' किमती पाहूनच तुम्ही चाट पडाल अशा जगातल्या सर्वात महागड्या कुत्र्यांच्या ब्रीड्स!

किमती पाहूनच तुम्ही चाट पडाल अशा जगातल्या सर्वात महागड्या कुत्र्यांच्या ब्रीड्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

श्वान हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे असे म्हणतात. जगात बहुसंख्य लोकांना पाळीव प्राणी आवडतात. त्यातल्या त्यात श्वान आवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महागड्या प्रजातींपासून ते देशी प्रजातींपर्यंत अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे श्वान पाळतात.

जे लोक कुत्रा पाळतात ते तो आपल्या घरचा सदस्य असल्याप्रमाणेच त्याची काळजी घेतात. श्वान सुद्धा आपल्या मालकांवर जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. अनेक लोक तर आपल्या बाळाप्रमाणे आपल्या पाळीव श्वानांवर प्रेम करतात.

त्याला वेगळे पौष्टिक जेवण देतात, त्याला झोपण्यासाठी छान व्यवस्था ठेवतात, त्याच्यासाठी विविध प्रकारच्या ऍक्सेसरीज आणतात. अनेक लोकांना विदेशी प्रजातींचे श्वान आवडतात आणि ते विकत घेण्यासाठी हे लोक भरपूर पैसे मोजायलाही तयार असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज आपण २०१८ मधील श्वानांच्या जगातील सर्वात महागड्या प्रजातींबद्दल जाणून घेणार आहोत.

१. झेकोस्लोवाकियन वूल्फडॉग

झेकोस्लोवाकियन वूल्फडॉग किंवा Vlčiak ही इतर प्रजातींपेक्षा तुलनेने नवी प्रजाती आहे. ह्या प्रजातीचे ब्रीडिंग १९५५ साली झेकोस्लोवाकियामध्ये एक प्रयोग म्हणून केले गेले होते.

 

czechoslovakian-wolfdog-inmarathi

 

त्यांनी ४८ वर्किंग लाईन जर्मन शेफर्डसचे चार कार्पेथियन वूल्फ बरोबर ब्रीडिंग केले. त्यांना ह्या प्रयोगातून एक अशी प्रजाती हवी होती जिच्यात जर्मन शेफर्डचा स्वभाव असेल. पॅकची मानसिकता व प्रशिक्षण घेण्याची बुद्धी असेल. शिवाय कार्पेथियन वूल्फची शक्ती, शरीराची मजबूत रचना आणि स्टॅमिना हे गुण असतील.

ह्या प्रजातीचा उपयोग बॉर्डरवरील झेकोस्लोवाकियन सैनिकांबरोबर गस्त घालण्यासाठी केला गेला तसेच नंतर शोधपथकात सुद्धा ह्यांना स्थान मिळाले. ह्याशिवाय त्यांचा उपयोग बचावकार्यात, माग काढण्यासाठी, हर्डिंगसाठी व ड्राफ्टिंगसाठी करण्यात आला.

ह्या प्रजातीची किंमत दीड हजार डॉलर्स इतकी आहे.

२. सालुकी

सालुकी हा इजिप्तचा रॉयल श्वान आहे. ही प्रजाती प्राचीन काळापासून माणसाची सोबत करत आली आहे. प्राचीन काळी इजिप्तचा शासनकर्ता फॅरो कडे सुद्धा सालुकी श्वान होता. सालुकी ही प्रजाती फर्टाईल क्रीसेंट पासून तयार झाली आहे.

 

saluki-dog-inmarathi

 

सालुकी श्वान साईटहाउंड म्हणून ओळखले जातात. ह्या श्वानाची छाती खोल असते व पाय लांब असतात. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो.

परंतु हे आपल्या मालकांवर खूप प्रेम करतात, मालकांशी अतिशय हळुवारपणे वागतात. ह्या प्रजातीतील नराचे वजन ६० पौंड असते व लांबी २८ इंचांपर्यंत असते. ह्यांची किंमत अडीच हजार डॉलर्सपर्यंत असू शकते.

३. पेरुव्हीयन इंका ऑर्किड

 

peruvian-dog-inmarathi

 

पेरुव्हीयन हेअरलेस श्वानाच्या प्रजातीचा जन्म पेरुव्हीयन इंका प्रजातीपासून झाला आहे. ह्या श्वानांच्या अंगावर केस नसतात. म्हणूनच हे श्वान वेगळेच दिसतात. ह्यांचा रंग हत्तीसारखा ग्रे असतो. पेरुवियन हेअरलेस श्वानाची किंमत तीन हजार डॉलर्सपर्यंत असते.

४. ऍझावॅख

ऍझावॅखचे डोळे बदामासारखे असतात. हा श्वान बारीक असतो. ह्याची चाल एखाद्या मांजरीप्रमाणे असते व हा विविध रंगांत आढळतो. ही एक आफ्रिकन प्रजाती आहे. तरीही अमेरिका व कॅनडामध्ये विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे.

 

azawakh-dog-inmarathi

 

सर्वसाधारणपणे ह्या श्वानाचा रंग ब्राऊन किंवा वाळूसारखा असतो. ह्या प्रजातीला भरपूर शारीरिक हालचालीची गरज असते कारण हे श्वान जरा चंचल प्रवृत्तीचे असतात. म्हणूनच न कंटाळता जी व्यक्ती ह्या श्वानाची काळजी घेऊ शकते त्यानेच हा श्वान विकत घ्यावा.

ह्या श्वानाची किंमत कमीत कमी तीन हजार डॉलर्स आहे.

५. रॉटविलर

रॉटविलर ही पाळीव श्वानांची प्रजाती आहे. ह्यांचा आकार मध्यम ते मोठा असतो. ह्या श्वानांना जर्मनी मध्ये Rottweiler Metzgerhund म्हणत असत म्हणजेच रॉटविलच्या बचर्स म्हणजेच खाटीक लोकांचे श्वान.

 

rottweilers-dog-inmarathi

 

कारण ह्या श्वानांचे काम कोंबड्या किंवा बकऱ्यांवर लक्ष ठेवणे हे होते. तसेच हे श्वान मांसाच्या हातगाड्या सुद्धा खेचून नेत असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे श्वान हेच काम करत होते.

आता मांस वाहून नेण्याचे काम दुसऱ्या वाहनांनी होत असल्याने ह्या श्वानांचा उपयोग तपास करण्यासाठी तसेच बचावकार्यात होतो. तसेच दृष्टिहीन लोकांसाठी हे श्वान एका गाईडचे काम करतात. ह्या प्रजातीची किंमत चार हजार डॉलर्सपर्यंत आहे.

६. अकीता

अकीता ही प्रजाती जपानच्या डोंगराळ भागातील आहे. ह्या प्रजातीच्या दोन उपप्रजाती आहेत. एक म्हणजे जपानी प्रजाती जिला जपानी मध्ये अकीता केन किंवा अकीता इनू किंवा जपानी अकीता म्हणतात.श्वानाला जपानी भाषेत इनू म्हणतात.

 

japanese_vs_american-akita-inmarathi

 

ह्याच प्रजातीचा दुसरा प्रकार म्हणजे अमेरिकन अकीता होय. जपानी अकीता ह्या प्रजातीमध्ये जास्त रंग नसतात. परंतु अमेरिकन अकीता काळे, पांढरे, ब्राऊन अश्या श्वानांच्या सर्व रंगांत असतात.

अकीता श्वानांना सायबेरीयन हस्की प्रमाणेच अंगावर शॉर्ट डबल कोट असतो. काही श्वानांमध्ये जेनेटिक फरकामुळे लॉंग डबल कोट सुद्धा बघायला मिळतो. काही अकीता प्रजातींची किंमत साडेचार हजार डॉलर्स इतकी सुद्धा असते.

७. फॅरो हाउंड

फॅरो हाउंड हा माल्टा ह्या देशाचा राष्ट्रीय हाउंड आहे. ह्या श्वानाचे माल्टीज भाषेतले लोकल नाव Kelb tal-Fenek आहे. Kelb tal-Fenek म्हणजे रॅबिट डॉग होय. पारंपारिकरित्या बघायचे झाल्यास ह्या श्वानांचा उपयोग सशांची शिकार करण्यासाठी केला जातो.

 

Pharaoh-Hound-inmarathi

 

फॅरो हाउंड दिसायला अगदी रुबाबदार व रॉयल असतो. ह्याची बुद्धी तीक्ष्ण असते व ह्यांचे शरीर सशक्त व दणकट असते. ह्या प्रजातींपैकी काहींची किंमत साडेसहा हजार डॉलर्स आहे.

हे ही वाचा – परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, ‘ह्या’ देशी जातींची कुत्री दुर्मिळ होताहेत!

८. तिबेटीयन मॅस्टिफ

तिबेटीयन मॅस्टिफ ही तिबेटीयन श्वानांची प्रजाती आहे. ह्यांचे मूळ चीन, नेपाळ व तिबेट हा प्रदेश आहे. हिमाचल प्रदेशातील स्थानिक लोक आपल्या शेळ्या मेंढ्यांचे शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी ह्या श्वानांचा उपयोग करत असत.

 

Tibetan-Mastiff-inmarathi

 

तिबेटीयन मॅस्टिफ हा श्वान जगातील सर्वात मोठ्या व सर्वात जास्त प्रोटेक्टीव श्वानांपैकी एक आहे. हा ३३ इंच इतका उंच असू शकतो व ह्याचे वजन १६० पौंड इतके जास्त असू शकते. ह्या श्वानांची किंमत सात हजार डॉलर्स इतकी आहे.

९. सॅमोएड

सॅमोएड श्वानांना त्यांचे नाव सायबेरियातील सॅमोयेडीक लोकांकावरून मिळाले आहे. हे भटके लोक रेनडियर्स पाळतात. ह्यांनीच हा फ्लफी पांढरा श्वान ब्रीड केला.

 

Samoyed-Dog-inmarathi

 

रेनडियर्सचा कळप सांभाळण्यासाठी तसेच स्लेज ओढण्यासाठी त्यांना श्वानांची गरज होती. हे श्वान सतत अलर्ट असतात, ते ताकदवान तर असतातच परंतु खेळकर सुद्धा असतात. एका सॅमोएड श्वानाची किंमत आठ ते दहा हजार डॉलर्स इतकी आहे.

१०.लोचेन्स

लोचेन्स श्वानांना लिटील लायन्स असेही म्हणतात. हे श्वान आकाराने लहान असतात व ह्यांचे केस लांब असतात. मध्ययुगीन काळापासून ही प्रजाती नावारूपाला आली. अनेक मध्ययुगीन चित्रांमध्ये हा श्वान दिसून येतो.

 

Lowchen-dog-inmarathi

 

त्या काळात श्रीमंत लोकांकडे हे श्वान असायचे. आता मात्र हे श्वान फारसे आढळत नाहीत. एकोणिसाव्या शतकापर्यंत तर हे श्वान जवळजवळ नामशेष झाले आहेत. हे दुर्मिळ आहेत म्हणूनच ह्यांची किंमत दहा हजार डॉलर्स किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते.

असे हे जगातील सर्वात महागडे दहा श्वान आहेत. श्वानप्रेमी कितीही पैसा खर्च झाला तरी आपल्याला हवा तो श्वान घरी आणतातच. कारण श्वान हा खरंच माणसाचा खरा मित्र आहे ह्यात काही शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – मोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “किमती पाहूनच तुम्ही चाट पडाल अशा जगातल्या सर्वात महागड्या कुत्र्यांच्या ब्रीड्स!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?