' बारीक होण्यासाठी मांसाहार सोडताय, पण तरीही वजन वाढू शकतं! म्हणून या चुका टाळा

बारीक होण्यासाठी मांसाहार सोडताय, पण तरीही वजन वाढू शकतं! म्हणून या चुका टाळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘वजनकाट्याची सुई’ ही उजवीकडे मोठमोठ्या आकड्यांकडे भराभर पळायला लागते तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो. आता वजनकाट्याला खुश ठेवायला खूप मेहनत घ्यावी लागेल याचा त्यांना साक्षात्कार होतो.

पु. ल. देशपांडे म्हणतात तसे, “बाळसेदार भाज्या स्वयंपाकघरातून हद्दपार होतात. नवनवीन आणि विचित्र प्रकारचे पदार्थ रोज बनायला लागतात. त्याला एक गोंडस नाव प्रचलित आहे. डाएट म्हणतात ते हेच.”

बारीक होणे हे सगळ्यांचेच स्वप्न असते. त्यासाठी व्यायामाबरोबर खाण्यापिण्यावर ताबा ठेवणे हे ओघाने आलेच. बारीक होण्यासाठी दुकानभर डाएटची पुस्तके आणि शेकडो डाएटिशियन सापडतील.

काही स्वयंघोषित सल्लागार सुद्धा कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या खायच्या ह्याच्या लिस्ट घेऊन आजूबाजूलाच तैनात असतात. हल्ली इंटरनेट सुद्धा आपल्याला बारीक होण्याचे मार्ग दाखवते.

कुठून कुठून सहज सोप्पे उपाय शोधून आपण करूनही बघतो. कधी बाहेरचे अन्नपदार्थ बंद करतो तर, कधी गोड पदार्थ बंद करतो. कधी तेलकट तुपकट वर्ज्य असते तर, कधी दुधाचे पदार्थ.

 

junk food inmarathi

 

कोणी सांगतं कार्बोहायड्रेट बंद करा आणि फक्त कोशिंबिरी खा. जास्तीत जास्त प्रोटीन खा. पण जे काय खातो ते पचले देखील पाहिजे.

अचानक सगळं बंद करून कसे चालेल? त्याचेही दुष्परिणाम होऊच शकतात ना? शरीरावर केलेले असले प्रयोग यशस्वी होतीलच असेही नाही. बारीक व्हायचे सोडून वजन वाढतच गेले तर..? हो नक्कीच असेही होऊ शकते.

एका परदेशातील महिलेने तिच्या अशाच डाएटच्या विचित्र परिणामांबद्दल एक लेख लिहिला. कारमेन चांडलर म्हणतात त्यांनी बारीक होण्यासाठी शाकाहारी व्हायचा निर्णय घेतला आणि बारीक व्हायच्या ऐवजी १५ पौंड वजन वाढवून बसल्या.

 

weight-gain-inmarathi

 

सध्या फिटनेसचा ट्रेंड चालू आहे असे म्हटल्यास हरकत नाही. जो तो आपापले फिटनेस फंडे, फेसबुक पेज आणि सोशल मीडियाच्या इतर मार्गाने खपवताना आपण पाहतो.

तसेच मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांना ते शरीराला किती वाईट असतात हे सांगणारा सुद्धा एक समाज पृथ्वीवर अस्तित्वात आहे. असले पदार्थ माणसांसाठी नसून जंगली प्राण्यांसाठी असतात. म्हणून माणसांनी फक्त शाकाहारी बनावं असा म्हणण्याकडे त्यांचा कल असतो.

कारमेनने देखील तेच ठरवलं आणि मासाहार कायमचा सोडून ती पक्की शाकाहारी झाली.

शाकाहार म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये आणि भाज्या आहारात येतात. सर्वसाधारणपणे असाही समज आहे की, मासांहारापेक्षा ह्यात उष्मांक म्हणजेच कॅलरी सुद्धा कमीच असतात. म्हणजे वजन घटवण्यास मदतच होऊ शकते.

पण कारमेनच्या बाबतीत मात्र झालं उलटंच..! शाकाहारी मित्रांच्या सांगण्यावरून कारमेननी शाकाहार सुरू केला. खूप वर्ष तो व्यवस्थित पाळला. भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांवर जोर दिला. सोबत व्यायामही ठेवला.

 

vegetarian-inmarathi

 

हे सगळे नियमित करून तिला अनुभव मात्र वाईट आला. तिने वजन कमी करण्याच्या नादात वाढवलं. तिच्या पोटाचा घेर वाढला. सुस्ती आणि मूड स्विंग वाढले. नुसतं शाकाहारी बनून तिच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले.

ह्याचा अर्थ असाच झाला की, कोणत्याही पदार्थांची तुमच्या शरीराला सवय असल्यास त्या अचानक बंद केल्याने त्याचा उलटा परिणामही आपल्याला भोगायला लागू शकतो.

असे होऊ नये म्हणून कारमेन चांडलरने काही टिप्स दिल्या आहेत. त्याची उजळणी करूनच आपल्या स्वतःसाठी डाएट प्लॅन ठरवावेत.

 

१. थोडा रिसर्च करा

शाकाहारी बनणे हे मित्रांच्या सांगण्यावरून ठरवू नका. तुमच्या शरीराला काय झेपतंय ते बघा. शाकाहारी खाण्याचे फायदे नक्कीच आहेत जसे की, हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते.

 

veg diet inmarathi

 

तरीही काही प्रकारचा मांसाहार शरीरास उपयुक्त असतो. आपल्या शरीराला ह्यातले काय चालते ते लक्षात घ्या. त्याबद्दल माहिती घ्या. मगच ठरवा काय आणि किती प्रमाणात खाऊ शकतो.

 

२. आपल्या शरीराबद्दल जाणून घ्या

जे दुसऱ्यांना चालते ते आपल्या शरीराला चालेलच असे नसते. काही गोष्टींची आपल्याला ऍलर्जी होऊ शकते. तर काही पदार्थ आपल्याला उत्तमरित्या पचतात. आपले शरीर आपल्याला ह्याची सूचना सुद्धा देत असते.

काही पदार्थ खाऊन गॅसेस झाले किंवा जडत्व आले तर ते आपण बंदही करू शकतो.

 

३. मांसाहाराबरोबर शाकाहार सुद्धा गरजेचा आहे

 

veg diet inmarathi 1

 

मांसाहार करत असाल तरीही भाज्या, फळे आहारात भरपूर असू द्यात. तर काही पदार्थ स्वतः बनवायला शिका. म्हणजे तेल तूप कमी वापरून कमी कॅलरीच्या रेसिपी बनवून त्यांचा आनंद घेता येईल.

 

४. शक्यतो ऑरगॅनिक अन्न खा

भेसळयुक्त अन्नपदार्थ शरीराला कायम घातकच असतात. ऑरगॅनिक म्हणजे केमिकल’मुक्त’, नैसर्गिकरित्या उगवलेले धान्य. असे ऑरगॅनिक पदार्थ नियमित आहारात घ्या.

 

Organics-farm-inmarath

 

५. कोणताही पदार्थ घेताना त्याच्या वेष्टनावर लिहिलेले घटक वाचा

हायड्रोजनेटेड ऑइल, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटो, आर्टिफिशिअल कॉर्न सिरप, आर्टिफिशिअल स्वीटनर हे सगळं अत्यंत हानिकारक आहे. पदार्थ छान दिसण्यासाठी आणि चवीला सुंदर लागण्यासाठी हे वापरले जाते.

 

food wrapping inmarathi

 

याने वजन तर वाढतेच आणि शरीरावर इतर दुष्परिणामही दिसून येतात.

कारमेन पुढे सांगते की,

जे काही आवडते आणि शरीरास गरजेचे आहे ते ती खाते. कमी उष्मांकाचे पदार्थ स्वतः बनवून एन्जॉय करते. डाएटचे पदार्थ कंटाळवाणे आणि बेचव होणार नाहीत ह्याची ती काळजी घेते. त्यामुळे तिला ते खायला मजा तर येतेच आणि सोबतच वजनही नियंत्रित राहते.

वजन नियंत्रित असल्याने तिचा आत्मविश्वास वाढलाच आहे आणि तिचे वेळी अवेळी होणारे मूड स्विंग देखील बंद झालेत. अशा आहाराने शरीर एकदम हलके राहते आणि तिला सगळ्या गोष्टींसाठी उत्साह वाटतो.

कारमेनने तिच्या खाण्यातल्या काही चुका टाळल्या आणि ती आता खरोखरीच एक हेल्दी लाईफस्टाईल जगतेय. हे आपणही करू शकतो. हवा असल्यास चांगला डाएटिशियन शोधून त्याच्या सल्ल्याने आहारात बदल करा. 

शक्य नसल्यास आहारावर नियंत्रण ठेवा. जिभेचे चोचले पुरवताना ते शरीरास अपायकारक ठरतात हे लक्षात असू द्या.

 

Overeat_inmarathi

 

इंग्रजीत तशी मजेशीर म्हण सुद्धा आहे. यम्मी फॉर लिप्स बट फॉरेवर ऑन हिप्स..!! म्हणजे पदार्थ आवडला म्हणून खातच राहिलो तर तो चरबी बनून शरीवर साठतो आणि तिथून कधीच जात नाही.

म्हणून शुद्ध खा, कमी खा आणि स्वस्थ राहा..!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?