' निवृत्तीनंतर बराक ओबामा आता काय करत आहेत? – InMarathi

निवृत्तीनंतर बराक ओबामा आता काय करत आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपण कितीही राजकारणाला शिव्या घातल्या तरी, एखादा सॉफ्ट कॉर्नर असलेली राजनैतिक पार्टी किंवा राजनैतिक नेता प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात असते. मग तो नेता सत्तेत असो नाहीतर सत्तेबाहेर!

त्याचे राजकारणामध्ये असतानाचे ‘साफ व्यक्तिमत्व’ आपल्याला भुलवून जाते. त्या नेत्यामुळे नकळत आपण त्याच्या पार्टीचे चाहतेही बनतो. कधी कधी त्याची पार्टी आवडो ना आवडो पण त्या राजनेत्याबद्दल आपल्या मनात आदर मात्र कायम राहतो.

 

barack-obama-inmarathi

भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. लाल बहादूर शास्त्री, सुरेश प्रभू, वल्लभ भाई पटेल, मनोहर पर्रीकर, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि सध्या भारतात आणि देशविदेशात गाजत असलेले भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीसुद्धा..!

जगाच्या राजकारणात देखील लोकांच्या मनावर काही व्यक्तींनी खूप प्रभाव पाडला आहे. दर वर्षी फोर्ब्सची यासंदर्भात यादी प्रसिद्ध होत असते. जगभरातील काही प्रभावित करणाऱ्या नेत्यांची नावे त्यात प्रकाशित होत असतात.

अमेरिका, इंग्लंड, रशिया अशा मोठमोठ्या देशांचे दिग्गज नेते या मोठ्या याद्यांमध्ये नेहमी स्थान मिळवत असतात. त्यांची कारकीर्द आणि त्यांनी घेतलेले निर्णय लोकांना आवडल्याने साहजिकच ते नेते त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहतात.

काही नेते त्यांची कारकीर्द संपल्यावर देखील तितकेच हवेहवेसे वाटतात.

एखादा नेता जेव्हा राजकारणातून निवृत्त होतो त्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी करण्याची इच्छा असते. वयाने आणि तब्येतीने साथ दिली तर त्या गोष्टी करायला त्या नेत्याला त्याच्या प्रसिद्धाचा फायदाही होतो.

सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लिलया पार पाडणारे काही राजनैतिक नेते अजूनही लोकांची वाहवा मिळवतात.

अमेरिकेचे बराक ओबामा हे देखील जगातील प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडत्या नेत्यांच्या यादीतील वरचे नाव आहे. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सपोर्टर्सच्या गळ्यातला ताईत होते. त्यांनी खूप मोठमोठे निर्णय घेतले, कामे केली आणि जनतेच्या विश्वासाचे सहज सार्थक केले.

 

barack-obama-rally-inmarathi

 

बलाढ्य अमेरिकेला वचकून असणाऱ्या परराष्ट्रांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध स्थापले आणि त्या राष्ट्रात मोठमोठे व्यवहार सुरू केले. त्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले. बराक ओबामांना न ओळखणार माणूस विरळाच..!!

ओबामा त्यांच्या कारकिर्दीत कायम लोकांचे प्रेम मिळवत गेले. आता ते राजकारणात सक्रिय नाहीत पण तरी देखील त्यांची क्रेझ काही कमी होत नाही. असे काय काय असतील बरे ओबामा..?? जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच असते.

इतके मोठे पद सोडल्यावर साहजिकच आयुष्यात एक पोकळी निर्माण होत असते. पण ती निर्माण होऊ न देता राजकारणातून अलिप्त राहून आयुष्यात बरेच काही करण्यासारखे आहे आणि ओबामा त्यांचे आयुष्य पुरेपूर सार्थकी लावत आहेत.

राष्ट्राध्यक्षाचे पद सोडल्यापासून ते आता जरा निवांत वेळ स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला देतात. कुटुंबाबरोबर काही सहलींचा आनंद घेतात. मुलींच्या शिक्षणाकडे आणि करिअरकडे बारकाईने लक्ष देतात.

आठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहून गेलेला वेळ पत्नी मिशेल यांना आवर्जून देतात. मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबासहित ते रमतात. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष असूनही खूप साधी आणि सोपी जीवनशैली त्यांनी जपली आहे.

स्वतःला वेळ देणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी ते आपले छंद ही जोपासत आहेत. गोल्फ खेळणे, ओप्रह विंफ्रे आणि टॉम हँक्स बरोबर यॉट वर सैर करणे, ऍडवेंचर स्पोर्ट्स इत्यादी करमणुकीच्या गोष्टी करत असतात.

obamas-inmarathi

 

इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणे आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मदतीसाठी प्रयत्न करणे हे देखील ओबामा आवडीने करतात.

एका मुलाखतीत ओबामा म्हणाले की,

‘आता आयुष्य थोडे सोपे झाले आहे. माझ्या आयुष्याचे निर्णय आता माझे मीच घेतो. सकाळी उठल्यावर मी ठरवतो की आता दिवसभरात काय काय करायचे. राष्ट्राध्यक्ष असतानाचे प्रेशर आता जाणवत नाही.’

काही टॉक शो, किंवा काही कार्यक्रमांना हजेरी लावली तर त्यांना पब्लिकली बोलण्याची संधी मिळते. त्यांना लोक सध्याच्या राजकीय घडामोडींबद्द्ल मत प्रदर्शन करायला सांगतात. तेव्हा कोणाचे नाव न घेता ओबामा सद्य परिस्थितीबद्दल खरे विचार मांडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


बऱ्याच ठिकाणी सेमिनार आणि भाषण द्यायला ही त्यांना बोलावले जाते. तेथील लोकांना उद्देशून ते अजूनही जोरदार भाषण करतात.

अमेरिकेच्या जुन्या राष्ट्रष्यक्षांसोबत ओबामा भेटीगाठी घेतात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये मध्ये जाऊन फंड उभारायला मदत करतात.

निवृत्तीनंतर पेन्शन मधून तर पैसे मिळतातच पण भाषणांमधूनही त्यांना पैसे मिळतात. त्यातील एक मोठा हिस्सा ते गरजूंच्या मदतीसाठी वापरतात.

नेटफ्लिक्स ह्या मीडिया कंपनी मार्फत त्यांना ‘इन्स्पिरेशनल स्टोरीज’ सांगणारी एक सिरिअल देखील काढली आहे.

बराक ओबामा कारकिर्दीत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायचे. त्या म्हणजे लहान मुलांचे शिक्षण, शिकलेल्यांना नोकरी आणि निसर्गाची काळजी घेणे. ह्या गोष्टींकडे त्यांचे अजूनही लक्ष आहे..

 

obama-inmarathi

 

जगभरातल्या लहान मुलांना शक्य असेल तिथे जाऊन भेटणे, विचारपूस करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ह्यात ओबामा कार्यरत असतात. सुशिक्षितांना नोकरीच्या संधी मिळवून देणे ह्यात त्यांची खारीची मदत असते.

पर्यावरणाला पुढच्या पिढ्यापर्यंत सुस्थितीत पोचवण्याकडे त्यांचा कल आहे. त्यासाठी ते अशा संस्थांसोबत त्यांना शक्य असेल ती कामं करतात.

समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना ओबामा भेटी देतात. त्यांना जमेल तितकी मदत करतात. समाजातील भेदाभेद मिटावा ह्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. अमेरिकेचे संशयाचे राजकारण जरी त्यांना पटत नसेल तरी अमेरिकेची भरभराटच व्हावी असेच त्यांना कायम वाटते.

निवृत्तीनंतर नुसते हातावर हात ठेवून पेन्शनची उधळण करण्यात आयुष्य न घालवता, अजूनही समाजासाठी काय काय करता येईल यासाठीच ओबामा आपला अमूल्य वेळ आणि आयुष्य खर्च करताना दिसतात.

त्यांच्या सारख्या अशा सामाजिक भान जपणाऱ्या राजनैतिक नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. त्यांच्या बद्दल अजूनही खूप जणांना वाटतो तो आदर आणि हीच त्यांच्या आयुष्याची सच्ची कमाई..!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?