्टर आहे.

 

wwe headquarters inmarathi

 

तसंच, ज्या रात्री त्याला पुन्हा Championship टायटल मिळणार होतं, त्याच्या काही तास आधी तो असं काही करेल असादेखील प्रश्न बऱ्याच फॅन्सकडून विचारल्या जातो.

रिपोर्टमध्ये बेनवॉने आधी नॅन्सी आणि मग डॅनिएलचा खून करून मग आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला असला तरी वर नमूद केलेल्या ह्या सगळ्यां घटनांचा बेनवॉ परिवाराच्या खूनाशी काही संबंध असल्याचं होता का ह्याबद्दल अनेक लोकं अजूनही साशंक आहेत.

कित्येक लोकांच्या मते बेनवॉ निरपराध असून कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांनाही संपवून बेनवॉच्या आत्महत्येचा देखावा तयार केला. इंटरनेटवर अजूनही या विषयावर चर्चा होतात आणि मते, मतांतरे मांडली जातात.

ह्या घटनेनंतर Pro wrestling चं विश्व हे कायमसाठी बदललं.

(समाप्त)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?