'खलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या "जोकर"कडून या गोष्टी शिकल्याच पाहिजेत!

खलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या “जोकर”कडून या गोष्टी शिकल्याच पाहिजेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हॉलिवूडमध्ये अनेक चांगले कलाकार, दिग्दर्शक आहे मात्र क्रिस्तोफर नोलनने आपले वेगळेपण नेहमीच दाखवून दिले आहे, त्यांच्या अनेक मूवीज या अनेकांच्या डोक्यावरून जातात एवढ्या त्या गुंतागुंतीच्या असतात. एवढं मुळात सुचत कसं? हा मोठा प्रश्न आहेच, इंस्पेक्शन सारख्या चित्रपटाला उदाहरणार्थ घेऊयात. चित्रपट हा मुळात स्वप्नांवर आधारित आहे.

एकाच स्वप्नांत अनेक गोष्टी घडत असतात थोडसं जरी तुम्हाला कळलं नाही तर पुढचं काहीच लक्षात राहत नाही हीच नोलनची जादू आहे, त्याला कळतं प्रेक्षकांना कसं खिळवून ठेवायचं.

त्यातल्या त्यात अमेरिकेत असे चित्रपट खूप चालतात त्यामुळे कमाई पण चिक्कार होते.

नोलनच्या चित्रपटातील अनेक पात्र गाजली आहेत, मात्र जोकरची बातच और आहे. बॅटमॅन हा मुळात सुपरहिरो अनेक वर्षांपासून लोकांनी कॉमिकसमध्ये त्याला वाचलं आहे, चित्रपटात पाहिलं आहे, कार्टूनमध्ये पाहिलं आहे त्यामुळे काहीतरी वेगळं नोलनला दाखवणे भाग होते.

अनेक वर्ष यावर मेहनत केल्यावर त्यांनी २००३ मध्ये चित्रपट जाहीर केला, ३ भागात हा चित्रपट दाखवण्यात येणार होता. त्यामुळे प्रत्येक भागाचं वेगळेपण जपण्याचेही आव्हान त्यांच्या पुढे होते.

बॅटमॅन बेइंग्स २००५ साली आला होता, यात ब्रूस वेन बॅटमॅन कसा बनतो हे दाखवलं आहे. ‘द डार्क नाईट’ हा दुसरा भाग यात जोकर आणि बॅटमॅनमधील संघर्ष दाखवला आहे. ‘द डार्क नाइट रायसेस’ यामध्ये नैराश्यातून बॅटमॅन कसा बाहेर पडतो आणि गॉथमला वाचवतो हे दाखवलं आहे.

 

the-dark-knight-inmarathi

 

या तिन्ही भागांपैकी सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘द डार्क नाईट’ अर्थात यामध्ये जोकरचा खूप मोठा वाटा आहे.

अनेक जोकर भूतकाळात होऊन गेले अनेक भविष्यात पण होतील पण अभिनेता हीथ लेजरने जो जोकर साकारला आहे, तो नेहमीच सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे.

द डार्क नाईट अजून एका गोष्टीमुळे गाजला तो म्हणजे त्यांचे डायलॉग्ज. त्यात हेथ लेजरचा अभिनय, म्हणूनच या चित्रपटाला वेगळी उंची मिळू शकली.

जोकरची १० वाक्ये जे आपल्याला जगण्याचा दृष्टिकोन देतात.

 

१) If you are good at something, never do it for free : 

 

jocker-inmarathi

 

आज सर्वांनाच गोष्टी फुकटात लागतात; जसं फोटोग्राफर मित्राला बोलावून म्हणायचं आता आला आहेच तर ४ फोटो काढून जा कार्यक्रमाचे, लेखक मित्राला म्हणायचे एवढंच तर आहे लिहून दे की, आदि प्रकारच्या गोष्टी यात आल्या जोकरच्या मते हे करणं पाप आहे जर कुठल्या गोष्टीत तुम्ही चांगले असाल तर फुकटात करू नका.

सरळ अर्थ लावल्यास फुकटात काम केल्यास कामाची किंमत राहत नाही जे १०० टक्के बरोबर आहे.

 

२) Being prepared doesn’t necessarily mean having a plan :

 

jocker-inmarathi01

 

जोकरच्या मते अनेकदा प्लॅन वर्क होत नाही. कधी कधी होतात पण फळ वेगळं मिळतं यासर्व गोष्टींसाठी आपण तयार राहिलं पाहिजेच.

चित्रपटात अनेक ठिकाणी तो फसला पण परिस्तिथीनुसार बदलण्याची, विचार करण्याची शक्ती त्याच्याकडे होती त्यामुळे तो बॅटमॅनच्या तावडीतून सुटत राहिला.

सरळ अर्थ लावल्यास तयारी म्हणजेच प्रॅक्टिस. तुम्हाला कामात यश देऊ शकते. प्लॅन फेल होऊ शकतो मात्र तुमची तयारी नाही.

 

३) Know the Competition/Opposition inside-out :

 

jocker-inmarathi02

 

जोकर नेहमीच बॅटमॅनच्या पुढे होता. काय करायचं कसं करायचं सर्व तयारी त्यांनी केली होती सोबतच आपल्या ऍक्शनवर बॅटमॅन कसा वागेल एवढासुद्धा त्यांचा अभ्यास होता.

मुळात काय तर त्यांनी बॅटमॅनला पुरतं ओळखलं होत.

सरळ अर्थ लावल्यास अस कोणतंच क्षेत्र नाही की ज्यात तुम्हाला स्पर्धा नसेल त्यामुळे पुढे राहायचं असेल तर पुढच्यांचा अभ्यास करा त्याला जाणुन घ्या गोष्टी नक्कीच सोप्या होतील.

 

४) Never rub another man’s rhubarb :

 

jocker-inmarathi03

 

सरळ अर्थ असा की अशा स्त्रीच्या प्रेमात पडू नये जी अगोदरच दुसऱ्याच्या प्रेमात आहे, सरळ सरळ हे तुम्हाला दुःख आणि त्रासापेक्षा अजून काहीच देऊ शकणार नाहीच.

 

५) Women love aloof and indifferent men :

 

jocker-inmarathi04

 

अर्थ हाच की मानवी प्रवृत्तीप्रमाणे जो व्यक्ती आपल्या मागे नसतो तोच आपल्याला आवडतो. जसे काही पुरुष त्याच्या शांत स्वभावामुळे वेगळे ठरतात महिलांना हेच वेगळेपण आवडतं आणि त्या त्यांच्या प्रेमात पडतात.

प्रवाहाविरुद्ध असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात असं इथे जोकरला म्हणायचं आहे.

 

६) People are only as good as society allows them to be :

 

jocker-inmarathi05

 

सर्वांमध्येच कुठेतरी डार्क साईड लपलेली असते, आपण परिस्तिथीप्रमाणे किती चांगलं वागायचं हे ठरवतो जसे खूप श्रीमंत घरी आपण गेलो तर खूप अदबीने वागू तेच गल्लीच्या कोपऱ्यावर आपण बसलो तर अदबशीरपणा त्यात नक्कीच नसेल.

सरळ अर्थ लावायचा झाल्यास, परिस्तिथीनुसार माणूस बदलत जातो, प्रत्येक ठिकाणी तो सारखा नसतो तसेच वयानुसार सुद्धा तो बदलत राहतो.

 

७) Money can’t buy happiness :

 

jocker-inmarathi06

 

तुम्ही BMW मध्ये बसून सुद्धा दुःखी असू शकता किंवा झोपडीत सुद्धा खुश राहू शकता त्यामुळे नेहमीच पैसे महत्वाचे नसतात.

चित्रपटात याचा प्रत्यय येतो जेव्हा जोकर करोडो डॉलर जाळून टाकतो, त्याच्यासाठी बॅटमॅनला हरवणं महत्वाचं होतं, पैसे मिळवणं नाही. जिकंण्याची ती भावना त्याला हवी होती.

 

८) Awareness is the most precious kind of freedom :

 

jocker-inmarathi07

 

तुम्ही जीवनात काय करत आहात आणि याचे काय पडसाद असतील हे माहित असणं आणि तरीसुद्धा आयुष्य मनसोक्त जगणं हे या वाक्याच उदाहरणं ठरू शकेल.

तुम्हाला माहिती आहे पुढची परिस्तिथी कशी असणार आहे तरी सुद्धा तुम्ही ती सामोरे जायला तयार असाल तर यातच तुमचं खरं स्वातंत्र्य आहे. सरळ अर्थ असाच की तुम्ही मानसिकरित्या सर्व गोष्टीसाठी तयार असायला हवे.

 

९) When the chips are down, these civilized people, They eat each other :

 

jocker-inmarathi09

 

कोणावरच विश्वास ठेऊ नका तो/ती कितीपण जवळचे असले तरी- असा या वाक्याचा अर्थ होतो. कोण, कसं, कधी तुमच्या सोबत वागू शकेल तुम्हाला कळणार पण नाही.

 

१०) Never Stop having fun :

 

jocker-inmarathi00

 

“व्हाय सो सिरीयस” ही जोकरची टॅगलाईन होती, बॅटमॅनच्या हातून मार खातांना सुद्धा तो खुश होता. त्याला प्रत्येक गोष्टीत आनंद वाटायचा. मुळात तो त्याला आनंद वाटेल असंच काम करायचा. पैसे जाळून त्यांनी सिद्ध केलं की त्याला पैश्याचा लोभ नाही, फक्त आनंद म्हणून तो सर्व करायचा.

सरळ अर्थ सांगायचा झाल्यास आनंदी राहा सिरीयस राहण्यातच आयुष्य निघून जाईल कळणार सुद्धा नाही.

ही सर्वच जोकरची वाक्यं आपल्या आयुष्यात कामी येण्यासारखी आहेत.

निगेटिव्ह रोलमध्ये असूनसुद्धा जोकर जगायला शिकवून जातो. वाईट फक्त यांचं गोष्टीचं वाटत की जोकरचं यश बघायला अभिनेता हीथ लेजर जिवंत राहू शकला नाही.

गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. अवघ्या २८ वर्षाचा होता तो. चित्रपट हिट झालाच सोबतच त्याला अकॅडमी अवॉर्ड सुद्धा मिळालं.

असं म्हंटलं जातं की जोकर या पात्रात तो एवढा बुडून गेला होता की त्याला बाहेरच येता येत नव्हतं आणि शेवटी त्याच पात्रामुळे त्यांचा अंत झाला. अभिनेता हेथ लेजरच्या आकस्मित जाण्याने नक्कीच आपण एक चांगला अभिनेता गमावला आहे मात्र त्यांनी साकारलेला जोकर नेहमीच आपल्या सोबत असेल आयुष्याचे धडे शिकवायला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “खलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या “जोकर”कडून या गोष्टी शिकल्याच पाहिजेत!

 • September 19, 2018 at 10:54 pm
  Permalink

  all in

  Reply
 • September 20, 2018 at 3:34 am
  Permalink

  excellent blog

  Reply
 • August 30, 2019 at 9:51 pm
  Permalink

  It’s so nice article everyone read it to improve knowledge.

  Reply
 • October 18, 2019 at 8:08 pm
  Permalink

  It’s reality, very nice article which teach us so many things

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?