' सामुहिक बलात्काराची इतिहासातील सर्वात मोठी घटना, आजही मन विषण्ण करते! – InMarathi

सामुहिक बलात्काराची इतिहासातील सर्वात मोठी घटना, आजही मन विषण्ण करते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या बुद्धीचा झालेला विकास आणि त्याने साधलेली प्रगती. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणेच राहणाऱ्या माणसाने काळ बदलत गेला तशी उत्क्रांती साधली. इतकी की आता तर तो त्याच्या बुद्धीच्या बळावर परग्रहावर जाऊ लागला..

पण, उत्क्रांत झालेला हा माणूस त्याचा रानटीपणा पूर्णपणे विसरलाय का? काही घटना अशा घडून गेल्या आहेत आणि घडत आहेत ज्या पाहून तुम्हाला असं वाटेल की माणूस अजून रानटीच आहे.

खून, बलात्कार, हिंसा या तर आजही आपण घडताना पाहतोय. माणसाच्या माणूस असण्याची लाज वाटावी अशा कित्येक घटना रोज घडत असतात. त्यापैकीच एक म्हणजे १९४५ साली जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान जर्मनीत झालेल्या बलात्काराच्या घटना.

==

हे ही वाचा :    असिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो!

==

gangrape InMarathi


इतिहासातील सामूहिक बलात्काराची सर्वात मोठी घटना!

Walter Zapotoczny या लेखकाने त्याच्या ‘Beyond Duty: The Reason Some Soldiers Commit Atrocities’ ह्या पुस्तकात ह्या घटनेचा उल्लेख करून ठेवलाय. त्याच्या म्हणण्यानुसार २ मिलियन (१ मिलियन = १० लाख) जर्मन स्त्रियांवर रशियाच्या (त्यावेळचा सोव्हिएत ) रेड आर्मीने बलात्कार केले! हे सगळं वाचतांना, ह्या घटनेची काही छायाचित्रे बघताना मन सुन्न होऊन जातं!

 

rape-pic-4-inmarathi

 

एप्रिल ते मे दरम्यान जर्मनीची राजधानी बर्लिन येथे १ लाख बलात्काराच्या घटना घडल्या. हे सगळं तिथल्या हॉस्पिटलच्या रिपोर्ट्स वरून सिद्ध होतं. पूर्व प्रशिया, पोमेरेनिया, सिलेशिया येथे १४ लाखाहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या अशी नोंद आहे.

जर्मनीत गर्भपाताच्या शस्त्रक्रिया रोज घडत होत्या असं देखील हॉस्पिटलचे रिपोर्ट्स सांगतात.

Natalya Gesse, ह्या सोविएतच्या युद्ध बातमीदाराच्या म्हणण्यानुसार रशियाच्या सैनिकांनी कसलीही तमा न बाळगता जर्मन स्त्रियांवर अत्त्याचार केले.

“अगदी आठ वर्षांच्या लहान मुलीपासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध स्त्रीपर्यंत त्यांनी कुणालाही सोडलं नाही. ते सैन्य म्हणजे बलात्कार्यांचचं सैन्य होतं.”

 

sexual_assault_InMarathi

 

Zapotoczny त्यांच्या पुस्तकात म्हणतात की,

रशियन स्त्री सैनिकांनी देखील ह्या कृत्यावर आक्षेप घेतला नाही. काहींना तर हे गमतीशीर वाटे! ह्या परिस्थितीमुळे जवळजवळ २ लाख मुली आणि स्त्रियांचा मृत्यु झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एकाच स्त्रीवर ७० वेळा अत्याचार करण्यात आले.

 

rape-pic-1-inmarathi

 

रशियन रेड आर्मीच्या सैनिकांनी प्रतिशोध म्हणून बलात्कार केले. जर्मन सैनिकांनी त्यांच्या “मातृ”भूमीवर केलेल्या हल्ल्याचा हा प्रतिशोध होता.

त्यात आणखी भरीस भर म्हणजे रशियन सैन्य हे बराच काळ स्त्रीसुखापासून वंचित होते त्यामुळे त्यांचे पाशवीपण बाहेर आले.

एक सोव्हिएत मेजर एका ब्रिटिश पत्रकाराला सांगतात –

“माझे सहकारी हे शरीरसुखासाठी इतके भुकेले होते कि त्यांनी साठ, सत्तर, ऐंशी वर्षांच्या वृद्ध स्त्रियांवर देखील अत्याचार केले.”

१९४८ नंतर जर्मनीतल्या बलात्काराच्या घटना एकदम कमी झालेल्या दिसतात. ह्या काळात सोव्हिएतच्या सैन्याने जर्मनीतून काढता पाय घेतला होता.

 

rape-pic-2-inmarathi

 

Gabriele Kopp ह्या देखील याच घटनेतील एक पीडित. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी एक पुस्तक देखील लिहिलं. त्यांचं स्वत:चं नाव घालून त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. असं करणाऱ्या त्या पहिल्याच जर्मन महिला आहेत.

पुस्तकाचं नाव – “Warum war ich bloss ein Madchen?” (“Why Did I Have to Be a Girl?”).

==

हे ही वाचा : जगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे!

==

 

रशियन सैन्याने जेव्हा १९४५ साली त्यांच्यावर अत्याचार केले तेव्हा त्या फक्त पंधरा वर्षाच्या होत्या! चौदा दिवसांच्या अवधीत त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार झाला…

 

kopp InMarathi

 

त्यांना त्या वयात लैंगिक संबंधांबद्दल काही माहित देखील नव्हते. ते चौदा दिवस आठवले की, त्यांना अन्न-पाणी देखील जात नाही, रात्रभर झोप येत नाही. त्यांच्या आयुष्यातल्या त्या चौदा दिवसांमुळे त्यांचे २९००० दिवस जगणं म्हणजे नरकात राहण्यासारखं होतं.

Kopp यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगांचं वर्णन केलंय….ते वाचतांना लक्षात येतं की, त्या एक उत्तम “लेखिका” नाहीत! पुस्तक अगदीच सामान्य आहे. १९५० साली प्रकाशित झालेलं “A Woman in Berlin” हे पुस्तक वादग्रस्त आहे.

 

sexual_assault_2 InMarathi

 

त्याची ऑथेन्टिसिटी प्रस्थापित करण्यात हे पुस्तक अपयशी ठरतं, परंतु Kopp यांचं पुस्तक ह्या कसोटीवर खरं उतरतं!

Karl Friedrich Grau यांच्या “Silesian Inferno : War Crimes of the Red Army on its March into Silesia in 1945” ह्या पुस्तकात त्यांनी जानेवारी ते ऑगस्ट १९४५ दरम्यान सिलेशियाच्या Oppeln आणि Wohlau ह्या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या अत्याचारांचं पुराव्यासहित वर्णन केलेलं आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि स्वतः पीडित यांच्या वर्णनाने हे पुस्तक परिपूर्ण ठरलंय.

 

Silesian Inferno--book-inmarathi

 

इतिहास विजेते लिहितात, आपण तो वाचतो …स्वीकारतो …आणि पुढच्या पिढ्यांनाही तसाच वाचायला लावतो. पण तसं नसलं पाहिजे!

Revisionist इतिहासकार म्हणजेच घडलेल्या घटनांचा पुन्हा नव्याने स्वतंत्रपणे अभ्यास करणारा इतिहासकार काय म्हणतो हे वाचून, अभ्यासून आपण आपली मतं बनवली पाहिजेत.

कारण, “इतिहास हा भावी पिढयांना मार्गदर्शन करतो” – हे पु.लं.च्या
बटाट्याची चाळ मधल्या कोचरेकर मास्तरांचं वाक्य अक्षरश: खरंय!!!

==

हे ही वाचा : ‘तिने’ ८ वर्षांपासून होत असलेल्या बलात्काराचा बदला त्याचे गुप्तांग कापून घेतला!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?