जमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सामान्यत: जमीन खोदल्यावर आपल्या हाती काय लागतं? तर माती आणि पाणी ! परंतु आपल्या देशात एक असे गाव आहे जिथे जमीन खोदल्यावर अगदी काहीच अंतरावर सोनं मिळतं. खरं वाटत नसेल तर जाणून घ्या हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

 

Golden Coins Found.Inmarathi1
origins.net

या गावातील पोलिसांच्या मते गावात असं काहीच घडत नाही, ही फक्त अफवाच आहे. परंतु भारतीय पुरातत्व विभागाने मात्र या बातमीला दुजोरा दिला असून या गावात अशी घटना घडणे शक्य असल्याचे सांगितले आहे.

राजस्थानच्या जयपूर जवळ दाबेडिया नाडी नावाचं एक गाव आहे. पावसाळ्यात येथील मातीची धूप होऊ लागली. तेव्हा गावकऱ्यांना गावात अनेक ठिकाणी चमकणाऱ्या वस्तू दिसू लागल्या. त्यांनी जवळ जाऊन माती खोडून काढली तेव्हा त्यांना त्यामध्ये सोन्याची नाणी आढळली.

 

gold-coin-rajasthan-village-marathipizza02

स्रोत

येथील स्थानिक गेल्या चार महिन्यांपासून गुपचूप खोदकाम करून मिळणारी सोन्याची नाणी घरी घेऊन जात आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने दुजोरा दिल्याने आता येथील पोलीस देखील स्थानिकांच्या घरी असणाऱ्या सोन्याच्या नाण्यांची पडताळणी करणार आहेत.

पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार,

प्राचीन काळात भूकंप आल्यामुळे या विभागातील असंख्य गावे जमिनीत गाडली गेली. त्या काळी येथे राहणारे स्थानिक हे भटके होते. लोकांना लुटून ते आपला उदरनिर्वाहा करत असत आणि लुटलेले सोनं जमिनीमध्ये गाडून ठेवत. त्यावर निशाण लावत असत.

 

gold_inmarathi
financesonline.com

त्यावेळेचे प्राचीन अवशेष काही वर्षापूर्वी खोदकाम करताना पुरातत्व विभागाच्या हाती लागले आहते. त्यामुळे त्या लोकांनी गाडून ठेवलेलं सोनं इथे मिळणं मोठी गोष्ट नाही.

गावकऱ्यांच्या मते दहा वर्षांपूर्वी येथे खोदकाम केले असताना पहिल्यांदा सोने सापडले होते, पण गेल्या ४ महिन्यात सोने मिळण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहे.

 

gold-coin-rajasthan-village-marathipizza01

स्रोत

काय कमाल गोष्ट आहे बघा ना, एकीकडे शहरातील लोक सोन्याचे भाव कमी झाल्यावर सोने खरेदी करू असा विचार करत आहेत आणि दुसरीकडे या गावातील लोकांना फुकटचे सोने मिळत आहे.

भारतात काहीही होऊ शकतं या वाक्याला पुष्टी देणारं हे अगदी चपलख उदाहरण आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं !

  • October 8, 2017 at 4:56 pm
    Permalink

    सब भानगड ही लगता है यहा।

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?