' ब्लड प्रेशरचा गोळ्यांपासून सुटका पाहिजे...मग जीवनशैलीत हे १३ सोप्पे बदल करा.

ब्लड प्रेशरचा गोळ्यांपासून सुटका पाहिजे…मग जीवनशैलीत हे १३ सोप्पे बदल करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“मला जरा ब्लड प्रेशरचा त्रास होतो”, असे जर कोणी आपल्या जवळची व्यक्ती म्हणाली तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागते. आधीच कोरोना नावाच्या संकटाने थैमान घातले आहे .

पूर्वी ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ह्याबद्दल आपल्याला थोडे कमी ज्ञान होते. पण गेल्या दहा वर्षात जगामध्ये इतके संशोधन झाले आहे की, ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक, ह्या गोष्टींची माहिती कधीही मिळवता यायला लागली आहे. ह्या भीतीदायक रोगांचे आता काही फार वाटत नाही.

आताच्या धावपळीच्या जगात ब्लड प्रेशर मात्र बऱ्याच लोकांचे सोबती झालेले आहे. सगळ्याच देशांमध्ये बहुतांशी लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतोच. ह्याचे कारण आपली जीवनशैली. खाणेपिणे, झोप, कामाच्या वेळा, ह्यावर नियंत्रण नसलेली जीवनशैली ब्लड प्रेशरचे मूळ आहे.

 

High-Blood-Pressure-inmarathi

हे ही वाचा – बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!

पण रोजच्या धावपळीत हे कोणालाही लक्षात येत नाही. जेंव्हा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते आणि डॉक्टर सांगतात तुमचे बी.पी.हाय झाले आहे, आता तुम्हाला रोज बी.पी.च्या गोळ्या न चुकता घ्याव्या लागतील. त्यावेळी कळते आपले बी.पी.वाढले आहे.

पण रोजच गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे आपले बी.पी.कंट्रोलमध्ये राहणार आहे म्हणल्यावर पुन्हा जीवनशैली तशीच चालू ठेवली जाते. रोजच्या सवयीप्रमाणे आपण त्यात काहीही बदल करत नाही. मग बी.पी.बरोबरच मधुमेह, हृदयरोग, हेही जवळ येतात आणि वाढत जाते आपल्याच जीवनाची अनिश्चिती.

असले अनिश्चित जीवन जगण्यापेक्षा आपण जर आपल्या जीवनशैलीत काही बदल केले तर बी.पी.ला आपण कायमचा निरोप देऊ शकतो. मग रोजच्या गोळ्या घेणंही बंद होईल आणि  बी.पी. दूर पळाला तर बाकी मधुमेह, हृदय रोग हे आपल्या जवळ सुध्दा फिरकणार नाहीत.

चला तर मग आत्ताच जाणून घेऊ बी.पी.ला पळवून लावण्यासाठी आपल्या जीवनशैलीत करायचे हे साधे सोपे बदल.

रोजच्या सवयीत बदल करायचे म्हटले की आपण लवकर तयार होत नाही. ते बदल जाणूनबुजून, लक्षात ठेवून करावे लागतात. कारण ते आपल्या चांगल्यासाठी असणार आहेत हे आपल्या डोक्यात बसले पाहिजे.

 

१) सर्वप्रथम आपण माहिती करून घेतले पाहिजे आपले ब्लड प्रेशर किती आहे. १२०/८० असे साधारण सुदृढ व्यक्तीचे बी.पी.असते.

पण २०१३मध्ये अमेरिकन मेडिकल असोसीएशन च्या नवीन प्रसिध्द झालेल्या मार्गदर्शक जर्नल मध्ये दिलेल्या माहिती नुसार १४०/९० mm Hg. किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे नॉर्मल बी.पी.असे समजावे. त्यात आपले किती आहे हे निश्चित जाणून घ्यावे.

 

२) कधी कधी डॉक्टर कडे गेल्यावर पांढर कोट घातलेले डॉक्टर आणि तिथले एकूण वातावरण पाहून सुद्धा आपले ब्लड प्रेशर वाढते.

म्हणून ब्लड प्रेशर कफ (blood pressure cuff) आपण स्वतः च खरेदी करून घरच्या घरी ब्लड प्रेशर पाहणे योग्य असते असे अमेरिकेतल्या प्रसिद्ध Dr. Johny Bowden यांचे म्हणणें आहे.

 

३) तिसरी गोष्ट म्हणजे  रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कारण त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते. अर्थात काही लोकांना मिठाचा काहीही त्रास नसतो.

ते जास्त खाल्ले तरी त्यांचे ब्लड प्रेशर वाढत नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा दावा फोल ठरेल. पण processed foods खाणे शरीराला हितकारक नसते, त्यामुळे ते न खाणेच चांगले.

 

४) जास्तीत जास्त भाज्या खाव्यात. कारण भाज्यांमध्ये पोटॅशियम असते. जेवढे जास्त पोटॅशिअम आपल्या शरीराला मिळेल तेवढे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.

 

 

vegetarian-inmarathi

 

 

५) शरीराचे वजन कमी करणे हा एक चांगला उपाय आहे, कारण जेवढे शरीर स्थूल, वजन प्रमाणापेक्षा जास्त तेवढी तुमची उच्च रक्तदाबाची शक्यता जास्त वाढते. म्हणून वजन कमी करण्याचा एखादा प्लान घ्यावा आणि ते प्रमाणात आणावे.

“वजन कमी तर उच्च रक्तदाबाची शक्यता कमी”, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे जरुरीचे आहे. किमान आठवड्यातून अडीच तास ताकद वाढवणारा व्यायाम करावा.

 

६) पुरेशी झोप घेणे जरुरीचे आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉपवर बराच वेळ रोज काम करणे, त्यात कामाचा ताण, अशा गोष्टीमुळे डोळ्यावर सुद्धा ताण येतो. रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरवर काम केल्याने झोप होत नाही.

त्यामुळेही ब्लड प्रेशर वाढू शकते म्हणून पुरेशी म्हणजे रात्रीची ८ तास झोप घेणे जरुरीचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जातो त्यामुळे बी.पी.ची चिंता राहत नाही.

हे ही वाचा -हे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील

 

७) मानसिक ताण काढून टाकावा. सतत कोणत्यातरी विषयामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल तर तो विषय मनातून काढून टाकावा. कुठली चिंता असेल तर ती काढून टाकावी म्हणजे मन हलके करावे. यामुळे ब्लड प्रेशर वाढत नाही.

सतत त्रास देणारे विचार कसे काढून टाकायचे?

तर रोज काही वेळ प्राणायाम करावे. त्यामुळे संपूर्ण शरीराला प्राणवायूचा चांगला पुरवठा होतो आणि शरीर ताजे तवाने व्हायला मदत होते. मेडिटेशन हा तणाव घालवण्याचा सगळ्यात चांगला उपाय आहे.

मेडिटेशन करत असताना मनातले विचारचक्र कमी होऊन एकही विचार नसलेली अवस्था प्राप्त होते आणि सगळा मानसिक ताण नाहीसा होतो. अर्थात मेडिटेशन सतत केल्याने ही अवस्था प्राप्त होते.

 

८) कॅफेनचे प्रमाण जर शरीरात जास्त वाढत असेल तर ते कमी करावे लागते.

सतत चहा, कॉफी, सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, ह्यांमुळे बी.पी.वाढते. एकदम ते पिणे बंद न करता हळूहळू कमी करता येते. आणि फक्त एखादा कप घेण्याने अपाय न होता बी.पी.कमी होते.

 

Caffeine-Content-Drinks-inmarathi

 

 

९) जर आपण रात्री झोपेत घोरत असाल तर त्या घोरण्याचे कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करावा. सर्दी, कफ, ऍसिडिटी, जास्त चरबी गळ्यावर साठणे, ह्या अनेक कारणांमुळे माणूस घोरतो.

कोणताही आजार वाढत गेला की त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे जरुरीचे असते. म्हणून घोरणाऱ्यांनी उपाय करून घ्यावेत.

 

१०) बिलबेरी नावाचे फळ खाण्याने ब्लड प्रेशर कमी करता येते. आत्ताच्या एका नवीन अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे .

 

११) कोको खाण्याने सुद्धा बी.पी. कमी होते. नवीन अभ्यासातून हेही सिध्द झाले आहे की डार्क चॉकलेट खाऊन ब्लड प्रेशर कमी होते. पण जास्त नाही तर, एक स्क्वेअर इंच इतके चॉकलेट एकावेळी खाण्याने बी.पी. कमी होते.

 

१२) जास्तीत जास्त मॅग्नेशियम आपल्या शरीरात गेल्याने ब्लड प्रेशर कमी होते. हे मॅग्नेशियम बी.पी.तर कमी करतेच. शिवाय शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या जाड भिंतीही साफ करून रक्ताभिसरण चांगले होण्याला मदत करते.

हे मॅग्नेशियम आपल्याला हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, चणे, तसेच तीळ, जवस ह्यातून मिळते. तसेच अवोकॅडोतून जास्त प्रमाणात मिळते.

तेलाचे जास्त प्रमाण असलेले मासे आठवड्यातून किमान दोनदा तरी खावेत ह्यातून ओमेगा-३ असिड मिळते. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते.

 

१३) धूम्रपान बंद करणे आवश्यक आहे. धूम्रपान तुमच्या शरीराला अनेक प्रकारे घातक ठरते.

धूम्रपानामुळे सिगारेट संपल्या संपल्या तुमचे ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. जितक्या सिगारेट तुम्ही रोज संपवाल तितक्या वेळा बी.पी.वाढते. म्हणून धूम्रपान हे अतिशय घातक आहे.

 

smoking-inmarathi

 

म्हणून जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर लवकर निर्णय घ्या आणि सिगारेट ओढणे बंद करा.

हे फक्त तुमच्याच उत्तम स्वास्थ्यासाठी आहे हे लक्षात असू द्या……

===

हे ही वाचा – चॉकलेट खा आणि निरोगी राहा!

===

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ब्लड प्रेशरचा गोळ्यांपासून सुटका पाहिजे…मग जीवनशैलीत हे १३ सोप्पे बदल करा.

  • September 23, 2018 at 3:29 pm
    Permalink

    uttam…..lekh.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?