'ब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट!

ब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जगाच्या इतिहासात असे अनेक अवलीये होऊन गेले आहेत, ज्यांनी जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. त्यांनी त्यांचा अफाट इच्छाशक्तीच्या बळावर काही असे क्रांतिकारक शोध लावले ज्यांनी मानवी जीवनाचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता.

असाच एक अवलिया होता मायकल फॅरेडे, त्याला विजेसंबंधित संशोधनातील पितामह म्हटले जाते.

मायकल फॅरेडेने विजेसंबंधात काही असे शोध लावले ज्यामुळे आज आपले आयुष्य सुकर झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? ह्या मायकल फॅरेडे संशोधनासाठी आवश्यक कुठलंच शिक्षण नव्हतं घेतलं!

 

michael faraday InMarathi

 

मायकल फॅरेडेचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्याचा घरी अठरा विश्वे दारिद्र्य होतं. कटुंबात सदस्यांची संख्या खुप जास्त होती.

खाण्यापिण्याचे वांधे होते. एक ब्रेड तो आठवडाभर खायचा, इतकी दरिद्री अवस्था होती. ज्याठिकाणी खाण्यापिण्याचे इतके हाल होते त्याठिकाणी शिक्षणाच्या नावाने बोंबा बोंब असणारच. फॅरेडेचे शिक्षण १४ वर्षांचा होता तेव्हा थांबले.

 

michael faraday 1 InMarathi

 

त्याला लिहणे वाचणे, गणित, भाषा, विज्ञान विषय अत्यंत प्राथमिक स्वरूपात जमत होते. पुढे त्याने कुटुंबाला आर्थिक सहारा म्हणून एका बुक बाईंडरकडे नोकरी करायला सुरुवात केली. त्याठिकाणि फॅरेडेने जेन मार्सेटचे रसायनशास्त्रावरील भाष्य वाचले.

ते १८०६ सालचे सर्वात जास्त खपाचे पुस्तक होते ज्याने सामान्य लोकांना विज्ञान संबंधित माहिती अत्यंत सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवली होती.

 

michael faraday 2 InMarathi

 

मार्सेट प्रमाणे फॅरेडेवर सर हंप्रि डेव्ही या रसायनशास्त्रज्ञाच्या कामाची भुरळ पडली, ज्याने नायट्रेस ऑक्साईडची चाचणी स्वतःवर केली होती.

१८१२ च्या वसंत ऋतूत फॅरेडेने डेव्हीचे लेक्चर अटेंड केले. त्यासाठी त्याने तिकीट खरेदी केले, ज्याचे पैसे ओव्हरटाइम काम करून त्याने कमवले होते. त्याने डेव्हीच्या लेक्चर नंतर स्वतः नोट्स काढून त्याचे बंडल डेव्हीला पाठवले. बुक बाईंडरकडे काम करायचा त्याला हा फायदा झाला.

डेव्ही फॅरेडेच्या नोट्स वाचून प्रभावित झाला. त्याला विश्वास बसत नव्हता एका अर्ध शिक्षित मुलाने असं लिखाण केलं आहे.

त्याने फॅरेडेच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि फॅरेडेची ऍडमिशन रॉयल सोसायटीच्या कॉलेज मध्ये केली. जिथून पुढे फॅरेडेच्या संशोधनाला वाव मिळाला.

 

micheal-faraday-inmarathi
thehindu.com

१८२० पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं की चुंबकीय क्षेत्रात वीजेची निर्मिती होते. तसेच दोन विद्युत बल असलेल्या तारा एकमेकांप्रति बलाची निर्मिती करत असतात. फॅरेडेने हे दोन्ही बल एका मेकॅनिकल सेट अप मध्ये आणले जाऊ शकतात असे दाखवले.

१८२२ मध्ये त्याने एका कृत्रिम चुंबकाची निर्मिती केलो जे वीज वाहक होते.

तसेच एखादी विद्युत प्रवाह वाहून नेणारी वायर जी चुंबकीय बलाच्या मदतीने विद्युतीय बलाची निर्मिती एका मेकॅनिकल बलात करते, अर्थातच इलेक्ट्रिक मोटरची निर्मिती केली.

त्याच्या ह्या कमगिरीची दखल अनेक मोठ्या सायंटिफिक जर्नलने घेतली.

 

michael faraday 3 InMarathi

 

यानंतर त्याने दशकभर संशोधन केलं, फॅरेडेने चुंबकीय बलातून तारेत विद्युत तरंग निर्मितीचा शोध लावला. ह्यालाच इलेक्टरो- मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी फॅरेडेने एक यंत्राची निर्मिती केली. ज्यात त्याने तांब्याची प्लेट बसवली, ही प्लेट चुंबकाच्या दोन ध्रुवात फिरायची आणि त्यातून ऊर्जेची निर्मिती व्हायची.

ह्या मशिनला आज आपण इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून आपण ओळखतो.

 

electric-generator-inmarathi
engineeringtime.com

 

फॅरेडे एवढ्या वरचं थांबला नाही त्याने एका साध्या प्रयोगातून मॅग्नेटिक शक्तीची ताकद दाखवली. सोबत त्याने रस्त्यातील अडचणींचा मॅग्नेटिक अर्थात चुंबकीय बलावर कुठलाच परिणाम होत नाही हे देखील या प्रयोगातून सिद्ध केलं. यातून अंतराळातील चुंबकीय बलाचे प्रात्यक्षिक जगाला दाखवले.

फॅरेडेने रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये अनेक पदे भूषवली, त्याने वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम केलं. त्याने रिसर्चसाठी इन्स्टिट्यूटच्या आवारात मॅग्नेटिक लॅब्रोटरीची निर्मिती केली.

दरवर्षी त्या लॅबरोटरी अनेक संशोधन लावले. आज ही ती लॅबरोटरी आहे. तिला फॅरेडे म्युझियम म्हटले जाते.

 

michael faraday 4 InMarathi

 

ह्या क्षेत्रात लागलेल्या विविध संशोधनाची माहिती त्या ठिकाणी देण्यात येत असते. फॅरेडेने आज मॉडर्न सायन्स मधील अनेक सायंटिफिक टर्म्सला जन्म दिला आहे. अगदी “सायंटिस्ट” हा शब्दही त्याने शोधला. ह्या आधी “नॅचरल फिलॉसॉफर” हा शब्द त्यासाठी वापरला जात होता.

इलेक्ट्रोनिक्स मधील जवळजवळ अर्ध्या संज्ञा फॅरेडेच्या आहेत असं म्हटलं जातं.

१८४८ मध्ये ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाच्या पुत्राने- प्रिन्स आलबर्टने फॅरेडेच्या कुटुंबियांच्या नावे एक इस्टेट करून त्यांना राहायला एक रॉयल घर दिलं. १८६७ ला “३७ हॅम्प्टन कोर्ट” येथील घराचं नाव त्याचा मृत्यू नंतर फॅरेडे हाऊस करण्यात आलं.

फॅरेडेच्या सन्मानार्थ युनायटेड किंगडमच्या २० पौंडच्या नोटेवर फॅरेडेचा फ़ोटो लावण्यात आला.

 

michael faraday 5 InMarathi

 

२००१ साली तो हटवला तेव्हा त्याचा चेहरा असलेल्या १२० मिलियन नोटा बाजारात होत्या. तो यामुळे ब्रिटनच्या त्या रॉयल ब्रिटिश लोकांच्या यादीत पोहचला होता ज्यांचा फोटो या नोटेवर होता.

याआधी हा सन्मान शेक्सपिअर, न्यूटन आणि नायटेनगल सारख्या लोकांच्या नावे होता.

अश्याप्रकारे अत्यंत शून्यातून सुरुवात करून इतिहासात अजरामर होणाऱ्या या थोर शास्त्रज्ञाला विज्ञानाच्या मदतीने आपले आयुष्य सोपे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट!

  • December 30, 2019 at 9:17 am
    Permalink

    this is very inspire story

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?