' फाटक्या नोटांचं करायचं काय? : अशा नोटा वापरात आणण्याचे हे आहेत कायदेशीर मार्ग

फाटक्या नोटांचं करायचं काय? : अशा नोटा वापरात आणण्याचे हे आहेत कायदेशीर मार्ग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बाजारात भाजी घेताना किंवा एखाद्यावेळी घाईघाईत टॅक्सी चालकाला पैसे दिल्यानंतर ते आपल्याला उर्वरित पैसे परत देतात, आणि ते पैसे न बघता आपण ठेवून घेतो.

त्यानंतर जेव्हा दुसऱ्या ठिकाणी आपण ते पैसे खर्च करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की, आपण जे पैसे न बघता ठेवले त्यातील एक नोट फाटलेली आहे.

मग आपण पश्चाताप करत बसतो की, आता ह्या फाटलेल्या नोटेचं काय करायचं? कारण ही फाटलेली नोट आपण कुठे खर्च करू शकत नाही, कुणाला देऊही शकत नाही. पण अश्या फाटलेल्या नोटा आपण आपल्या बँकेत जाऊन बदलुन घेऊ शकतो.

पण त्यासाठी ह्या नोटांवर त्या नोटेला जारी करणारी संस्था, गॅरंटी, प्रॉमिस क्लॉज, गव्हर्नरची सही, अशोक स्तंभ किंवा महात्मा गांधींचा फोटो व वॉटर मार्क असणे आवश्यक आहे.

अश्या नोटा आरबीआयच्या नियमांनुसार बदलुन घेतल्या जाऊ शकतात.

अनेक ठिकाणी काही दुकानांत अशा फाटलेल्या  आणि जुन्या नोटा बदलून दिल्या जातात. पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटांची एक गड्डी बदलण्याच्या मोबदल्यात १०० ते २०० रुपये द्यावे लागतात.

नोट बदलण्याचा हा मार्ग चुकीचा आहे, सरकार मान्य नाहीये.

ह्याच परिस्थितीला लक्षात घेत सरकारने सार्वजनिक बँकेत अशी फाटलेली नोट बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली आहे.

 

Mutilated note-inmarathi

 

खराब झालेली किंवा फाटलेली नोट जीच्या दोन्ही बाजूंनी सर्व नंबर असतील अशी नोट सार्वजनिक बँकेच्या काउंटरवर, काही खासगी करन्सी चेस्ट काउंटरवर तसेच आरबीआयच्या रिजनल ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म न भरता बदलून मिळु शकतात.

आरबीआय ने “भारतीय रिझर्व्ह बँक नियमावली, २००९” जारी करून भारतीय नागरिकांना त्यांच्या जवळील जुन्या-फाटलेल्या नोटांना बदलण्याची तरतूद केली आहे.

आरबीआयने आपल्या ह्या तरतुदीत असे लिहिले आहे की,

“फाटलेल्या-खराब नोटा म्हणजे अशा नोटा ज्यांचा एक भाग नसेल किंवा ती दोन पेक्षा जास्त तुकड्यांनी जोडून बनविली गेली असेल.”

आरबीआयने नोट वापसी नियमावली २००९ नुसार जर कुठीलीही एक रुपयाची, दोन रुपयाची, पाच रुपयाची, दहा रुपयाची आणि वीस रुपयाची नोट ही ५० टक्क्यापेक्षा कमी फाटलेली असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत मिळतील.

बँक तुम्हाला त्याचा पूर्ण मोबदला देईल.

पण जर ह्या नोटा ५० टक्क्यापेक्षा अधिक खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर बँक तुम्हाला त्याच्या मोबदल्यात एकही रुपया देणार नाही.

 

Mutilated note-inmarathi02

 

तसेच ५० रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या नोटांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे.

जर ५० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची नोट ही त्या नोटेच्या वास्तविक आकाराच्या ६५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तरच त्याचे पूर्ण पैसे परत मिळतील.

जर ह्या नोटेचा आकार हा वास्तविक आकाराच्या तुलनेत ४० टक्क्यापेक्षा जास्त आणि ६५ टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्या नोटेच्या किमतीच्या अर्धे पैसे बँक तुम्हाला देईल.

जर तुमच्याकडे कधी अशी एखादी नोट आली ज्यावर लिहिलेलं आहे, तर तुम्हाला बँक नोटेच्या बदल्यात नवी नोट परत तर नाही करणार पण ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.

ह्या खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात जो मोबदला दिला जातो तो शिक्के आणि दहा रुपयांच्या नोटांच्या रुपात दिला जातो.

पण बँकेला दिलेल्या खराब-फाटलेल्या नोटांचं बँक काय करत असेल?

हे ही वाचा – विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!

 

प्रत्येक वर्षी करोडो रुपयांच्या नोटा खराब होतात, फाटतात. आरबीआय जवळ अश्या नोटांचा ढीग साचतो.

कारण चलनातील खराब आणि फाटलेल्या नोटा लोक बँकेत जाऊन बदलतात. या नोटा पुन्हा चलनात आणल्या जाऊ शकत नाही. म्हणून ह्या नोटांना नष्ट करावे लागते.

 

Mutilated note-inmarathi01

 

ह्या नोटांना नष्ट करण्याचा एक वेगळी प्रक्रिया असते.

आरबीआय जवळ लाखोंच्या संख्येत अशा नोटा जमा होतात. त्यांना एका खोलीत जमा केले जाते. या नोटांना प्रत्येक वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाळते.

आकडे बघितले तर २०१०-११ साली १. २८५ नोटा ज्याचं मूल्य १,७८,८३० कोटी रुपये एवढं होतं त्यांना जाळण्यात आलं.

पण ह्या खराब –फाटलेल्या नोटा जाळल्याने खूप मोठ्या प्रमाणात धुर होतो. त्यासोबतच एका विशीष्ट प्रकारच्या कागद आणि शाईपासून पासून ह्या नोटा तयार होत असल्याने त्या जळताना पर्यावरणाचे खूप नुकसान होते .

त्यामुळे पर्यावरणाला होणारे नुकसान बघता आता या नोटा न जाळता त्यांचा  उपयोग पेन स्टँड, पेपर वेट इत्यादी सामान बनविण्यासाठी केला जातो.

खराब आणि फाटलेल्या नोटांमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान बघता आता सरकार प्लास्टिकच्या नोटा तयार करण्याच्या विचारात आहे, ज्या खराब होणार नाही आणि फाटणारही नाहीत.

ही योजना कधी अमलात येईल हे माहित नाही पण सध्या तरी आपल्या खराब आणि फाटलेल्या नोटांची अश्याप्रकारे जळून विल्हेवाट लावली जाते.

हे ही वाचा – होय! भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “फाटक्या नोटांचं करायचं काय? : अशा नोटा वापरात आणण्याचे हे आहेत कायदेशीर मार्ग

  • September 15, 2018 at 1:50 pm
    Permalink

    Fake Note asel tar ky karch?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?