' दुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श! – InMarathi

दुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगभरात ISRO नेहमीच भारताची शान वाढवत असते. त्यांच्या मोहीमा आणि कामगिऱ्यांनी कित्येक विक्रम भारताच्या नावे केले आहेत. अवकाश संशोधन क्षेत्रात नेहमीच आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवणाऱ्या ISRO ने आता अजून एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शेतीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतातील बळीराजा अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. याच बळीराजाच्या मदतीसाठी धावत येत ISRO ने दुष्काळाने होरपळलेलं एक गाव दत्तक घेतलंय.

isro-adopt-village-marathipizza01

स्रोत

भारतातील अनेक राज्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या समस्येने ग्रस्त आहेत. कर्नाटक हे राज्य त्यापैकीच एक ! या राज्यातील काही गावांमध्ये गेल्या काही काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. म्हणून या परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा आणि त्यात आपलेही काहीतरी योगदान असावे म्हणून ISRO ने एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

isro-adopt-village-marathipizza02

स्रोत

ISRO चे मार्केटिंग पार्टनर असलेल्या एंट्रीक्स कॉरपोरेशन लिमिटेड या कंपनीने कर्नाटकच्या टूमाकुरु जिल्ह्यामधील दुष्काळाने प्रभावित ब्रह्ममसंद्रा गावाची निवड केली. या गावात शेतीच्या आधुनिक पद्धती वापरून येथील शेती व्यवसायाला चालना देणे आणि येथील शेतकऱ्यांचे जीवन सुधारणे हा या मागचा ISRO चा मुख्य उद्देश आहे. या कामात ISRO भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनची मदत घेणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५ वर्षांचा कालावधी आणि ३.८१ करोड रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.

ब्रह्ममसंद्रा गावामध्ये एकूण ३५६ कुटुंबे राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास १४२० एवढी आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा शेतीचं आहे, त्यामुळे दुष्काळाचा भयंकर मोठा फटका या गावाला सोसावा लागला. या गावातील पाण्यामध्ये फ्लोराईड असल्याकारणाने येथील पाणी पिण्यास योग्य नाही. येत्या ५ वर्षांत या गावातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा विडा ISRO ने उचलला आहे. सोबतच या गावातील पायाभूत सुविधा, सपोर्ट सर्व्हिस आणि हायटेक स्कीलचा विकास करण्याचे देखील ISRO चे उद्दिष्ट आहे.

isro-adopt-village-marathipizza03

स्रोत

समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य ओळखून सेवाभावी वृत्तीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ISRO चं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

 

ISRO आणखी एक जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे: ISRO एकाचवेळी Launch करणारा तब्बल ८३ Satellites 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?