'८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा...

८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आद्यपूजेचा मान असणारे आणि सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भारताचे खास दैवत म्हणजे गणराज! गणपतीची आराधना आपल्याला अगदी बालपणापासून शिकवलेली असते. कोणत्याही गोष्टीचा आपल्याकडे पहिला श्रीगणेशा होतो..!

कोणतेही काम सुरू करताना ||श्री गणेशाय नमः|| ने कार्य आरंभिले जाते.

शुभ कार्यात सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पाचा असल्याने साहजिकच भारतात ठीक ठिकाणी गणेशाचे वंदन पहिले केले जाते.

गणेशाच्या नावे अनेक पूजा-अर्चा, उपवास आपल्याकडे करतात. घरावर, दारावर, महत्वाच्या वस्तूंवर आणि अगदी कार मध्ये सुद्धा गणेशाच्या प्रतिमा आढळतात. विद्यार्थी जीवनात गणरायाचे अढळ स्थान आहे. विद्येची देवता असल्याने परीक्षार्थी देखील परिक्षेपूर्वी बाप्पाला आळवताना दिसतात.

 

Ganapati3

 

लोकांच्या या श्रद्धेमुळे भारतात आणि परदेशातील भारतीयात आपल्याला बाप्पाची विविध रुपात पूजा मांडलेली दिसते. पण मुस्लिमबहुल अशा इंडोनेशिया देशात २०,००० रुपयाच्या नोटेवरसुद्धा गणेशाचे चित्र दिसते.

इंडोनेशियामध्ये हिंदूंच्या ह्या दैवताला इतका मान कसा काय आहे? ८७.३% मुसलमान असलेल्या देशात फक्त ३% असलेल्या हिंदूंच्या देवतेला सरळ देशाच्या रुपयांवर स्थान कसे मिळाले?

 

indonesian note inmarati

 

ही तर नक्कीच आश्चर्याची बाब आहे. इतकी की लालकृष्ण अडवाणी एकदा इंडोनेशियाच्या जकार्ता मध्ये बहु देशीय सिंधी कॉन्फरन्स ला गेले असता तिथे मुस्लिम लोकांच्या मनात असलेले हिंदूंचे आणि गणेशाचे स्थान बघून तेही आश्चर्यचकित झाले होते.

तर ह्या २०००० च्या इंडोनेशियन रुपयाच्या नोटेवर गणेशाचे चित्र आणि त्याच्या बाजूला ‘की हजार देवांतरा’ नावाच्या व्यक्तीचे चित्र देखील आहे.

 

हे ही वाचा – गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

मागच्या बाजूस लहान शाळकरी विद्यार्थ्यांचे वर्गातील चित्र आहे. ह्या मागचं खरं कारण असे आहे की हा इंडोनेशियाचा परिसर खूप पूर्वी पासून हिंदुत्वाच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे ६४ कलांचा अधिपती मानला गेलेला गणेश तेथील लोकांच्या जीवनाचा भाग झाला आहे.

त्या नोटेवर क्रांतिकारी असलेले ‘देवांतरा’, शिक्षणाचे महत्त्व दाखवणारे विद्यार्थी आणि सोबत विराजमान आहे गणपती देवता.

इतकेच नाही तर बाकी अनेक हिंदुत्वाशी निगडित असलेली चिन्हे देखील इंडोनेशिया मध्ये पाहायला मिळतात.

मुसलमान असो व हिंदू रामायण-महाभारत हे सगळ्यांनाच माहीत आहे. जकर्तातील एक चौकात अर्जुन आणि कृष्णाची मूर्ती आपल्याला पहायला मिळते. आणखी एक आश्चर्याची गोष्ट अशी की इंडोनेशियाच्या आर्मीचा मॅस्कॉट हा दुसरा तिसरा कोणी नसून पावन सूत हनुमान आहे. हो, तुम्ही जे वाचताय ते सत्य आहे..!

बालीच्या टुरिझमचा लोगो हा हिंदुत्वाच्या चिन्हांशी निगडित आहे. तर बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या लोगो मध्ये मध्यभागी विद्येचे दैवत गणराज विराजमान आहे.

 

bandung inmarathi

 

इंडोनेशिया मध्ये एक ना अनेक गोष्टी हिंदू धर्माशी जोडलेल्या आहेत. जावा बेटांवरील एक म्युझियम मध्ये खूप काही नमुने हिंदुत्वाशी नातं सांगतात. हिंदू देवी देवतांच्या यात्रा बाली मध्ये दरवर्षी घडतात. वेदपुराण वाचले जाते आणि हिंदू रीती रिवाजही पाळले जातात.

भीम घटोत्कचाच्या मूर्ती, बेटांना असलेली हिंदू पुराणातील नावे, हिंदू मंदिरे, बुद्धिस्ट मोनास्ट्रीज हे सगळे इंडोनेशियातील हिंदू मूळ दर्शवतात.

इंडोनेशिया ह्या नावाचा अर्थ देखील हिंदूंशी असलेली नाळ जपतो. इंडोनेशिया म्हणजे ‘इन्ड्स लँड’ म्हणजेच ‘हिंदूंचा देश’.

अगदी नवव्या शतकात तर हिंदू व्यापारी देखील इंडोनेशिया मध्ये येऊन स्थायिक झाले होते. आताच्या नवीन काळात ह्या देशातील हवाई दळणवळणाच्या साधनांच्या कंपनीचे नाव आहे गरुड एयर लाईन्स आणि एक बँकेचे नाव आहे कुबेर बँक. ही दोन्ही नावे हिंदू धर्मातील आहेत.

 

garuda airlines inmarathi

 

इतके सगळे हिंदू धर्माशी निगडित असताना गणेशाचे रूप पैशांवर दिसणे म्हणजे काही फार वेगळे नाही.

पूर्वी पासून हिंदू परंपरा चालत आलेल्या असताना पुढे हिंदूंची संख्या मात्र घटली. पण हिंदूंची श्रद्धास्थाने मात्र अबाधित राहिली. अजूनही इंडोनेशियाला गेल्यास हिंदू धर्माशी जोडणाऱ्या खाणाखुणा आपणास दिसतात.

 

hindu temple inmarathi

 

लालकृष्ण अडवाणी त्यांच्या भेटीनंतर म्हणाले होते की इंडोनेशिया मधील हिंदुत्वाशी निगडित गोष्टी संस्कृत भाषेशी सुद्धा मिळत्याजुळत्या आहेत.

हिंदूंचे दैवत गणेश त्यांच्या नोटेवर असण्यामागे अजून एक कथा आहे. १९९७ च्या आसपास सुब्रमण्यम स्वामींनी इंडोनेशियाच्या फायनान्स मिनिस्टरना विचारले होते की तुमच्या नोटेवर आमचे बाप्पा कसे काय आले? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर आपल्याला नक्कीच सुखावून जाईल असे आहे. ते सांगतात,

जेव्हा आशियाई देशांमध्ये आर्थिक मंदी होती तेव्हा इंडोनेशिया मध्ये देखील त्याचे सावट आले होते. तेव्हा कोणीतरी सरकारला असे सांगितले की गणपती देवता ही शुभ लाभ देणारी आहे. भाग्य बदलवणारी आहे. योगायोगाने नोटेवर हा बदल केल्यानंतर इंडोनेशियाची परिस्थिती सुधारली.

indonesian ganpati inmarathi

 

गणेशाच्या नोटेवरील सहभागामुळे इंडोनेशिया वाईट आर्थिक परिस्थितून बाहेर पडला अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे.

आणि तेव्हा पासून तिथे सगळेच जण गणेशाला मानतात. तेव्हा पासूनच देशाच्या करन्सी वर (नोटेवर) हिंदू देवतेचे असणे हे कोणालाच आक्षेपार्ह वाटत नाही.

कथा काहीही असोत. पण दुसऱ्या कोणत्या देशात आपल्या बाप्पाला मनाचे स्थान मिळायचे पाहून नक्कीच अभिमान वाटतो.

===

हे ही वाचा – पुण्यातल्या मानाच्या ५ गणपतींचा थक्क करणारा “हा” शेकडो वर्षांचा इतिहास फार कमी जणांना माहितीये

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा…

  • September 14, 2018 at 3:39 pm
    Permalink

    good

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?