' बेरोजगार ते बिलियन डॉलर्सचा मालक ई-कॉमर्स जगतातला खरा 'अलिबाबा' - जॅक मा!

बेरोजगार ते बिलियन डॉलर्सचा मालक ई-कॉमर्स जगतातला खरा ‘अलिबाबा’ – जॅक मा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दोन वर्षांपूर्वी अलिबाबा या जगप्रसिद्ध कंपनीचे को-फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन ‘जॅक मा’ ह्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला!

त्यांनी म्हणजेच २०१९ च्या सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं!

जॅक मा ‘अलिबाबा’ या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत आहे.

आज जरी ही कंपनी एवढी मोठी असली तरी ह्या कंपनीची सुरवात छोट्या स्वरुपात झाली होती.

ज्या व्यक्तीने ह्या कंपनीची सुरवात केली आणि एवढ्या मोठ्या स्तरावर आणले त्याच जॅक मा ह्यांच्या संघर्षाची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

जॅक मा ह्यांचा जन्म १० सप्टेंबर १९६४ साली चीनच्या एका छोट्या हांगझोऊ ह्या गावात झाला. चीनमध्ये इंग्रजी भाषेला जास्त महत्व दिलं जात नाही.

पण त्यांना लहानपणापासूनच इंग्रजी भाषा शिकण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ते नेहमी सायकलने Hangzhou International Hotel इथे जायचे.

तिथे विदेशी नागरिक यायचे. ते इंग्रजी शिकण्यासाठी त्या लोकांशी आपल्या तुटक्या फुटक्या इंग्रजीत बोलायचे.

 

jack-ma-inmarathi
shanghai-dail.com

 

जेव्हा जॅक मा बऱ्यापैकी इंग्रजी बोलायला शिकले तेव्हा त्यांनी इतर देशातून येणाऱ्या विदेशी लोकांसाठी एका टूरिस्ट गाइडचे काम केले. त्यांनी पुढील ९ वर्षांपर्यंत हे काम केले.

टूरिस्ट गाइडचं काम करत असताना त्यांची मैत्री एका विदेशी व्यक्तीसोबत झाली. त्यांनी Hangzhou Institute of Electronic Engineering येथे इंग्रजीचे शिक्षक म्हणून देखील काम केले.

जॅक मा ह्यांनी त्या काळात ३० हून अधिक नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले.

त्यांनी KFC मध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले. तिथे जे २४ लोक इंटरव्ह्यूसाठी गेले होते त्यापैकी इतर २३ जणांची निवड झाली आणि जॅक मा ह्यांना नकार मिळाला.

 

jack ma inmarathi
quartz

 

त्यांनी एकदा पोलिसाच्या नोकरीसाठी देखील प्रयत्न केला पण त्यांच्या कमकुवत शरीरामुळे त्यांना नकारच मिळाला.

१९९४ साली जॅक मा ह्यांनी पहिल्यांदा इंटरनेटविषयी ऐकले. १९९५ साली त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने इंटरनेट विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमेरिका गाठले.

तिथे त्यांनी पहिल्यांदाच इंटरनेट बघितले आणि ते कसे काम करते ह्याची माहिती मिळवली.

त्यांनी इंटरनेटवर सर्वात आधी Bear हा शब्द सर्च केला. तेव्हा त्यांना Bear ह्या शब्दाशी निगडीत अनेक वेबसाईट दिसून आल्या.

पण त्यांना इंटरनेटवर चीनी भाषेत ह्या विषयाची कुठलीही माहिती दिसली नाही. एवढचं नाही तर त्यांना इंटरनेटवर चीन देशाबाबत देखील खूप कमी माहिती उपलब्ध झाली.

आपला देश टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात इतर देशांच्या खूप मागे असल्याचं त्यांना जाणवलं. तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली.

जॅक मा आणि त्यांच्या अमेरिकी मित्राने मिळून चीन देशाबाबत माहितीपूर्ण अशी पहिली वेबसाईट बनविली.

 

ma-morley-inmarathi
eyerys.com

 

वेबसाईट बनविल्याच्या काहीच तासांतच त्यांना चीनी लोकांचे इमेल्स यायला लागले. हे बघून जॅक मा ह्यांना इंटरनेट किती शक्तिशाली आहे समजले.

१९९५ साली त्यांची पत्नी आणि काही मित्रांनी मिळून २०००० डॉलर जमा केले आणि एक वेबसाईट बनविण्याची कंपनी सुरु केली. तिचं नाव होतं China Yellow Pages.

ह्या कंपनीचे काम इतर कंपन्यांसाठी वेबसाईट तयार करणे होते. ३ वर्षांच्या आत ह्या कंपनीला ३ लाख डॉलरचा नफा झाला.

त्यानंतर जॅक मा आणि त्यांच्या टीमने चीनी कंपन्यांसाठी वेबसाईट बनविण्याचं काम हाती घेतलं.

 

china yello page inmarathi

 

जॅक मा सांगतात की,

जेव्हा ते आणि त्यांची टीम वेबसाईट तयार करायची तेव्हा त्यांना टीव्ही आणि पत्ते खेळत बसावं लागायचं.

कारण तेव्हाच्या इंटरनेटचा स्पीड हा एवढा कमी होता की, अर्धा पेज बनवायला जवळपास साडे तीन तास लागायचे.

१९९८-९९ मध्ये जॅक मा ह्यांनी China International Electronic Commerce Center ह्यांच्या एका आयटी कंपनीसाठी देखील काम केले. पण नंतर त्यांनी ती नोकरी सोडली!

आणि आपल्या १७ मित्रांना घेऊन ते गावी म्हणजेच Hangzhou येथे परतले. त्यानंतर त्यांनी मित्रांसोबत मिळून आपली पहिली B to B eCommerce ही वेबसाईट सुरु केली.

अलिबाबा… हेच नाव त्यांनी आपल्या वेबसाईटला का दिले असावे? हा प्रश्न जेव्हा जॅक मा ह्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ह्याबाबतच एक किस्सा सांगितला.

 

 

त्यांनी सांगितले की,  मी आधीपासूनच वेबसाईटचे नाव अलिबाबा असे ठेवण्याचा विचार केला होता. म्हणुन जेव्हा मी सॅन फ्रॅन्सिस्कोच्या एका कॉफी शॉपमध्ये बसलो होतो तेव्हा,

मी शॉपमधील वेट्रेसला विचारले की, तुला अलिबाबाविषयी काही माहिती आहे का? तर त्या वेट्रेसने उत्तर दिले, खुल जा सिम-सिम….त्यांनतर त्यांनी अनेक भारतीय, अमेरिकन व इतर देशांतील लोकांना हाच प्रश्न विचारला.

त्यावरून त्यांना कळले की, अलिबाबा सर्वांनाच माहिती आहे. म्हणुन त्यांनी त्यांच्या कंपनीला Alibaba Groups असे नाव दिले.

Alibaba Groups ह्या नावाने संपूर्ण जगभरात खूप लोकप्रियता मिळविली.

सध्या २४० देशांत ही कंपनी आपला व्यवसाय चालवत आहे. सप्टेंबर २०१४च्या आकड्यांनुसार अलिबाबा कंपनीने New York Stock Exchange नुसार २५ बिलियन डॉलरची कंपनी उभी केली.

तर १० सप्टेंबर २०१७ च्या फोर्ब्स रिपोर्टनुसार जॅक मा ह्यांची एकूण कमाई ही ३७.६ बिलियन डॉलर एवढी आहे. आज ह्या कंपनीत ५० हजाराहून अधिक लोक काम करत आहेत.

 

jack-na-forbes-inmarathi
dianshangwin.com

 

ज्यांना एकेकाळी नोकरीसाठी वणवण भटकावे लागले होते आज त्यांनी एवढी मोठी कंपनी उभी केली. फक्त उभी केली नाही तर यशस्वीपणे चालविली देखील.

जॅक मा जरी कंपनीतून निवृत्ती घेत असले तरी त्यांच्या जीवनातील संघर्ष नेहमीच त्या प्रत्येकाला प्रेरणा देईल जो आयुष्यात संकटांचा सामना करतो आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?