' मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही! – InMarathi

मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंतराळात जाणं म्हणजे खरंच हिमतीचं काम आहे. अंतराळात कधी कुठला बिघाड झाला तर अंतराळवीरांच्या मृत्यूची सुद्धा दाट शक्यता असते.

नासाच्या कोलंबिया यानात असाच बिघाड झाल्याने कल्पना चावला ह्यांच्यासह त्यांच्या सहकारी अंतराळवीरांचाही दुर्दैवी मृत्यू ओढवला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अंतराळात अंतरळवीरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात कधी तब्येत बिघडून किंवा इतर काही कारणाने जर अंतराळवीराचा अंतराळातच मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाचे काय करतात?

अशीच वेळ १९६९ साली सुद्धा येणार होती. राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना अशी शंका वाटत होती की, कदाचित अपोलो ११ यानातून चंद्रावर गेलेले नील आर्मस्ट्रॉंग व इतर अंतरळवीर परत येऊ शकणार नाहीत. त्यांचा चंद्रावरच किंवा अवकाशातच मृत्यू होईल.

 

apollo_11_inmarathi

हे ही वाचा –

===

 

निक्सन ह्यांनी तर अशी काही दुर्दैवी घटना झाल्यास त्यासाठी आधीच भाषण सुद्धा तयार ठेवले होते. त्या भाषणाची सुरुवात अशी होती, “Fate has ordained that the men who went to the moon to explore in peace will stay on the moon to rest in peace.”

सुदैवाने नासाची मोहीम यशस्वीपणे पार पडली आणि निक्सन ह्यांना हे भाषण करण्याची वेळ आली नाही. परंतु अपोलो नंतर अनेक मोहिमा झाल्या आणि नवनवीन मोहिमांची तयारी सुरू आहे. म्हणूनच आता हा प्रश्न उभा राहतो आहे की दुर्दैवाने अंतराळात असतानाच अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास काय करावे?

मंगळ ग्रहावर जाण्याची मोहीम आखल्यास मंगळावर पोचण्यासच कित्येक दिवस लागतील. जर अश्याच नवनवीन मोहिमा सुरू राहिल्या तर कधी ना कधी अशी वेळ येऊ शकतेच. परंतु असे झाले तर काय करायचे ह्याविषयी कोणालाच माहिती नाही.

सध्याच्या परिस्थितीत अंतराळात अंतराळवीर जास्तीत जास्त सहा महिने राहू शकतात. ह्या साठी अंतराळवीरांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. आणि ते वैद्यकीयदृष्ट्या फिट असले तरच त्यांना अंतराळात पाठवण्यात येते.

आजवर अंतराळ यानात अंतराळवीराचा मृत्यू झाला नाहीये. नासा अशी घटना घडू नये ह्याची संपूर्ण काळजी घेते पण अशी घटना घडल्यास काय करावे ह्याबाबतीत मात्र अजून तरी काही नियम तयार केलेले नाहीत.

स्टारटॉक रेडियोच्या एका एपिसोडमध्ये चक नाईस ह्या निवेदकाने माईक मॅसिमिनो ह्या अंतराळवीराची मुलाखत घेतली. ह्या मुलाखतीमध्ये निवेदकाने माईक ह्यांना प्रश्न विचारला की जर अंतराळात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास काही प्रोटोकॉल पाळायचा असतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना माईक म्हणाले की ,

“आम्हाला अंतराळ मोहिमेवर जाण्याआधी सर्व प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते पण अशी घटना घडल्यास काय करावे ह्याचे मात्र आजपर्यंत कधीही ट्रेनिंग देण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा वेळी काय करतात ह्याची माहिती मलाही नीट देता येणार नाही.”

जरी ह्याप्रकारचे कुठलेही ट्रेनिंग अंतराळवीरांना देण्यात येत नसले तरीही अश्या दुर्देवी घटनांची प्रॅक्टिस अंतराळवीर करतात.

अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड ह्यांनी त्यांच्या “An Astronaut’s Guide to Life on Earth” ह्या पुस्तकात “डेथ सिम” ह्या कठीण एक्सरसाईज विषयी लिहिले आहे. ह्या पुस्तकात अंतराळवीरांना त्यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यास काय करावे ह्या विषयी मार्गदर्शन केले आहे.

 

chris_hadfield_signed_book_inmarathi

 

हे ही वाचा –

===

 

ह्या डेथ सिम एक्सरसाईज मध्ये एक माणूस मरण्याची भूमिका करतो आणि त्याचे इतर सहकारी आता पुढे काय काय करायचे ह्यावर चर्चा करतात. ते पृथ्वीवरील अधिकाऱ्यांना आपला सहकारी गेल्याची माहिती देतात आणि नंतर शवाचे काय करायचे ह्यावर चर्चा करतात.

शव बॉडी बॅगमध्ये ठेवायचे की लॉकरमध्ये? मग शवाचा वास येत असेल तर काय करायचे? रिसप्लाय शिपने शव परत पृथ्वीवर पाठवायचे का? की परत येताना इतर गोष्टींसह ते जाळून टाकायचे? गेलेल्या व्यक्तीच्या घरच्यांना कोणी सांगायचे? ते कसे सांगायचे? ते शव स्पेसमध्येच सोडून द्यायचे का? ह्या शक्यतांची चर्चा या दरम्यान केली जाते.

नासा मंगळावर अंतराळवीरांसह यान पाठवण्याच्या तयारीत आहे. तसेच मार्स वन आणि स्पेसएक्स सारख्या प्रायव्हेट कंपन्यासुद्धा मंगळावर मानवी वसाहती तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्यासाठी अजून खूप कालावधी लागेल पण भविष्यात असे घडण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.

म्हणूनच आता किंवा पुढे भविष्यात अंतराळात कुणा ना कुणाचा मृत्यू होण्याची शक्यता आहेच. तर ह्यावर एक सोपा उपाय म्हणजे अंतराळयानाचे एअरलॉक उघडून गेलेल्या व्यक्तीचे शरीर अंतराळात सोडून देणे हा आहे.

 

nasa-inmarathi

 

आपण स्टार ट्रेकमध्ये स्पॉकचे अंत्यसंस्कार ह्याच पद्धतीने झाल्याचे बघितले आहे. परंतु खऱ्या आयुष्यात असे होऊ शकत नाही कारण युनायटेड नेशन्सच्या नियमाप्रमाणे तुम्ही अंतराळात कचरा टाकू शकत नाही. म्हणजेच अंतराळात तुम्ही शव असेच सोडून देऊ शकत नाही.

अंतराळात व्हॅक्युम असल्याने ही शरीरे अशीच फिरत राहतील किंवा एखाद्या अंतराळयानाला धडकू शकतील किंवा एखाद्या दुसऱ्या ग्रहावर सुद्धा जाऊ शकतील किंवा असे काहीही होऊ शकेल ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. म्हणूनच ह्यावर लवकरात लवकर उपाय शोधून काढणे आवश्यक आहे.

कारण ते शव अंतराळयानात सुद्धा अनेक दिवस ठेवून चालणार नाही. त्याने इतर अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. अंतराळयान तयार करण्यात खूप खर्च होतो. त्यात डेड बॉडीजसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आणखी करोडो रुपयांचा खर्च येईल.

अनेक लोक ह्यावर रिसर्च करत आहेत व उपाय शोधून काढायचा प्रयत्न करत आहेत.

ह्यातील एक उपाय म्हणजे ग्रीन ब्युरियल कम्पनी प्रॉमेसा आणि नासा ह्यांनी एकत्र येऊन काम केले व बॉडी बॅक चा उपाय केला तर हा प्रश्न सुटेल. बॉडी बॅक म्हणजे गेलेल्या व्यक्तीचे शरीर एयरटाईट स्लीपिंग बॅगमध्ये ठेवून ते अंतराळात काही काळ ठेवणे.

 

gravity-inmarathi

हे ही वाचा –

===

 

ह्याने शरीर गोठेल कारण अवकाशात तापमान अत्यंत कमी असते. ते शरीर गोठल्यानंतर ते परत यानात आणून नष्ट होईपर्यंत व्हायब्रेट करणे व जे काही अवशेष उरतील (म्हणजे मानवी शरीराची राख) ते परत येईपर्यंत यानाच्या बाहेरच्या भागात साठवून ठेवणे.

ह्याशिवाय दुसरा वेगळा उपाय म्हणजे अवकाशात किंवा मंगळ ग्रहावर मानवी शरीराचा खत म्हणून उपयोग करणे हा होय.

हा उपाय प्रत्यक्षात करणे किंवा फार कुणाला मान्य होणे कठीण आहे. पॉल वोल्प हे नासासाठी काम करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की, मानवी शरीराचे चांगले खत होणार नाही. आजवर कुणीही हे करून पाहिले नाही व कुणालाही हे मान्य होण्यासारखे नाही.

मृत्यू ही माणसासाठी अतिशय महत्वाची तसेच न टाळता येणारी घटना आहे. सध्या तरी बॉडी बॅक हा उपाय सोडला तर दुसरा कुठलाही प्रॅक्टिकल उपाय शास्त्रज्ञांना सापडलेला नाही.

अधिक कालावधीच्या अंतराळ मोहीमेआधी ह्या बाबीचा विचार व्हायला हवा व ह्यावर ठोस उपाय सुद्धा काढायला हवा. कारण आज ना उद्या आपल्यापुढे हा प्रश्न येणार आहेच त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा तयार ठेवायला हवा.

परंतु आज मात्र जे जे पर्याय समोर ठेवले जात आहेत, ते पहाता इतकंच म्हणावं लागेल की मृत्यू पश्चात, एखाद्या मृतदेहाचं काय काय केलं जाऊ शकतं याचा इतका उहापोह आपण पृथ्वीवरील सामान्य-जन कधी स्वप्नातही करणार नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?