' मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बलोपासना हा निरोगी आयुष्याचा मंत्र आहे. प्रमाणात खा, खूप व्यायाम करा आणि स्वस्थ राहा. आपल्या शरीराला होणाऱ्या व्याधींचे मूळ म्हणजे शरीराला काहीच हालचाल न असणे ह्या मध्ये आहे.

हल्ली माणसे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ह्या असह्य रोगांसाठी सकाळ संध्याकाळ गोळ्या खाताना दिसतात.

पण काही व्यायाम प्रकार रोजच्या आयुष्यात नियमित केले तर ह्या सगळ्यांपासून मुक्तता नक्कीच मिळेल.

काही नियमित व्यायाम प्रकार आपल्याला डायबेटीज सारख्या रोगातून पूर्णपणे बाहेर काढू शकतात. त्या व्यायाम प्रकाराला कार्डिओ वॅस्क्युलर एक्सरसाईझ म्हणतात.

कार्डिओ चे व्यायाम आपल्याला फिट तर बनवतातच पण मधुमेह कमी करून नियंत्रित करण्यासही मदत करतात. म्हणजेच शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

 

cardio-inmarathi

 

ह्या व्यायाम प्रकाराला एरोबिक्स व्यायाम म्हणून देखील ओळखले जाते. एरोबिक्स मुळे मधुमेहींना फारच लवकर गुण येऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज चे बर्निंग हा मधुमेहवरचा रामबाण उपाय आहे.

आपला श्वासोच्छवास आणि हृदयाची गती वाढवणारा व्यायाम केल्यास आपल्या कॅलरी लवकर जाळून जाण्यास मदत होते.

आशा व्यायाम प्रकारांमुळे फुफ्फुसांमध्ये अधिक ऑक्सिजन प्रवेश करतो परिणामी हृदयाची हालव्हाळ जलद होते. ह्या मुळे हृदय शरीरातील इतर भागाकडे (जसे की स्नायू, मूत्रपिंडे, यकृत आणि इतर अवयव) भरपूर रक्त पुरवठा करते आणि भरपूर ऊर्जा निर्माण होते.

ह्यामुळे वजन तर कमी होतेच पण रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित होते.

हे ही वाचा मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेहींनी खालील पैकी काही व्यायाम नियमित केल्यास त्यांची ह्या असाध्य रोगातून नक्कीच मुक्तता होऊ शकते..

१. चालणे:

चालणे हा सगळ्यात सोपा कार्डिओ पद्धतीचा व्यायाम आहे. दिवसातून किमान ३० ते ४० मिनटं चालणे हे मधुमेहाशी लढण्यास मदत करतात.

काही अभ्यासातून असे आढळून आले आहे की जेवणानंतर १० मिनिटे चालले तर रक्तातील शर्करेचे प्रमाण २२% नि कमी होते.

तसेच ३३% शर्करेचे प्रमाण हे जलद गती चालण्याने कमी होऊ शकते.

 

walking-elderly-inmarathi

 

चालण्यास सुरुवात करताना चांगले वॉकिंग शूज निवडा. सुरुवातीला गती कमी असली तरी चालेल. हळू हळू सवयीने ती वाढवता येईल.

नंतर चालण्याची गती आणि कालावधी दोन्ही मध्ये वाढ करणे योग्य. वॉकिंग ट्रॅक किंवा वॉकिंग गार्डन मध्ये जाऊन चालण्याचा व्यायाम केल्यास बरे वाटेल आणि कंटाळाही येणार नाही.

२. पळणे:

चालणे काही महिने केल्यास आपला स्टॅमिना वाढला असेल तर ह्याच्या नंतर ची पायरी म्हणजेच पळण्याचा व्यायाम आपण सुरू करू शकतो.

ह्यात हृदयाची गती खूपच जलद होऊन शरीराला जास्त ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा होऊ लागतो आणि शरीरातील साखरेचे प्रमाण घटू लागते.

 

indian girl running inmarathu

 

चालण्याच्या व्यायामप्रमाणेच पळण्यासाठी सुद्धा चांगले फुटवेअर असणे गरजेचे आहे.

जिथे चालण्यास जातो तिथेच पळण्यास जाऊ शकतो. शक्यतो कमी गर्दीच्या ठिकाणी. सुरुवातीला वेग कमी ठेवावा. थकवा वाटल्यास मध्ये आरामही करावा. आठवड्यातून ३ दिवस पळण्यासाठी ठेवावेत.

३. सायकल स्वारी:

सायकल चालवणे हा देखील एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. ३० ते ४० मिनिटे सायकलिंग केल्यास परिणामी मधुमेहाचे प्रमाण लवकर कमी होण्यास मदत होते.

 

cycling-inmarathi

 

बाहेर जाऊन सायकल चालवायची नसल्यास इनडोअर सायकलिंग हा सुद्धा एक पर्याय आहे. सुरुवातीला वेग कमी असेल तरी चालते. हळू हळू वेग आणि कालावधी वाढवावा.

४. योगासने:

भारतीयांनी जगाला दिलेला व्यायामप्रकार म्हणजे योगासने. मधुमेहवर योगासनांचा चांगला परिणाम होतो. योगासने वजन, रक्तशर्करा, रक्त दाब आणि मानसिक तणाव सगळेच कमी करण्यास मदत करतात..

 

jaqueline-yoga-inmarathi

 

प्राणायाम मधुमेह बरोबर आणखीन शारीरिक व्याधी ही कमी करतो. योग शिक्षकाकडून योग्य तऱ्हेने योग शिकून घेणे उत्तम ठरते.

५. नृत्य:

नृत्य हे कायमच व्यायामाचा चांगला प्रकार म्हणून ओळखले गेले आहे. पण सध्या कार्डिओ व्यायामासाठी आणखी नवीन नृत्यप्रकार समोर आले आहेत. त्यात झुंबा, हिप हॉप, टर्बो जॅम असे अनेक चॉईस आपल्यासमोर आहेत.

लठ्ठपणामुळे मधुमेह होतोच त्यामुळे हे नृत्य प्रकार लठ्ठपणा घळवण्यास मदत करतात.

 

abcd-any-body-can-dance_inmarathi

 

तसेच अलजायमर सारखे रोगही बरे होण्यास मदत होते. हा कार्डिओ डान्स नियमित केल्यास मधुमेहापासून सुटकारा लवकरच मिळेल. ह्यातून जोरदार व्यायाम तर होतोच आणि मनाला आनंद ही मिळतो.

६. जलतरण:

पोहणे हे आव्हानात्मक तर आहेच पण अत्यंत रिफ्रेशिंग असा व्यायाम प्रकार आहे.

पोहण्याची शरीरातील प्रत्येक स्नायूंची हालचाल होते. शरीरातील मेद आणि कॅलरीज लवकर जसळून जाण्यास मदत होते. परिणामी रक्तशर्कराही नियंत्रित होते.

 

keep-heart-healthy-marathipizza01

 

मधुमेह्यांनी ह्या प्रकाराला जरूर करून पाहावे आणि नियमितता ठेवावी. पोहण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स शिकून घ्याव्यात आणि मधुमेहाला पळवून लावण्यास ह्याची मदत घ्यावी.

७. पायऱ्या चढणे:

शक्यतो लिफ्ट टाळून पायऱ्या चढण्याचा सराव करावा. किंबहुना रोज १०० पायऱ्या उतरून पुन्हा चढाव्यात. पायऱ्या चढण्यामुळे स्नायूंना पूर्ण व्यायाम मिळतो. हृदयाची गती वाढते आणि ते मजबूत होते.

 

step-climbing-inmarathi

 

शरीरास ऑक्सिजन युक्त रक्तपुरवठा झाल्याने परिणामी मधुमेहाला घालवण्यास मदत होते.

८. दोरीवरच्या उड्या:

लहानपणी ५०० ची किंवा १००० कावड लावून आपण किती दोरीवरच्या उड्या मजेत मारायचो. पण आता व्यायाम करायचा म्हणून ते अशक्य वाटू लागतं.

 

jump-rope-inmarathi

 

पण दोरीच्या उड्या हा देखील एक कार्डिओ व्यायाम प्रकार आहे आणि तो आपल्याला मधुमेहापासून लांब ठेवण्यास मदत करतो. ह्यातही हृदय गती वाढून ते सशक्त बनते. वजनही कमी होते.

ह्या व्यायामाची सुरुवात करताना कमी दोरीच्या उड्या माराव्यात आणि नंतर कालांतराने १००० किंवा त्याहून जास्ती उड्या मारल्यास कॅलरीज लवकर जळू लागतील.

ह्या सहज सोप्या व्यायामांबरोबर आणखीही काही व्यायाम आहेत. जसे स्केटिंग, बोट वल्हवणे, जॉगिंग, ट्रेकिंग शक्य असल्यास हेही करू शकतो. फक्त व्यायाम करताना ते कंटाळवाणे होऊ नयेत ह्याची खबरदारी घ्या.

नियमितपणे व्यायाम केल्यास सुदृढ शरीर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.

हे सगळे व्यायाम प्रकार करा आणि रक्तातील अतिरिक्त साखर नाहीशी करा.. जिभेवर गोडवा असू द्या.. रक्तात नको..!

===

हे ही वाचा ही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

 • September 21, 2018 at 11:42 am
  Permalink

  ग्रेट

  Reply
 • March 23, 2019 at 9:48 pm
  Permalink

  खुपच

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?