' जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर झालेला ‘तो’ दहशतवादी हल्ला यशस्वी झाला असता तर…! – InMarathi

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर झालेला ‘तो’ दहशतवादी हल्ला यशस्वी झाला असता तर…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दहशतवादी हल्ले आपल्या देशाला नवीन नाहीत, आपण अशा कित्येक भ्याड हल्ल्यातून उठून उभे राहिलो आहोत, पदोपदी आपण आपली सहिष्णुताच सिद्ध केली आहे!

देशातल्या लोकांचे मानसिक तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याच्या उद्देशाने आणि धर्म जात ह्यावरून त्यांच्यात फुट पाडण्यासाठी केले गेलेले हल्ले आपण खूप पचवले आहेत.

आपल्या सुरक्षा संस्थांनी तर त्यांच्या विरुद्ध कित्येक कारवाया करून ह्या दहशतवाद्यांना यमसदनी देखील धाडले आहे!

मुंबईतला १९९३ चा बॉम्बस्फोट, दिल्लीतला किंवा मालेगाव मधला ब्लास्ट, मुंबई रेल्वे साखळी स्फोट, २६/११ रोजी मुंबईतल्या कित्येक ठिकाणी झालेले हल्ले आजही आठवले तरी प्रत्येक देशवासीयाच्या डोळ्यात अश्रु येतात!

 

terrorist attacks inmarathi
naukrinama.com

 

२६/११ च्या हल्ल्याने तर संपूर्ण इतकी हादरून गेली की त्यातून सावरायला सुद्धा खूप वेळ लागला! शिवाय त्या मध्ये सामील असलेल्या अजमल कसाब ह्या अतिरेकीला पकडून फाशी देण्यात सुद्धा आपल्या देशाला यश मिळालं!

एवढे हल्ले झाले तरी ह्यामध्ये एक हल्ला असा होता जो यशस्वी झाला असता तर आपल्या देशाचा चेहरा मोहराच बदलला असता!

तो हल्ला म्हणजे २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला, सुदैवाने हा प्लॅन फिसकटला नाहीतर पुढे काय झाले असते ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही! 

आज आपण त्याच हल्ल्याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत!

१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा हत्या करण्याचा प्रयत्न होता.

परंतु अतिरेक्यांचे फुसके मनसुबे आपल्या वीर जवानांनी पार धुळीस मिळवून टाकले आणि भारताची शान असणाऱ्या संसदेची लाज राखली.

परंतु जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर दहशतवाद्यांनी केलेल्या या आघाताची सल अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत आहे.

विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आठवणी संसदेला पाहिल्यास आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात….

 

indian-parliament-attack-marathipizza01
viresattached.com

 

१३ डिसेंबर २००१ चा तो दिवस नेहमी सारखाच सुरु झाला. भारतीय संसदेच्या भोवताली रोज असायची तशीच परिस्थिती होती. संसदेचं कामकाजही एव्हाना सुरु झालं होतं.

प्रत्येक चेहरा आपापल्या कामात व्यस्त झाला. अधिवेशन सुरु असल्याकारणाने मंत्री, खासदार आणि इतर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ति संसदेमध्ये उपस्थित होत्या.

घड्याळ ११ वाजून ४० मिनिटांची वेळ दाखवत होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.

गाडीवर गृहमंत्रालय आणि संसदेचं स्टीकर लावलेलं असल्याने कोणत्याही अडथळ्याला तोंड न देता कार वेगाने आत शिरली.

जेव्हा कार आता आली आणि थांबली तेव्हा कारमध्ये बसलेल्या एका दहशतवाद्याने बाहेर येत स्वत:ला हॅण्ड ग्रेनेडसह उडवून दिले.

अचानक झालेल्या त्याच्या जबरदस्त स्फोटामुळे क्षणभर संपूर्ण वातावरण भांबावले. नक्की काय झालंय याची कुणालाही कल्पना येत नव्हती. जो तो स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात होता.

 

parliament attack inmarathi
hindustantimes.com

 

दुसऱ्याच क्षणाला कारमध्ये बसलेल्या इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि प्रत्येकाची पळापळ सुरु झाली.

हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेबाहेर पडले होते!

परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजनांसमवेत १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि इतर भागात उपस्थित होते.

या गोष्टीची जाणीव होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केले आणि खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याच्या दहशतवाद्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

 

parliament attack 2 inmarathi
indiatoday.in

 

कारमध्ये एकूण ६ दहशतवादी होते. त्यापैकी एकाने आत्मघातकी स्फोट घडवत स्वत:चा जीव दिला, तर इतर ५ जणांसोबत कडवी झुंज देत सुरक्षा जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांना कंठस्नान घातले.

अर्ध्या तास चालेल्या या थरारनाट्यात ५ जवानांनी प्राणांचे बलिदान दिले, तर ९ जणांना दहशतवाद्यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात स्वत:चा प्राण गमवावा लागला.

 

parliament attack shaheed inmarathi
citytoday.news

 

ज्या नराधमाने हा कट रचला त्या ‘अफजल गुरूला’ फाशी देण्यात आली.

आज आपल्या कुटुंबाची देशाची रक्षा करणाऱ्या ह्या शूर जवानांमुळेच आपण आपल्या घरात अत्यंत सुरक्षितपणे झोपू शकतोय!

हे जवान, तसेच पोलिस जर हा हल्ला थांबवू शकले नसते तर आजवरच्या सर्वात मोठ्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्यात आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य होरपळून गेलं असतं!

निदान ह्याची जाण ठेवूनच आपण प्रत्येक भारतीयाने जवाबदार नागरीकासारखे वागणे अपेक्षित आहे, तेवढच करू शकतो आपण आणि केलंच पाहिजे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?