' जाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचं महत्त्व काय? – InMarathi

जाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचं महत्त्व काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही मोठमोठे नेते, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ति यांच्या भोवती उभे असलेले सुरक्षारक्षक पाहिले असतील. या सर्व व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा कवच प्रदान केले जाते, त्याला VIP Security म्हणतात.

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या व्यक्तींच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, तसेच त्या जेथे जातील तेथे त्यांचे संरक्षण केले जावे या हेतूने त्यांना ही VIP Security उपलब्ध करून दिली जाते. चला तर आज या VIP Security संबधित सर्व माहिती जाणून घेऊया. तेवढीच ज्ञानात थोडी भर पडेल.

 

vip-security-marathipizza01

Security कोणाला मिळू शकते आणि Security द्यायची की नाही ते कोण ठरवतं?

राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम आणि हाय कोर्टाचे न्यायाधीश, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांना ते सरकारी सेवेत असल्याकारणाने आपोआपच, न मागता VIP Security मिळते.

VVIP Security अर्थात अतिशय खास असणाऱ्या व्यक्तीला मिळणारे सुरक्षा कवच कोणाला द्यायचे हे एक समिती ठरवते. या समितीमध्ये इंटलेजींट ब्युरोचे (IB) अधिकारी, गृहसचिव आणि गृहमंत्री यांचा समावेश असतो.

तसेच राज्य सरकारने शिफारस केली तर एखाद्या व्यक्तीला VIP किंवा VVIP Security मिळू शकते.

 

vip-security-marathipizza02

सुरक्षा कवचाच्या श्रेण्या :

व्यक्तीच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या अनुसार Security चार प्रमुख श्रेण्यांमध्ये विभागण्यात आली आहे.

X Security, Y Security, Z Security आणि Z+Security !

X Security श्रेणीमध्ये साध्या प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. X Security मध्ये २ सुरक्षा अधिकारी आणि १ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सेवेत असतात.

Y Security श्रेणीमध्ये ११ सुरक्षा अधिकारी आणि ३ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी संरक्षण प्रदान करतात.

वरील दोन्ही श्रेण्यांच्या मानाने Z Security बरीच मोठी असते. एक प्रकारचा सुरक्षा ताफाच असतो म्हणा ना ! Z Security श्रेणीमध्ये २२ सुरक्षा अधिकारी, एक एस्कोर्ट कार आणि दिल्ली पोलीस किंवा सीआरपीएफ कडून प्रदान केलेली अतिरिक्त सुरक्षा यांचा समावेश असतो.

Z+Security सर्वात उच्च दर्जाची आणि सर्वात सुरक्षित Security मानली जाते. Z+ Security श्रेणीमध्ये व्यक्तीला SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (विशेष सुरक्षा गट) संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.

विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनाचं  Z+Security आणि SPG संरक्षण दिले जाते. Z+ Security श्रेणीमध्ये ३६ सुरक्षा अधिकाऱ्यांसह अत्याधुनिक उपकरणे आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले अधिकारी देखील तैनात असतात.

 

vip-security-marathipizza03

या श्रेणीचे सेवा कवच ज्या व्यक्तीला मिळते तिला २४ तास वैयक्तिक सुरक्षा मिळते. सुरक्षा अधिकारी एक सेकंदही या व्यक्तीला नजरेआड होऊन देत नाहीत.

या सुरक्षारक्षकांमध्ये २८ नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, एक एस्कोर्ट, एक पायलट, कोब्रा कमांडो आणि १२ होम गार्डसचा समावेश असतो.

१९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांच्या वैयक्तिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यावर उपाय म्हणून SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (विशेष सुरक्षा गट) स्थापना करण्यात आली.

एका अहवालानुसार SPG मध्ये सध्या ४००० अधिकारी सेवेत आहेत. आणि त्यांचा वार्षिक खर्च जवळपास ३०० करोडच्या वर असतो. मनुष्यबळानुसार खर्च केल्या जाणाऱ्या इतर सिक्युरिटी फोर्सचा विचार करता SPG ही अतिशय महागडी VIP guarding security force आहे.

 

vip-security-marathipizza03

Z+Security श्रेणीमध्ये माजी पंतप्रधानांसाठी एक अट आहे ती म्हणजे- Z+Security सोबत मिळणारे SPG सुरक्षा कवच हे पंतप्रधानांनी पद सोडल्यापासून पुढील एक वर्षचं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेत राहील. परंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल.

 

vip-security-marathipizza05

आता पुढल्या वेळेपासून तुम्ही स्वत: ओळखू लागालं की कोणत्या माणसाला कोणती security आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?