' हे वाचल्यानंतर दुसऱ्याचे इयरफोन्स वापरण्याचा धोका आपण कधीही पत्करणार नाही

हे वाचल्यानंतर दुसऱ्याचे इयरफोन्स वापरण्याचा धोका आपण कधीही पत्करणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सकाळी ऑफिसला जायला घरातून निघालं की, एक दृश्य हमखास दिसतं ते म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकच्या हातात मोबाईल आणि कानात इयरफोन्स घातलेलं असतात.

म्हणजे रस्त्यावर फार कमी लोकांच लक्ष असतं, कारण पूर्ण लक्ष हे त्या मोबाईल आणि कानात घातलेल्या इयरफोन्समध्ये असते.

जेव्हापासून मोबाईल हा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनात आला आहे तेव्हापासून एक नवीच उत्क्रांती ह्या जगात घडून आली. लोकं आता एकमेकांशी संवाद साधायला या मोबाईलचा वापर करतात मग ते संवाद साधणारे एकाच घरातील का असेनात.

आणि तेव्हढीच उत्क्रांती घडवून आणली ह्या इयरफोन्सने.

हे इयरफोन्स म्हणजे मजाच आहे, आपण मोबाईलवर काय ऐकतो आहे हे इतर कुणाला कळत नाही आणि ते काय बोलत आहेत हे आपल्याला कळत नाही.

म्हणजे नको असलेले लोक किंवा संवाद इग्नोर करायचं ब्रम्हास्त्र आहे जणू हे इयरफोन्स.

 

 

पण कुठल्याही गोष्टीचा अतिवापर हा त्रासदायकच असतो. जसा मोबाईलच्या अतिवापराने आता नवनवीन आजार निर्माण व्हायला लागले आहेत, तसेच काही नवीन आजार ह्या इयरफोन्समुळे देखील उद्भवू शकतात.

त्यातच सर्वात मोठा धोका हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण हे इयरफोन्स इतर कोणासोबत शेअर करतो.

म्हणजे कुणा दुसऱ्याने वापरलेले इयरफोन्स वापरने, जसे की, एखाद्यावेळी आपला मित्र आपल्याला बोलतो की, हे गाण ऐक किती मस्त आहे, तेव्हा आपण काहीही विचार न करता लगेच त्याने वापरलेले तेच इयरफोन्स कानात घालून ते गाण एकतो.

पण तुम्हाला माहित आहे ही आपली छोटीशी चुक ज्याला कदाचित आपण चुक मानत नाही किंवा ती चुक आहे हे आपल्याला माहित नाही, ते किती महागात पडू शकतं.

कुणाचे वापरलेले इयरफोन्स वापरणे हे किती धोक्याचं असू शकतं ह्याची आपण कधी कल्पनाही केली नसावी.

कारण इयरफोन्स कोणासोबत शेअर करताना ते किती हानीकारक असू शकतात ह्याचा आपण कधी विचारच करत नाही.

 

sharing earbuds-inmarathi
getvoip.com

 

पण जगातील वेगेवेगळ्या महाविद्यालयांत झालेल्या रिसर्च नुसार असे वापरलेले इयरफोन्स वापरल्याने त्याचे अतिशय विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. ज्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.

त्यातील पहिला परिणाम म्हणजे जंतू. इतरांचे इयरफोन्स वापरल्याने त्यांचे बॅक्टेरिया देखील शेयर होतात. पण आपल्या कानातील मळ ज्याला इयरवॅक्स म्हणतात तो अश्या जीवणुंपासून आपल्या कानाचे रक्षण करतो.

पण कधीकधी हे बॅक्टेरिया त्याच इयरवॅक्सला चिटकून बसतात ज्यामुळे काही काळाने आपल्याला कानासंबधीचे आजार उद्भवू शकतात.

एरिझोना विद्यापीठातील सहकारी प्राध्यापक Kelly Reynolds ह्यांच्या मते इयरफोन्समुले हे बॅक्टेरियाज वाढू शकतात. आणि जेव्हा तुम्ही ते शेअर करता तेव्हा नकळत तुम्ही ते बॅक्टेरिया आणखी वाढवत आहात. ह्यामुळे तुमच्या कानात इन्फेक्शन होऊ शकते.

 

sharing earbuds-inmarathi02
latam.askmen.com

 

सध्या अनेकांना इयर फंगस ह्या आजाराला सामोरे जावे लागत आहे, ज्याचे सर्वात मोठे कारण हे इयरफोन्स आहेत.

इयर फंगसमुळे तुमच्या कानांना खूप नुकसान पोहोचू शकते.

तसेच जेव्हा तुम्ही तुमचे इयरफोन्स शेयर करता तेव्हा तुम्ही तुमचे हे इयर फंगस देखील शेयर करत असता. जे एवढं धोकादायक वाटत नसलं तरी देखील त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या कानावर होऊ शकतात.

एका रिसर्चमध्ये टेस्ट केलेल्या काही इयरफोन्समध्ये यीस्ट आढळून आले. तसेच त्यात काही बॅसिलसचे कण देखील आढळून आले जे मुख्यकरून मातीत आढळतात.

त्यामुळे इयरफोन्स शेयर करणे म्हणजे हे सर्व शेयर करणे जे कदाचित कुणालाच परवडणारे नाही. कारण ह्यामुळे तुमच्या कानात इन्फेक्शन, खाज, सूज येणे तसेच इतरही त्वचेचे आजार उद्भवू शकतात.

म्हणजे जे इयरफोन्स आपण कुठलाही विचार न करता एकमेकांचे अगदी सहजपणे वापरतो ते आपल्यासाठी अत्यंत घातक असे ठरू शकतात.

त्यामुळे इतरांनी वापरलेले इयरफोन्स शक्यतोवर वापरायचे टाळावे. तसेच आपलेही इयरफोन्स कुणाला वापरण्यास देण्याचे टाळावे. ह्याने तुमच्या कानाची निगा राखली जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?