'होय! सर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं असतात. कारणं...

होय! सर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं असतात. कारणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सर्दी झालीये? घसा खवखवतोय? खोकला ही झालाय? हो बाबा हो.. मग घ्या कुठल्यातरी कंपनीचे सिरप.. अशा आशयाची जाहिरात आपण सतत टीव्ही वर बघतो. सर्दी खोकला पडश्याने वैतागलेले पेशंट लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून फार्मा कंपन्या रोज नवीन औषधं बाजारात उपलब्ध करून देत असतात.

कोणाच्या टॅबलेट्स तर कोणाचे सिरप.. आणि सगळ्यांचा दावा एकंच. हे औषध प्या आणि सर्दीतून आराम मिळवा.

सर्दी खोकला होण्याची अनेक कारणं आहेत. पावसात भिजणे, डोकं किंवा केस ओले राहणे, दुसऱ्यामुळे आपल्याला सर्दी होणे किंवा कशाच्या ऍलर्जी मुळे सुद्धा सर्दी खोकला होतो.

प्रत्येक प्रकारच्या सर्दी खोकल्याला औषधे ही वेगवेगळी असतात. सर्दी होताना आधी घसा खवखवतो. मग शिंका येतात. नंतर नाकच गळायला लागते आणि धरते सर्दी. त्या कफाचं घट्ट कफात रूपांतर झाले की होतो खोकला..

 

sneeze-inmarathi
allindiaroundup.com

६-७ दिवस तरी सर्दीमुळे माणूस बेजार होतोच. त्यातून खोकला झाला तर तो ही दोन तीन दिवसात बरा होत नाही. कधी कधी तर वाढतच जातो आणि खोकून खोकून आतडी पिळवटून निघतात.. छातीत घर घर होत राहते किंवा डोकं ठणकतं.

घरगुती उपाय करून बरे वाटल्यास उत्तम. पण सर्दी खोकला वाढतच गेल्यास डॉक्टरांकडे जाण्या पलीकडे काही पर्यायच उरत नाही.

डॉक्टर कडे जाऊन प्रत्येक पेशंट डॉक्टरला स्ट्रॉंग औषध द्यायला सांगतोच. करण खूप दिवस त्या सर्दी खोकल्याचे बेजार झाल्याने कधी एकदा बरे होतो असे सगळ्यांना झालेले असते. आणि मग डॉक्टर काही शेड्युल एच ड्रग्स लिहून देतात. जे जेवल्या नंतरच घ्यायचे असतात.

सहसा ही औषधे घेतल्यावर पेशंटला मस्त झोप लागते.

रात्रीची घेतल्यास ठीक पण दिवसा ही औषधे सुद्धा बेजारच करतात. कारण शाळा, कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी असल्यास भयंकर झोप येत राहते. औषधामुळे गुंगी येते अन दिवस भर माणूस पेंगत राहतो..!

ह्या सर्दी खोकल्याच्या औषधांमध्ये हमखास गुंगी येणारे घटक मिसळलेले असतात. ही गुंगी आणणारी द्रव्ये काही विशिष्ट करणांसाठी औषधात घालावी लागतात.

 

medicine-inmarathi
stylecraze.com

सिरप पिऊन झोप येणे, गुंगी येणे हा जरी त्या औषधांचा साईड इफेक्ट असला तरी तो पेशंट च्या फायद्याच्याच आहे. आता साईड इफेक्ट म्हणलं की सगळ्यांना भीतीच वाटते, मग हा गुंग करणारा साईड इफेक्ट चांगला कसा..?

तर सर्दी मध्ये नाक चोंदल्याने असो किंवा नाक गळत राहिल्याने असो आपल्याला झोप काही लागत नाही. खोकल्याच्या वेळीही असेच हाल होतात.

कधीकधी खोकल्याची ढास लागली तर काही खैर नाही. रात्री अपरात्री खोकताना आपण कित्येक जणांना पाहिले आहे.

झोप तर होतंच नाही आणि माणूस पार दमून जातो. बरं सर्दी खोकल्याने कोणी एखाद्या तापाने फणफणलेल्या व्यक्ती सारखा आजारी ही वाटत/दिसत नाही. त्यामुळे कामाला, शाळा कॉलेज ला सुट्टी टाकून किंवा घरकामाला दांडी मारून फारसं कोणी निवांत पडून आरामही करत नाही.

ह्या सगळ्यामुळे खरं तर आपल्या शरीराला खूपच थकवा येतो. जाणवलं नाही तरी शरीर दमतं. घसा दुखतो. दात आणि हिरड्या दुखतात. अंग आतून ठणकते. मणका, मान, डोकं अगदी पावला पर्यंत अंग दुखते. कान दुखतात. कानाच्या आणि डोक्याच्या शिरा सुजून दुखतात.

शिंकून आणि खोकून आतून सगळे अवयव थकतात आणि ठणकतात.. डोळे पार निस्तेज होतात. आणि अशातच शरीराला आराम हवा असतो. खोकल्याने रक्तदाब आणि हार्मोन्स वर देखील परिणाम होत असतो.

किती सहन करणार शरीर? आणि त्यातून आपण रोजची कामही करत राहिलो तर अजूनच त्राण निघून जाते शरिरातून. अशा दमलेल्या शरीराला सक्तीची विश्रांती फक्त ही गुंगी आणणारी औषधेच देऊ शकतात.

 

sleepiness-inmarathi
HuffPost.com

औषधांचे २ – ३ डोस पोटात गेले की पुरेपूर विश्रांती होते. कारण प्रत्येक डोस घेतला की झोपावं लागतं आणि ही क्विक नॅप आपल्याला रिफ्रेश करते. गुंगी आल्याने आपण इतर मेहनतीची किंवा अभ्यासाची कामं करूच शकत नाही.

सिरपचा किंवा टॅब्लेट्स चा डोस मोठा असेल तर मग ब्रह्मानंदी टाळीच लागते..!

सर्दी खोकला लवकर बरा व्हावा आणि शारीरिक थकवा दूर व्हावा असे दुहेरी काम हे गुंगी आणणारे औषध करत असते.

कुठलाही आजार असो विश्रांती खूपच गरजेची असते आणि सर्दी पडश्यासारख्या आजारात आपण त्या कडे खरं तर दुर्लक्ष करतो. अंगावर काढतो आणि मग त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात.

त्यापेक्षा योग्य औषध आणि भरपूर विश्रांती घेतली तर ह्या हैराण करणाऱ्या खोकला सर्दी पासून आपण पट्कन मुक्त होऊ शकतो.

सर्दी विषयक काही औषधे आपल्याला विना डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा चिट्ठीने मिळू शकतात. पण त्याने बरे न वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे सोयिस्कर असते.

 

medicines-inmarathi08
nia.nih.gov

औषधाचा डोस ही वेळच्या वेळी घ्यावा आणि योग्य त्या प्रमाणात. नाहीतर गुंगी येणारी औषधे इतर दुष्परिणाम सुद्धा सोबत घेऊन येतात. पण ह्या सर्दी खोकल्याच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडून ‘चैन की सास’ मिळवायला ह्या औषधांशिवाय पर्याय ही नाही..!

घ्या विश्रांती आणि व्हा लवकर बरे..

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?