' त्यांना “या वयात” मिळाली, पण मला मिळत नाही हा द्वेष करणाऱ्यासाठी… – InMarathi

त्यांना “या वयात” मिळाली, पण मला मिळत नाही हा द्वेष करणाऱ्यासाठी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : सुजीत भोगले

===

या विषयावर मला काही गोष्टी मुद्देसूद सांगायच्या आहेत.

१. कलाकार हे गंधर्वासारखे असतात. त्यांच्या आयुष्यात एका पेक्षा अधिक स्त्री/ पुरुष येऊ शकतात. त्यांचा व्यवसायच तसा असतो. शिवाय ते कलाकार असल्याने अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या भानगडी सामान्य लोकांनी हाडका सारख्या चघळू नयेत…

हाडूक चघळायला बरे असते पण बेचव असते. हा प्रकार सुद्धा तसाच असतो.. तुम्हाला काही मिळणार नसते फुकट त्यांच्यावर तोंडसुख घेऊन काही हशील नाही.

कलाकार मंडळीना आपण अशा सामाजिक बंधनात बांधणे मला स्वतःला मान्य नाही.. हा त्यांच्यावर नाही त्यांच्या कलेवर सुद्धा अन्याय आहे.. अर्थात हे परिपक्व डोक्यांना नक्कीच समजेल.

२. त्यांना या वयात मिळाली, मला मिळत नाही हा द्वेष कमरेखालील विनोद करून व्यक्त करू नका. आज मिलिंद सोमण कोणत्याही २५ वर्षाच्या तरुणाच्या दुप्पट फीट आहे. ते सुद्धा त्याच्या पन्नाशीत.  त्यामुळे आज सुद्धा तो त्याच्या कोवळ्या बायकोला बेडवर ती तृप्त होईल इतके सुख देत असेल.

 

milind-soman-inmarathi
bollywoodshadis.com

म्हणुन तिची चिंता करण्यापेक्षा आपली बायको आपण सुखी आणि तृप्त ठेवतो आहोत का याची उठाठेव करा. या कॉमेंट करणाऱ्या मंडळींच्या पैकी निम्म्या लोकांची पाठ शनिवार रविवार काही न करता दुखते.. हे बोलायला लावू नका.

३. अनुप जलोटा तितका मजबूत नसला तरी त्याच्या प्रेयसी आणि पत्नीला तृप्त करू शकेल इतका सुदृढ आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न नक्कीच आहे. त्यामुळे त्याच्या मैत्रिणीची तुम्ही चिंता करू नका. ते सुखात आहेत. आणि त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आहे.

 

Anup_Jalota_girlfriend_Jaslee-inmarathi
amarujala.com

असे आनंदी आपल्या पत्नीला आपण कधी करू याचा विचार करा..

४. जे लोक अशी टीका करत आहेत त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.

Human race is polygamy by nature like any other species but monogamy by culture.

अर्थात एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणे हे नैसर्गिक आहे. पण सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण एकपत्नीत्वाचे बंधन पाळतो. पण ज्यांची क्षमता आहे, ज्यांचे तितके खरे प्रेम आहे आणि ज्यांच्यात ते व्यक्त करण्याचे धाडस आहे त्यांच्यावर गिधाडासारखे तुटून पडू नका..

परिपक्व होऊन त्या जीवांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगू द्या. तो त्यांचा अधिकार आहे आणि एक सुसंस्कृत समाज म्हणून आपले कर्तव्य.

 

priyanka-chopra-inmarathi
indiatimes.com

त्यांच्या अशा वागण्यावर फक्त त्यांचा वैवाहिक जोडीदार आक्षेप घेऊ शकतो आणि त्यांच्यातील तो कौटुंबिक विषय असेल. त्याची आत्ताची बायको हि अबला नारी आहे आणि तुम्ही तिच्या अधिकारांचे रक्षण करत आहात असला फुकटचा आव बिलकुल आणू नका…

ती सज्ञान आहे आणि तिच्या अधिकारांचे रक्षण करायला या देशात कायद्याचे राज्य आहे. ती तिचे अधिकार स्वतः लढुन मिळवेल. तिने तुमची मदत मागितली नाही. स्वतःचे क्रूर हेतू लपवून तिच्या हिताची चिंता तुम्ही करायची गरज नाही.

५. जे अशा विषयात संस्कृतीरक्षक भूमिकेत असतील त्यांनी आपण स्वतः संधी न मिळाल्याने आणि फट्टू असल्याने ( समाजाला आणि कुटुंबाला वेळ पडल्यास अंगावर घेण्याची ताकद नसल्याने ) एकपत्नीव्रत पालन करतो आहोत हे समजून असावे आणि गप बसावे…

६. ज्यांना आपण यावर टीका करून काही भारी करतो आहे असे वाटत असेल त्यांनी एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही नक्की कोणत्या तरी जन्मात ब्राह्मण असाल आणि मनुस्मृती मध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये, कर्माने नाही जन्माने जाती असाव्या अशी लुडबुड केलेली आहे.

त्याचेच घाणेरडे परिणाम आज आपण बघत आहोत आणि भोगत पण आहोत. त्या काळातील तुमची पापे आहेत की, आज मिलिंद सोमणच्या बाहुपाशात एक नवयौवना तुम्हाला पहावी लागते आहे. अनुप जलोटा ची फटाकडी मैत्रीण बघावी लागते आहे. त्यावेळी तसल्या उचापती केल्या नसत्या तर या जन्मात तुम्ही अनुप जलोटा किंवा मिलिंद सोमण असता.

त्यामुळे या जन्मात तरी जास्त आदळ आपट करू नका पुढच्या जन्मात कुत्रा होऊन गल्लीतील एकमेव कुत्रीला सगळ्यात दणकट कुत्रा घुसळेल आणि तुम्ही आशाळभूत पणे पाहात बसाल… पुढील जन्मी हे प्रारब्ध नको असेल तर या जन्मात तरी सुधारा…

माझी हि पोस्ट फार कमी लोकांना पटेल याची मला कल्पना आहे…

परंतु कधी कधी कारल्याचा रस सुद्धा विकायचा प्रयत्न करावा लागतो.. ज्यांना मधुमेह झाला आहे आणि बरे व्हायची इच्छा आहे ते विकत घेतात..

आपला समाज निकोप व्हावा असे ज्यांना वाटते त्यांनी ही पोस्ट आवर्जून शेअर करावी…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?