' कवटीतून पाणी पिणाऱ्या 'ह्या' रहस्यमयी पंथातल्या साधूंचं धक्कादायक वास्तव!

कवटीतून पाणी पिणाऱ्या ‘ह्या’ रहस्यमयी पंथातल्या साधूंचं धक्कादायक वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साधू आणि संन्यासी यांच्या आयुष्यबद्दल आपल्या मनात वेगळीच उत्सुकता असते. ते कसे आयुष्य जगतात याबद्दल अनेकदा आपल्या मनात विचार येत असतात.

खासकरून अघोरी साधू, नागा साधू यांच्या बद्दल, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक समारंभाच्या वेळी हे साधू आपलं दर्शन घडवत असतात.

तेव्हा त्यांचे आश्चर्यकारक तप आणि वेगवेगळ्या क्रिया बघून आपण हैराण होऊन जात असतो.

अशीच एक साधूंची जमात आहे जी नागा साधू व अघोरी साधूंपेक्षा भयंकर व रहस्यमय आहे. ते साधू “कापालिक” साधू म्हणून ओळखले जातात.

कापालिक साधूंची विशेषता अशी आहे की ते लोकांच्या कवटीचा वापर डिश आणि पत्रावळी सारखा करतात. ते कवटीत अन्न टाकून त्याचं सेवन करतात.

तसेच ते त्या कवटीत पाणी देखील पितात. अशा ह्या अत्यंत भयावह समाजाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 

sadhu-inmarathi

शास्त्रानुसार कपालिक साधू हे शैव पंथीय असतात, अर्थात ते भगवान शंकराची भक्ती व आराधना करत असतात.

ते माणसाच्या कवटीचा जिला कपाल देखील म्हटले जाते, तिचा वापर खाण्या – पिण्यासाठी करतात, त्यामुळे त्यांना कपालिक साधू म्हटले जाते.

कपालिक साधूंचा इतिहास

प्राचीन काळी कपालिक साधनेला खूप महत्व होतं. अनेक साधक या साधनेला वैभवशाली मानत. तशा समजातून ते कपालिक साधू बनले. त्यांनी कपालिक साधू बनून भोग विलासी आयुष्य जगायला सुरुवात केली.

भोग आणि कामपिपासा शांत करण्याऱ्या लोकांचा समूह अशी चुकीची प्रतिमा कपालिक साधूंविषयी समाजात रुजली गेली. समाज त्यांचा तिरस्कार करू लागला.

===

हे ही वाचा …तरुण इंजिनिअर्सना वैराग्याची ओढ! हे पहा धक्कादायक वास्तव!

===

यामुळे जे खऱ्या अर्थाने कपालिक साधू होते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक साधनेला प्रारंभ केला.

आदि शंकराचार्यांनी कपालिक साधूंच्या या अनैतिक आचरणाला विरोध केला. ज्यामुळे कपालिक संप्रदायाचे लोक नेपाळच्या सीमावर्ती भागात स्थलांतरित झाले अथवा तिबेटला निघून गेले.

 

kapalik-inmarathi

कपालिक साधूंवर तुलसीदासांनी रामचरितमानस मध्ये देखील टीका केली आहे.

त्यांनी त्यांच्या कौल व्यवहारावर टीका केली आहे. कौल मार्ग म्हणजे वाममार्ग जो नकारात्मक असतो, नियम परंपरा यांच्या विरोधी असतो. कौल मार्गी व्यवहार करणारा व्यक्ती दूषित असतो.

त्याचा संपर्कात आल्यावर व्यक्ती मृत्यू पावते असं देखील म्हटलं आहे. बहुतेक यामुळे कौल मार्गी कपालिक साधू भारतातून स्थलांतरित झाले.

कपालिक साधूंची साधना

इतिहासकारांच्या मतानुसार कपालिक पंथापासून शैव शाक्त कौल मार्गाची सुरुवात झाली. या संप्रदायाच्या साधना अत्यंत महत्वपूर्ण व रंजक असतात. कपालिक चक्रात मुख्य साधकाला भैरव तसेच साधिकेला त्रिपुर सुंदरी म्हटले जाते.

असं म्हटलं जातं की यांच्या सततच्या पूजा पाठामुळे त्यांच्यात असीम शक्तीचा संचार होत असतो. शारिरीक अवयवांच्या नियंत्रणापासून विनाश करण्यापर्यंतची असामान्य ताकद त्यांचात असते.

या मार्गात कपालिक साधू एखाद्या भैरवी साधिकेशी विवाह करू शकतो, तिला पत्नी म्हणून स्वीकारू शकतो.

 

kapalik-weds-inmarathi

 

कपालिक साधूंचे मठ हे अत्यंत जीर्ण अवस्थेत उत्तर पूर्वी राज्यात आज देखील बघायला मिळतात. यामुन मुनींनी आगम प्रामाण्य मांडून त्यात शिवपूराण तसेच इतर अगम्य संप्रदायातील भेद दाखवले आले आहेत.

वाचस्पती मिश्र यांच्या चार माहेश्वरी संप्रदाय यांच्याबद्दल आपण ऐकून आहोत.

श्रीहर्षने नैषधात समसिद्धांत म्हणून ज्यांचा उल्लेख केला आहे ते कपालिक साधूच आहेत असं म्हणतात.

===

हे ही वाचा मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” अचंबित करणारा इतिहास…

===

कपालिक साधूंचं पशु भक्षण

कपालिक साधू हे सर्व पक्षी – प्राणी यांना मारून खातात. गाय वगळता कुठल्याही जनावरांच मास ते खातात. कपालिक साधू शिकार देखील करत असतात. त्यांचा भोजनाला मर्यादा नसते.

 

कपालिक साधूंचा इष्टदेव

कपालिक प्रामुख्याने शैव पंथीय असल्याने भगवान शिव, महाकाली, भैरव, चांडाळी- चामुंडा, त्रिपुर सुंदरी सारख्या देवी देवतांच्या पूजा अर्चना करतात.

अस म्हटलं जातं की पूर्वी मंत्रविद्येत पारंगत असलेपे कपालिक साधू त्यांचा मंत्रोच्चाराने भोग विलासी वृत्तीवर ताबा मिळवायचे.

ते काम शक्तीचा उद्वेग तसेच न्यूनता कंट्रोल करायचे. यामुळे योग्य मापदंडात साधना पूर्ण व्हायची असं म्हटलं जातं.

आज हा मार्ग विलुप्त झाला नसून गुप्त प्रकारे हे सर्व केलं जातं असं देखील म्हणतात. आजही अनेक कपालिक साधू त्यांचा मठात या तंत्र साधना करत असतात.

अश्याप्रकारे कपालीक साधू मधील एक अत्यंत रहस्यमय पंथ आहे. ज्याचा बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

 

kapalik sadhu inmarathi

ही आत्मिक साधना आहे आणि मोक्ष मिळण्यासाठी ती करावी लागते असं या गोष्टींच्या समर्थकांचे म्हणणे असते. पण आत्मिक साधनेचा तुकोबा यापेक्षा जास्त सोपा आणि उपयुक्त मार्ग सागतात तो म्हणजे,

प्रपंच करावा नेटका!

मोक्ष मिळवण्यासाठी घरदार सोडून संन्यासी होणे म्हणजे लौकिक आणि प्रापंचिक आयुष्यापासून पळ काढणे. तो काढायचा म्हणूनही अनेक लोक कापालिक साधूंसारख्या अघोरी गोष्टींच्या मार्गाने जातात.

पण हा मार्ग म्हणजे अंधविश्वास, अमानवीय कृती यांनी भरलेला असतो. या मार्गाने मोक्ष कसा मिळणार ते त्या कवटीतुन पाणी पिणाऱ्या साधुलाच ठाऊक!

===

हे ही वाचा हिमालयात गेलेल्यांना तिथले महात्मे कधीच का दिसत नाहीत? वाचा, ऐका साधूचंच उत्तर

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “कवटीतून पाणी पिणाऱ्या ‘ह्या’ रहस्यमयी पंथातल्या साधूंचं धक्कादायक वास्तव!

 • September 17, 2018 at 9:41 pm
  Permalink

  ok

  Reply
 • October 7, 2018 at 11:41 am
  Permalink

  okay

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?