' Adidas बनवतंय waste plastics पासून 3D printed बूट

Adidas बनवतंय waste plastics पासून 3D printed बूट

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

रोज निर्माण होणारा अब्जो टन  कचरा ही जगासमोरची, सर्वात भीषण समस्यांपैकी एक समस्या आहे. फक्त भारताच्या ग्रामीण भागांतून रोज 6 करोड 20 लाख टन कचरा तयार होतो. विशेषतः plastic चा  कचरा हा जगाची अशी समस्या होऊन बसलाय ज्याचं solution कुणालाच सापडत नाहीये. कारण असं म्हणतात की एक साधारण प्लास्टिक नष्ट व्हायला (decay process ) जवळपास १० हजार वर्ष लागतात. त्यात  “समुद्र” ही जणूकाही “plastic dispose system” असल्यासारखं जगभरातलं plastic समुद्रार्पण करण्याचा प्रघात रूढ झालाय. दरवर्षी सुमारे 80 लाख plastic bags, बॉटल्स, खेळणी असा कचरा समुद्रात उतला जातो. त्यामुळे plastic च्या समस्येवर अनेक creative, अभिनव उपाय शोधण्याचा अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यात Adidas ने एक यशस्वी पाऊल टाकलंय, असं वाटतंय.

जगात अशा काही कंपन्या आहेत, ज्या plastic re-use वर research करतायेत. त्यामधील एक अग्रेसर असणारी कंपनी म्हणजे Adidas. Adidas बनवतंय waste plastics पासून 3D printed बूट.

Adidas_3D-printed-midsole_ocean-plastic_marathipizza

 

Adidas आणि Parley for the Oceans, ही समुद्रातील Plastic waste कमी करण्याची धेय असलेली कंपनी, ह्या दोघांनी मिळून समुद्रातील waste plastic पासून एक 3D printed shoe बनवलाय. सध्या जरी हा एक prototype असला तरी समुद्री कचऱ्यापासून आपण कसं सामान बनवू शकतो हे demonstrate करणं, हे ह्या प्रयोगाचं commercial success आहे.

 

Adidas_3D-printed_ocean-plastic_marathipizza
ह्या shoe चा वरील भाग पूर्णपणे समुद्री plastic पासून बनवलेला असून खालील भाग recycled polyester and gillnets ने बनवलेला आहे. Paris मधील Climate Exchange चं औचित्य साधून, हे shoes launch केले गेले होते.

 

Adidas_3D-printed-midsole_ocean-plastic-marathipizza
Adidas कंपनीने अशा प्रकारे redesigns चे विवीध प्रयोग करून plastic pollution कमी करण्याची प्रतिज्ञा घेतलीये. आता त्यांचं पुढील लक्ष्य retail stores मधील plastic bags कमी करणं – हे आहे. ह्यासाठी ते नवीन ideas वर काम करताहेत आणि हे लक्ष्य 2016 च्या first quarter, म्हणजेच जून 2016 च्या अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात Adidas आहे.

 

Image source: dezeen.com

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 25 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?