' १ नव्हे चक्क २ अश्या मॅच, जेव्हा सर्व ११ खेळाडूंना, "मॅन ऑफ द मॅच" मिळाला...

१ नव्हे चक्क २ अश्या मॅच, जेव्हा सर्व ११ खेळाडूंना, “मॅन ऑफ द मॅच” मिळाला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट म्हटलं की त्याबद्दल आपण कितीही वेळ चर्चा करू शकतो. कारण आपल्यावर क्रिकेटचे तसे संस्कारचं झाले आहेत. जसं पाश्चिमात्य देशांना फुटबॉलचं वेड तसं आम्हा भारतीयांना क्रिकेटचं वेड !

अश्या या क्रिकेटमध्ये  Man Of The Match कोणाला मिळतो असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल, “जो सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू असतो त्याला मिळतं.” बरं तुमच हे उत्तर अगदी बरोबर, म्हणजे क्रिकेटच्या एका मॅच मध्ये Man Of The Match एकाच खेळाडूला मिळतो हे नक्की.

पण आम्ही तुम्हाला सांगितलं की क्रिकेटच्या इतिहासात अश्या दोन मॅचेस होऊन गेल्या आहेत जेव्हा विजेत्या टीमच्या सर्वच खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार दिला होता, तर तुमचा विश्वास बसेल का?

हो…विश्वास ठेवा…हे असं खरंच घडलं होतं…!

 

record-in-cricket-history-marathipizza03

स्रोत

 

१९९६ मध्ये न्युझीलँड आणि वेस्ट इंडीजमध्ये एक सामना खेळवला गेला होता.

अतिशय संथ खेळपट्टी असलेल्या या मैदानावर प्रथम बॅटिंग करणाऱ्या न्युझीलँडला जास्त कमाल दाखवता आली नाही आणि त्यांचा डाव केवळ १५८ रन्स वर आटोपला.

एवढ्या कमी रन्सचे ध्येय पार करणे वेस्ट इंडीज सारख्या तगड्या टीमला सहज शक्य होते.

त्यांनी देखील तसाच विचार केला असेल, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे  वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या १५४ रन्समध्ये गडगडला आणि न्युझीलँडने तो सामना ४ रन्सने खिशात घातला.

पण न्युझीलँडच्या खेळाडूंचा आनंद तेव्हा गगनात मावेनासा झाला जेव्हा अम्पायर बासिल बुचर यांनी न्युझीलँडच्या खेळाडूंचे कौतुक करत सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match देण्याची घोषणा केली.

 

हे ही वाचा – भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…

 

 

record-in-cricket-history-marathipizza01

स्रोत

 

अश्याचप्रकारे १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज टीम्समध्ये कसोटी सामना सुरु होता. या सामन्याच्या दोन्ही इनिंग्जमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वोत्कृष्ट खेळ करत सामना जिंकला.

या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ११ पैकी ६ खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करत सामना आपल्या बाजूने केला होता. तर उर्वरित ५ सदस्यांनी देखील सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

याच गोष्टीने प्रभावित होऊन अम्पायर डेनिस लिंडसे यांनी दक्षिण आफ्रिका टीमच्या सर्वच खेळाडूंसाठी Man Of The Match पुरस्कार देत असल्याची घोषणा केली.

 

record-in-cricket-history-marathipizza02

स्रोत

 

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज टीम्समध्ये झालेल्या या पाच कसोटी सामन्यांच्या सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही आणि सिरीजवर आपले नाव कोरले.

आजही या दोन टीम्सना कोणत्या आधारावर Man Of The Match पुरस्कार दिला गेला याचे ठोस कारण समोर आले नाही. परंतु असे म्हटले जाते की ९० च्या दशकामध्येही वेस्ट इंडीज टीम क्रिकेट जगतामधील एक महान टीम म्हणून ओळखली जायची.

त्यामुळे अश्या टीमला न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेने सहज चीतपट करणे ही त्याकाळची मोठी गोष्ट होती.

त्यामुळेच या टीम्सनी दाखवलेल्या सर्वोत्तम खेळाचं कौतुक म्हणून संपूर्ण टीमला Man Of The Match पुरस्कार देण्यात आला होता.

यानंतर अशी घटना कधीही घडली नाही हे विशेष !

 

record-in-cricket-history-marathipizza04

स्रोत

                                                                  असा आहे हा क्रिकेट इतिहासातील आगळावेगळा रेकोर्ड !!

हे ही वाचा- आज लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील ‘वन डे’ सामन्यांना अशी झाली सुरूवात!

=

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?