' घोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय… – InMarathi

घोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घोरणारी व्यक्ती जवळपास झोपली असेल तर झोपेचं खोबरं होतं हे जवळजवळ सगळ्यांनीच अनुभवलेलं असतं…

त्यात आपला पार्टनर म्हणजे आपली पत्नी किंवा आपण स्वतः च जर घोरत असू तर काही खरं नाही. म्हणजे आयुष्यभर हे घोरणं सहनच करायला लागतं. त्याशिवाय गत्यंतरच नसते. खरं ना?

कुठल्या पर गावच्या लग्न समारंभाला आपल्याला कधीतरी जायची वेळ येते. त्यावेळी लग्नाच्या कार्यालयात अनेकांची झोपायची व्यवस्था केलेली असते आणि तिथे हमखास एक तरी व्यक्ती असा जोरजोरात घोरणारा असतो. त्यावेळी झोपेचं खोबरं होतं हे आपण अनुभवतो.

 

snoring InMarathi

 

घोरणारा माणूस ताबडतोब झोपी जातो पण, आजूबाजूच्या न घोरणाऱ्याना लोकांना झोपू देत नाही. बरं ती व्यक्ती आपल्या जवळच्या नात्यातली असते त्यामुळे त्याचं घोरणं आपल्याला सहन करावं लागतं. आणि आपली झोप मात्र अपुरी राहते.

काही अगदीच हक्काच्या व्यक्तींना जरा हलवून जागं करता येतं आणि तू घोरतो आहेस जरा कुशी बदलून झोप असं सांगता येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण वयाने मोठ्या आणि आदरणीय व्यक्तीला आपल्याला तसे सांगता येत नाही. बरं त्या व्यक्तीला झोपल्यावर कळतही नाही की आपण घोरतो आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आपला नाईलाज होतो.

पण आपल्याच घरात आणि रोजच घोरणारी एखादी व्यक्ती असेल तर मात्र आपल्याला काही करता येत नाही. कारण हे घोरणं नैसर्गिक आहे. आणि त्यावर काही औषधोपचार असतो हे कोणाला माहितीच नाही.

 

snoring-inmarathi


जाणून घ्यायचाय का घोरणं थांबवायचा उपाय? मग वाचा पुढे.

बरीच माणसं घोरतात, काहींना त्या घोरण्याचा त्रास होतो, तर काहींना रोजच्या घोरण्याची सवय होते. काही लोक उपाय म्हणून घोरणारी व्यक्ती झोपायच्या आधी स्वतः झोपतात, म्हणजे एकदा आपल्याला गाढ झोप लागली तर घोरणाऱ्या व्यक्तीचा त्रास होत नाही.

आता माणसे घोरतात कशामुळे हे अनेकांना माहीत नाही त्यामुळे त्यावर उपाय शोधायच्या भानगडीत कुणी पडत नाहीत.

गाढ झोपल्यावर आपलं संपूर्ण अंग शिथिल होतं म्हणजे आपण रिलॅक्स होतो. त्यावेळी आपला घसा त्यातले स्नायू सुद्धा ढिले पडतात. आपल्या श्वसन मार्गावर त्या स्नायूंचा आपोआपच दाब पडतो आणि श्वसन मार्गात थोडा अडथळा निर्माण होतो.

 

snoring 1 InMarathi

 

जेव्हा आपण श्वासोच्छवास करतो तेव्हा नाकावाटे घेतलेली हवा त्या दाब पडलेल्या ठिकाणी थोडी अडली जाते. तो भाग हवेच्या आत जाण्याने थोडा थरथरतो, आणि त्या थरथरण्याने आवाज निर्माण होतो तोच आवाज म्हणजे घोरणे.

आपण कसे झोपतो ह्यावर श्वसन मार्गाची स्थिती अवलंबून असते, घशातल्या श्वसन मार्गावर दाब पडला की कंपने निर्माण होतात आणि त्याचा आवाज होतो.

Snoring 2 InMarathi

 

तरुणांमध्ये अशा घोरण्याचे प्रमाण कमी असते कारण त्यांच्या गळ्याचे स्नायू एवढे शिथील होत नाहीत. पण शरीराने जाड व्यक्तींच्या गळ्यावर, मानेवर जास्त प्रमाणात चरबी असते. त्यामुळे श्वसन मार्गात अडथळा निर्माण होऊन ते घोरतात. असे अनेक प्रकारे लोक घोरतात.

काही लोकांना सतत सर्दी होत असते त्यामुळे सर्दी त्यांच्या सायनसमध्ये भरलेली असते. कफ छातीत दाटलेला असतो आणि घशातही कफ भरलेला असतो. त्यामुळे श्वासोच्छ्वास घेताना कफाचा अडथळा निर्माण होतो आणि मोठा आवाज निर्माण होतो. कफाच्या खाली-वर सरकण्याने वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घोरण्यातून निघतात.

कफ घट्ट बसला असेल तर शरीराला हवा कमी पडते म्हणून हे लोक तोंडाने हवा आत घेतात. त्या वेळी झोपल्यावर त्यांचे तोंड उघडेच असते.

काहींना नाकाने उच्छवास सोडता येत नाही कारण नाकात सर्दी साठून राहते. मग ते तोंडाने उच्छवास सोडतात. त्यावेळी त्यांच्या तोंडाचा फूस… फूस… असा आवाज निघतो. असे घोरण्याचे विचित्र प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

 

snoring-inmarathi01

 

काही लोकांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो. सतत जागरण, वेळी अवेळी जेवण, तेलकट आणि तिखट पदार्थांचे रोज सेवन ह्यामुळे त्यांची ऍसिडिटी कधी कमीच होत नाही. ते ऍसिड पार श्वसन मार्गापर्यंत येते आणि श्वासोच्छवासाला अडथळा निर्माण होतो. नाकाने श्वास घेताना आवाज निर्माण होतो. कारण ऍसिडिटीमुळे श्वसन मार्ग बंद होतो.

आता पहा ह्या अनेक विचित्र घोरण्यावरचे साधे सोपे नैसर्गिक उपाय :

छातीमध्ये आणि नाकामध्ये जर सर्दी, कफ जाम झाला असेल तर पेपरमिंट ऑइल त्यावर रामबाण उपाय म्हणून काम करते. ह्या पेपरमिंट ऑइलमुळे सायनस मधील दाटलेली सर्दी मोकळी होते. श्वसन मार्ग मोकळा होऊन श्वासोच्छवास सहज होतो आणि घोरणे बंद होते.

 

peppermint-oil InMarathi

 

‘गोल्डन सील’ नावाची वनस्पती हर्बल रेमेडिज म्हणून ओळखली जाते. श्वसन मार्ग मोकळा करणारी ही वनस्पती आहे. त्याचा उपयोग छातीतील कफ, घशातले इन्फेक्शन घालवण्यासाठी आपण करू शकतो.

गळ्याची, मानेची चरबी आपण रोज व्यायाम करूनच कमी करावी लागते. व्यायामाने त्या चरबीचा पडणारा दबाव हा कमी कमी होत जातो. श्वसन मार्ग झोपल्यावर सुद्धा मोकळाच राहतो आणि घोरणे कमी कमी होत जाते.

ह्यासाठी चरबी कमी करणारे व्यायाम नियमित केले तर घोरण्यापासून निश्चितच सुटका होऊ शकते.

व्हिटॅमिन ‘सी’ च्या नियमित सेवनाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी पडसे सतत होत नाही.

आता ‘सी’ व्हिटॅमिन कशात असते आणि कशाचे सेवन आपण करावे हे लक्षात घेतले पाहिजे. अननस, संत्री, लिंबू, पपई, ब्रोकोली ह्या गोष्टींचे सेवन नियमित केल्यास सततची सर्दी कमी होण्यास निश्चितच मदत होते. रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि पचन शक्तीही सुधारते.

 

goldenseal plant InMarathi

“पुदिना” आणि “मेथीचे दाणे” ह्यांचे सेवन चमत्कार घडवणारे ठरते. (Miraculous herbs) पचनशक्ती सुधारते, शरीरातील विषारी घटक काढून टाकले जातात, वात विकार नाहीसे होऊन ऍसिडिटीवर नियंत्रण राहते. त्यामुळे ऍसिडिटीमुळे होणारे त्रास कमी होतात आणि घोरण्यावर आपोआपच नियंत्रण येते.

“निलगिरी”चे तेल (Eucalyptus oil) हे सर्दी पडसे, सायनसच्या विकारांवर रामबाण उपाय म्हणून वापरले जाते.

निलगिरी तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्याची वाफ सतत काही दिवस घेतल्याने सायनस, नाकापासून छातीपर्यंतच्या साठलेल्या कफावर परिणाम करते. आणि श्वसन मार्ग पूर्ण मोकळा होतो. नुसते निलगिरी तेलाचे दोन थेंब रुमालावर घेऊन नाकाने हुंगले तर सर्दीपासून आराम मिळतो.

nilgiri oil InMarathi

 

काही डॉक्टर घोरण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी झोपताना घशातला हवेचा मार्ग मोकळा राहावा म्हणून स्नायू ताणलेले राहण्यासाठी प्लास्टिकचे ताण देतात.

त्यानेही काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. काही नाकाचा मार्ग मोठाच राहावा म्हणून नाकात बसवण्याचे प्लास्टिकचे ताण देतात. त्यामुळे श्वास घेताना नाकातून आवश्यक तेवढी हवा आत जाते आणि घोरणे बंद होते.

 

nasal InMarathi

 

काहीवेळा कोरड्या हवेमुळे श्वास घेणे अवघड होते त्यावेळी हवेत वाफ निर्माण करून श्वसन करायला मदत होईल असे इन्हेलर उपयोगी पडते.

धूम्रपान सतत करणाऱ्यांना कफ, सर्दी होते आणि हे लोक हमखास मोठ्याने घोरतात. धूम्रपान ताबडतोब बंद करणे हा सगळ्यात साधा उपाय. कफ आणि सर्दी ही धूम्रपानामुळे कमीच होत नाही आणि हळू हळू श्वासमार्ग शिथिल होत जातो. त्यामुळे श्वास घेणे कठीण होत जाते, छातीत कफ साठून राहतो. आणि इन्फेक्शन होऊ शकते. सतत धूम्रपान कधीही धोक्याचेच असते.

साठलेल्या कफामुळे पाहिजे तितक्या ऑक्सिजन चा पुरवठा हृदयाला होत नाही आणि हृदय रोगाला आमंत्रणच दिले जाते. म्हणून धूम्रपान लगेच बंद करणे योग्यच.

 

snoring-inmarathi03

 

आपला आहार योग्य असावा. त्यात सुधारणा करावी. सतत तळलेले पदार्थ वर्ज्य करावेत. चरबी वाढवणारे दुग्धजन्य पदार्थ टाळावेत उदा. बटर, चीज, पेढे बर्फी, चॉकलेट. अल्कोहोल कमी कमी करत बंद केल्यास योग्य.

कारण मद्यपान करताना मद्याबरोबर थंड पाणी, बर्फ, तळलेले पदार्थ, धूम्रपान केले जाते. मग सर्दी , कफ आपले कायमचे साथी होतात. रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ, पेये यांना लांब ठेवावे.

म्हणजे खूप काळ टिकण्यासाठी Preservative असलेले पदार्थ, वेफर्स, कुरकुरे सारखे पदार्थ आणि पेये म्हणजे कोल्ड ड्रिंक्स ह्याचा शरीरावर नेहमी खाण्याने अथवा पेये पिण्याने घातकच परिणाम होतात आणि श्वसन बिघडू शकते.

म्हणून सारासार विचार करून चांगल्या अन्नाचे , पौष्टिक अन्नाचे सेवन करावे आणि श्वसन मार्गाच्या विकारांना दूर पळवावे. आपल्या जीवनसाथीला, नात्यातल्या मंडळींना चांगली आणि सुखाची झोप मिळू द्यावी असा विचार घोरणाऱ्यांनी तरी निश्चित करावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?